AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs DC : कुलदीप यादवची निर्णायक खेळी, दिल्लीकडून कोलकाता 154 धावांचं आव्हान

Kolkata Knight Riders vs Delhi Capitals 1st Innings Highlights In Marathi : कुलदीप यादव याने दिल्ली कॅपिट्ल्ससाठी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या.

KKR vs DC : कुलदीप यादवची निर्णायक खेळी, दिल्लीकडून कोलकाता 154 धावांचं आव्हान
kuldeep yadav batting dc,Image Credit source: सोशल मीडिया
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 29, 2024 | 9:49 PM
Share

कुलदीप यादव याने अखेरच्या क्षणी केलेल्या चिवट खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिट्ल्सने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 154 धावांचं आव्हान दिलं आहे. दिल्लीने आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 47 व्या सामन्यात इडन गार्डनमध्ये 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 153 धावा केल्या. कुलदीपने केलेल्या या खेळीमुळे दिल्लीला कोलकातासमोर सन्मानजनक आव्हान देता आलं. कुलदीपने आठव्या स्थानी बॅटिंगला येत दिल्लीसाठी सर्वाधिक धावा केल्या. कुलदीपच्या या धावांमुळे दिल्लीला 150 पार मजल मारता आली. आता दिल्लीचे गोलंदाज या 154 धावांच्या आव्हानाचा बचाव करणार की कोलकाता विजय मिळवणार याकडे लक्ष असणार आहे.

दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीच्या फलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय चुकीचा ठरवलला. कोलकाता नाईट रायडर्सने दिल्लीला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे दिल्लीला एकाही विकेटसाठी मोठी भागीदारी करता आली नाही. कोलकाताच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी कली, मात्र त्यांना कुलदीप यादवला रोखण्यात अपयश आलं. कुलदीपच्या नाबाद खेळीमुळे दिल्लीला 150 पार जाता आलं. त्यामुळे आता कुलदीपची ही खेळी किती निर्णायक ठरते हा निकालानंतरच स्पष्ट होईल.

दिल्लीसाठी कुलदीपने 26 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 35 धावांची खेळी. ऋषभ पंतने 20 बॉलमध्ये 27 धावांचं योगदान दिलं. अभिषेक पोरेलने 18 धावा जोडल्या. अक्षर पटेल 15 धावा करुन बाद झाला. पृथ्वी शॉ याने 13 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. जॅक फ्रेसर मॅकग्रुकने 12 धावा केल्या. तर उर्वरित चौघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. केकेआरकडून वरुण चक्रवर्थी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. वैभव अरोरा आणि हर्षित राणा या दोघांनी 2-2 विेकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि सुनील नरीन या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स आणि खलील अहमद.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना