AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्याला अ‍ॅलर्ट! ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार, जोरदार पावसाचाही इशारा

जालन्यात विजांच्या कडकडाटांसह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. (Meteorological Department Rain Alert To Jalna)

जालन्याला अ‍ॅलर्ट! ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार, जोरदार पावसाचाही इशारा
प्रतिकात्मक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 01, 2021 | 7:53 PM
Share

जालना: जालन्यात विजांच्या कडकडाटांसह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. त्यामुळे अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. (Meteorological Department Rain Alert To Jalna)

कुलाबा वेधशाळेने हा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी, असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केशव नेटके यांनी हे केलं आहे. तसेच आपत्कालिन परिस्थितीत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावे, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

विजा चमकत असल्यास काय करावे?

>> शेतात काम करत असताना विजा चमकत असतील तर शेताजवळील घराचा त्वरित आसरा घ्या. विद्युत उपकरणे बंद ठेवा. किंवा शक्यतो जिथे आहात तिथेच रहा. शक्य असेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवा, तथापि डोके जमिनीवर ठेऊ नका. ओल्या शेतात अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे. पोहणारे, मच्छिमारी करणारे यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.

>> झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहा. एखादे उंच झाड सुरक्षित ठेवायचे असल्यास उंच वृक्षाच्या खोड अथवा फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनी खोलवर गाडून ठेवा. म्हणजे हे झाड सुरक्षित होईल. वीजवाहक वस्तूंपासून दूर रहा. उदा. रेडीयटर, स्टोव्ह, मेटल, लोखंडी पाईप, टेलिफोनचे खांब, विजेचे खांब, टेलिफोन टॉवर यापासून दूर रहा. मजबूत असलेले पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपापल्या घरी विजवाहक यंत्रणा बसवा. जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्या. वृक्ष, दलदलीची ठिकाणे तथा पाण्याचे स्त्रोत या पासून शक्यतो दूर रहा. मोकळ्या आकाशाखाली असण्यापेक्षा लहान झाडाखाली आसरा घेणे चांगले. मोकळ्या आकाशाखाली राहणे आवश्यकच असेल तर खोलगट ठिकाणी रहा.

>> विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका. झाडाखाली उभे राहू नका. उंच जागेवर, झाडावर चढू नका. पाण्याचे नळ, फ्रिज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका. त्यापासुन दूर रहा आणि विजेवर चालणाऱ्या यंत्रापासून तसेच धातुंपासून बनलेल्या वस्तू जसे कृषीयंत्र, इत्यादींपासुन दूर रहा. प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नका. दूरध्वनीचा वापर करू नका. गाव, शेत, आवार, बागबगीचा आणि घर यांच्या भोवती तारेचे कूंपन घालू नका. कारण ते विजेला सहजतेने आकर्षित करते. दोन चाकी वाहन, सायकल, ट्रक, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी जा. अशावेळी वाहनातून प्रवास करू नका. वाहनाच्या बाहेर थांबणे आवश्यक असल्यास, धातूचे कोणतेही उपकरणे हातात बाळगू नका. एकाच वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र राहू नका. दोन व्यक्तिंमधील अंतर किमान 15 फूट असेल असे पाहा. धातूची दांडी असलेल्या छत्रीचा उपयोग करू नका.

या क्रमांकावर संपर्क साधा

आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय दूरध्वनी क्र. 02482-223132, 226477 अथवा टोल फ्री क्र. 1077, पोलीस नियंत्रण कक्ष, जालना 02482-225100, 224833, टोल फ्री क्र. 100, अग्निशमन विभाग, नगर परिषद, जालना 02482-230101 टोल फ्री क्र. 101, आरोग्य विभाग, जालना 02482-224381225508 येथे संपर्क साधावा, असेप्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. (Meteorological Department Rain Alert To Jalna)

संबंधित बातम्या:

Maharashtra Coronavirus LIVE Update : नाशिक शहरातील खासगी रुग्णालयांचा धक्कादायक निर्णय, उद्यापासून कोविड रुग्ण दाखल करून घेणार नाही

Maharashtra News LIVE Update | नाशिक शहर आणि परिसरात पावसाची हजेरी, काही भागात विद्युतपुरवठा खंडित

Viral Video : दारूसाठी जीवाचा आटापिटा, माणसाचे देशी जुगाड एकदा पाहाच

(Meteorological Department Rain Alert To Jalna)

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.