जरांगेंचा दुसरा अ‍ॅटम बॉम्ब… दरेकर, डावखरेंचं नाव, काय प्लान शिजला? दुसरी ऑडिओ क्लिप धक्कादायक

मनोज जरांगे पाटील यांनी 'दुसरा अॅटमबॉम्ब' टाकत एक धक्कादायक ऑडिओ क्लिप उघड केली आहे. यात जरांगेंना बदनाम करण्याचा कट रचल्याचे ऐकू येत आहे. प्रवीण दरेकर आणि निरंजन डावखरे यांच्याकडेही जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे. मराठा आणि ओबीसी समाजातील लोकांना जरांगेंविरोधात उभे करून, पैसे देऊन व्हिडीओ व्हायरल करण्याचा हा कथित कट आहे. या क्लिपने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

जरांगेंचा दुसरा अ‍ॅटम बॉम्ब... दरेकर, डावखरेंचं नाव, काय प्लान शिजला? दुसरी ऑडिओ क्लिप धक्कादायक
Manoj Jarange
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 22, 2026 | 11:34 AM

मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दुसरा अ‍ॅटमबॉम्ब फोडला आहे. जरांगे यांनी पत्रकार परिषदेत दुसरी क्लिप ऐकवली आहे. ही क्लिप खूप मोठी आहे. त्यात दोन पुरुषांचा संवाद आहे. एकाचं नाव अतुल असल्याचं दिसतंय. त्यात मनोज जरांगे यांना संपवण्याचा प्लान सांगण्यात येत आहे. जरांगेंच्या विरोधात मराठा आणि ओबीसी समाजातील लोकं उभं करायची, त्यांना पैसे द्यायचे आणि व्हिडीओ व्हायरल करायचे, असं या क्लिपमध्ये ही दोन माणसे बोलताना दिसत आहेत. या क्लिपमध्ये प्रवीण दरेकर आणि निरंजन डावखरेंकडेही जरांगेंच्या विरोधातील जबाबदारी सोपवल्याचं ऐकायला मिळत आहे. या क्लिपने एकच खळबळ उडाली आहे. या कथित क्लिपची टीव्ही9 मराठी पुष्टी करत नाही.

Loading...

कथित क्लिपमधील संवाद –

पहिला व्यक्ती – उदयनराजे यांनी बोलावं. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षांनी जरांगेंविरोधात बोलावं. दरेकर आणि राणे बोलत आहेत. पण जरांगे भाजप हा मराठाद्रोही असल्याचं दाखवत आहे. त्याला उत्तर दिलं पाहिजे. मराठा पुढाऱ्यांकडून मुलाखती दिल्या पाहिजे. उत्तरं दिलं पाहिजे.

दुसरा व्यक्ती – केवळ मराठा नाही, ओबीसी नेत्यांनीही बोललं पाहिजे.

पहिला – आता तो कर्जमाफी आणि इतर मुद्द्यावर बरळत आहेत. तो वेगेगवळ्या मुद्द्यावर बोलत राहतो. नरेटिव्ह सेट करत असतो. आपण त्याला उत्तर देण्याचं काम करतो.

दुसरा – उदयनराजेंशी बोलता येईल अतुलजी. मी बोलतो

पहिला – माझ्या कल्पनेप्रमाणे दिवसभर तेच चालत राहील. काल निरंजन डावखरे आले होते. तेव्हा त्याच्या विरोधातील मराठा लोकांशी बोलणं करून दिलं आहे. दरेकरांकडे एक ग्रुप जोडला आहे. आपण सुचिता पाळू. जो कोणी त्याच्या विरोधात बोलत असेल तर त्या लोकांना जवळ करा. आणि त्याला डॅमेज करा. आपल्या हाताने नको असेल तर दुसऱ्याच्या हाताने करू. तशी माणसं आहेत आपल्याकडे पार्टी फंड वापरायचा नसेल तर वैयक्तिक खर्च करा. त्याला नाही आवरलं तर तो तुम्हाला मराठवाड्यात अक्षरश: गिळून घेईल.

दुसरा – पक्षातील कोणी बोलायला तयार नाही हा प्रॉब्लेम आहे. मतांसाठी घाबरत आहेत. प्रत्येकाला विधानसभा जिंकायची आहे.

पहिला – मराठवाड्यातील त्याच्या विरोधातील लोक बोलायला तयार आहे. त्यांना अॅक्टिव्ह करा. शरद पवार पैसे देतात, हा पैसे देतोय असा आरोप करून आपण मोकळे होतो. त्यापेक्षा आपण त्याच्याविरोधात माणसं उभी करू.

दुसरा – करू आपण करू.

पहिला – निरंजन आणि दरेकरांकडे ग्रुप दिला आहे. प्रपोजल, प्रस्ताव मंजुरी या पातळीवर गेलं तर काम होत नाही. आपल्याकडे काही नाही. ते स्वत:ला भिकारी समजत आहेत. उगाच आपण भेट घालून दिली तर अडचण होईल.

दुसरा – बघू. बोलतो मी आता. आय विल ट्राय

दुसरा – आर्थिक परिस्थितीवर बोललं पाहिजे. राहुल गांधी हे आपल्या देशाला कमकुवत करत आहे याबाबतचा अर्णवचा व्हिडीओ दाखवला पाहिजे. अर्णवचे अनेक व्हिडीओ आहेत. देश कुठे चालला हे लोकांना कळतंय. थोडे व्हिडिओ पुढे आणले पाहिजे.

पहिला- काही गोष्टी न बोलता कराव्या लागतात. काही बोलून कराव्या लागतात. जे असेल ते.

दुसरा – मला लेख लिहायचा आहे. पण छापत नाहीत.

पहिला – तुम्ही लिहा. बघू कसे छापत नाही. बघतो मी काय करायचं. फक्त चहा प्याययला आणि जेवायलाच जायचं का? पुढे काही करणार की नाही?

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us