भाषण करता करता मनोज जरांगे पाटील स्टेजवर अचानक खाली बसले… काय घडलं भरसभेत?

आम्ही शांततेची भाषा करत आहोत. तुम्ही जातीयवादाची भाषा करत आहात. तुम्ही मस्ती आल्यासारखं बोलत आहात. आम्हाला पण मस्ती उतरवता येते. त्यांची मस्तीखोर भाषणं थांबवा, अशी माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे. गोरगरिब मराठ्यांना आरक्षण मिळू द्या मग पाहतो यांच्यात किती दम आहे.आमचे आरक्षण तुम्ही खाता आणि मागितले तर भांडणाची भाषा करता. आम्ही आरक्षण घेण्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

भाषण करता करता मनोज जरांगे पाटील स्टेजवर अचानक खाली बसले... काय घडलं भरसभेत?
manoj jarange patil Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 11, 2023 | 8:02 PM

लातूर | 11 डिसेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. अनेक सभा होत आहेत. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी त्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. दिवसाला तीन ते चार सभा होत आहेत. रॅली होत आहे. प्रत्येक सभेत जरांगे पाटील तास ते दीड तास बोलत आहेत. आपला मुद्दा समाजाला समजावून सांगत आहेत. आरक्षणाची गरजही व्यक्त करत आहेत. आज जरांगे पाटील यांचा दौरा लातूरला होता. लातूरच्या मुरुडमध्ये त्यांची भव्य रॅली पार पडली. या रॅलीत बोलत असतानाच अचानक जरांगे पाटील खाली बसले. त्यामुळे आयोजकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

मनोज जरांगे पाटील मुरूडला आले. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मनोज जरांगे पाटील यांनी या सभेतून आपल्या खणखणीत आवाजात उपस्थितांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. अत्यंत आक्रमक होत जरांगे पाटील बोलत होते. जरांगे पाटील यांचं भाषण जसजस संपत आलं तसतसा त्यांचा भाषणातील आवेश कमी झाला. जरांगे पाटील अचानक खाली बसले. त्यामुळे सर्वांचीच धावपळ उडाली. आयोजकांच्या तर तोंडचं पाणीच पळालं. जरांगे अचानक खाली बसल्याने उपस्थितांमध्येही चलबिचल सुरू झाली. उभं राहून भाषण करणाऱ्या जरांगे यांना प्रचंड थकवा जाणवल्याने ते स्टेजवरच खाली बसले. पण खाली बसल्यावरही त्यांनी आपलं भाषण सुरू ठेवलं होतं.

एक इंचही मागे हटणार नाही

आज सकाळपासून जरांगे पाटील यांचा मराठा संवाद सुरू आहे. आराम न करता जरांगे पाटील दौरा आणि सभांच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहेत. राजकीय लोक त्यांच्या फायद्यासाठी फूट पडण्याची प्रयत्न करतील. मला जास्तीचे बोलता येणार नाही. परंतु आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही. या समाजाला आपले मायबाप मानले आहे. माझा परिवार माझा समाज आहे. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, एकजूट फुटू देऊ नका. जाता जात तुम्हाला एकच सांगतो, तुमच्या पाठबळाची गरज आहे. तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आरक्षण दुसऱ्यांनी खाल्ले

मराठा समाजाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. ही लढाई जिंकण्यासाठी ताकतीने उभे राहायचे आहे. मराठा समजाने ही लढाई काहीही झाले तरी जिंकायची आहे. मराठा समाजाने खूप बलिदान दिले आहे आहे. 70 वर्षा नंतर मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. आरक्षणात येण्यासाठी सर्व निकष पूर्ण केले आहेत. 70 वर्षांपासून मराठ्यांचे लेकरे आरक्षणाची वाट पाहत होते. आपल्या आई-वडिलांनी जे स्वप्न बघितले ते साकार होण्याची वेळ आली आहे. आई-वडील रात्र दिवस पोर शिकवतात परंतु आरक्षण नसल्याने घात झाला. आरक्षण असताना दुसऱ्यांनी खाल्ले, असा दावा जरांगे यांनी केला.

24 डिसेंबरला आरक्षण मिळणारच

मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही असे सांगत होते. आज या राज्यात 35 लाख लोकांच्या नोंदी सापडून आरक्षण मिळाले आहे आणि याच नोंदीच्या आधारे कायदा पारित होणार आहे. 24 डिसेंबरला आरक्षण मिळणार. 24 डिसेंबरला आरक्षण दिले नाही तर आपण सज्ज राहायचे. लढाई शांततेत करा. विजय मराठ्यांचा होणार आहे. काही जणांची भूमिका ही कोयता आणि कुऱ्हाडीची आहे. पण आपण शांततेत घ्यायचे आहे. त्याला तेढ निर्माण करायची असेल, पण आपण शांततेत घ्यायचे. आपण शांततेत आंदोलन करतो. परंतु त्यांची शांततेची भावना नाही. म्हणून तर आम्हाला जशास तसे उत्तर देतात, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.