Maharashtra News LIVE Update | हिंगोली येथील तहसीलदाराविरोधात 3 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

| Updated on: Jun 02, 2021 | 12:10 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | हिंगोली येथील तहसीलदाराविरोधात 3 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Jun 2021 11:06 PM (IST)

    हिंगोली येथील तहसीलदाराविरोधात 3 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

    हिंगोली येथील तहसीलदाराविरोधात गुन्हा दाखल

    लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    3 लाख रुपयांची लाचेची मागणी केल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल

    पांडुरंग माचेवाड असे तहसीलदाराचं नाव

    रेतीचे ट्रक सोडवण्यासाठी मागितली 3 लाखांची लाच

    पुढील तपास सुरू

  • 01 Jun 2021 09:10 PM (IST)

    सहकार क्षेत्रातल्या कायद्यासंदर्भात राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेणार, नवीन कायद्यामुळं रिझर्व्ह बँकेला अमर्यादित अधिकार मिळण्याची भीती

    मुंबई : सहकार क्षेत्रातल्या कायद्यासंदर्भात राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेणार

    सहकार क्षेत्रात केंद्रानं केलेल्या कायद्यामुळं सहकाराला फटका बसण्याची भूमिका बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली

    नवीन कायद्यामुळं रिझर्व्ह बँकेला अमर्यादित अधिकार मिळण्याची भीती

  • 01 Jun 2021 09:09 PM (IST)

    पालघर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची हजेरी

    पालघर : पालघर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची हजेरी

    ढगाळ वातावरणासह विजेचा कडकडाट

    अचानक पडलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ

  • 01 Jun 2021 08:10 PM (IST)

    मुंबईत 1 कोटी 54 लाख किमतीचे बोगस औषधे जप्त 

    मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई

    कोरोना आजराच्या उपचारात वापरली जाणारी 1 कोटी 54 लाख किमतीचे बोगस औषध जप्त

    फॅव्हिपीरावीर तसेच आणि हायड्रॉक्झी क्लोरोक्वीन हे औषध केले जप्त

    मुंबईत अनेक मेडिकल दुकानांवर धाड़ी टाकून केली कारवाई

    सदर बनावट  औषधे कुठून आली होती,  निर्माता कंपनी कोण याची चौकशी केली जात आहे.

  • 01 Jun 2021 07:18 PM (IST)

    नाशिक शहर आणि परिसरात पावसाची हजेरी, काही भागात विद्युतपुरवठा खंडित

    नाशिक - शहर आणि परिसरात पावसाची हजेरी

    अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात

    काही भागात विद्युत पुरवठा खंडित

  • 01 Jun 2021 06:40 PM (IST)

    छत्तीसगड राज्यात चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान

    छत्तीसगड : छत्तीसगड राज्यात चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान

    घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

    01  एस.एल.आर,  1 रायफल तर 03 नग 12 बोर रायफल जप्त

    ठार केलेल्या नक्षलवाद्यांत एक पुरुष एक महिला नक्षलींचा समावेश

    छत्तीसगड राज्यातील कोंडागाव जिल्ह्यातील भणडारडीह जंगल परिसरातील घटना

  • 01 Jun 2021 06:35 PM (IST)

    दहिसरमध्ये पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या

    मुंबई : दहिसर पूर्व येथे खान कंपाऊंड मध्ये पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या

    हत्या करून पत्नीने प्रियकराच्या मदतीनेच घरातील किचनमध्ये मृत्यदेह गाडून ठेवला होता

    सध्या घटनास्थळी पोलीस दाखल असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे

  • 01 Jun 2021 06:08 PM (IST)

    मराठा समाजाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची शिर्डीतील बैठक संपली

    शिर्डी : मराठा समाजाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

    भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत झाली बैठक

    राहाता तालुक्यातील लोणी गावात बैठक

    बैठकीस अनेक मराठा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित

    पुढच्या दहा दिवसांत मराठा आमदार खासदार यांसह राज्यातील पदाधिकारी घेणार बैठक

    एकाच व्यासपीठावर येऊन लढा देण्याचं विखे यांनी केले होते आवाहन

    आवाहनाला प्रतिसाद देत आज झाली बैठक

    सर्व संघटना एकत्रितपणे लढा देणार असून लवकरच राज्यव्यापी आंदोलन उभे करणार

    राधाकृष्ण विखे पाटील यांच वक्तव्य

  • 01 Jun 2021 05:56 PM (IST)

    कराड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाउस

    सातारा : कराड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाउस

    गेल्या दीड तासापासून जोरदार पाऊस

    कराड मलकापूर परिसरात रस्त्यावर पाणी

    कराड शहरातील जनजीवन विस्कळीत

  • 01 Jun 2021 04:37 PM (IST)

    मालेगावमध्ये अंजुमन चौकातील तीन मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग

    मालेगाव : अंजुमन चौकातील तीन मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग

    आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नसून गॅस सिलिंडरमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

    अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

    आग विजवण्याचे काम सुरू

  • 01 Jun 2021 04:31 PM (IST)

    पावसामुळे सर्व उध्वस्त झालं, मागच्या नुकसानीचे पैसे मिळाले नाही असा शेतकऱ्यांचा आरोप : देवेंद्र फडणवीस

    जळगाव :  पावसामुळे सर्व उध्वस्त झालं : देवेंद्र फडणवीस

    - मागच्या नुकसानीचे पैसे मिळाले नाही असं शेतकरी म्हणत आहेत

    - कोकणात सरकार धावलं आमच्याकडे लक्ष दिलं नाही : देवेंद्र फडणवीस

    - पीकविमा निकष बदलले गेले त्यामुळे लाभ होत नाही

    - त्यामुळे अनेकांचा पीकविमा उतरवला नाही

    - शेतकऱ्यांची तक्रार आहे. विमा कंपनीचे लोक पोहचत नाहीयेत

  • 01 Jun 2021 04:24 PM (IST)

    साताऱ्यात अतिप्रसंग करताना आरडाओरडा केला म्हणून, 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला रेल्वेबाहेर फेकले

    सातारा : वास्को निजामुद्दीन एक्स्प्रेस मधून 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला बाहेर फेकले

    साताऱ्यातील लोणंद वाठार स्टेशनच्या दरम्यानची धक्कादायक घटना

    रात्री अतिप्रसंग करताना आरडाओरडा केला म्हणून रेल्वेतून बाहेर फेकले गेले असल्याची प्राथमिक माहिती

    लोणंद पोलिसांनी जखमी मुलीला जिल्हा रुग्णालयात केले दाखल

  • 01 Jun 2021 04:05 PM (IST)

    पुण्यातील दौंड तालुक्यातील प्रसिद्ध कांचन व्हेज हॉटेलला आग 

    पुणे : सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यात प्रसिद्ध 'कांचन व्हेज' हॉटेलला लागली आग

    घटनास्थळी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक दलाची एक गाडी दाखल

    ही आग शाँटसर्किट किंवा गँस लीक झाल्यामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज

    हे हॉटेल आतून पूर्णपणे फर्निचर व बांबू, काठ्यांनी सजवलेले असल्यामुळे असल्याने आतून पूर्णतः जळून खाक

    लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती. जिवितहानी नाही

  • 01 Jun 2021 03:36 PM (IST)

    नवी मुंबई मनपा मुख्यालयासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

    नवी मुंबई

    नवी मुंबई मनपा मुख्यालयासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

    अंगावर डिझेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न

    कोपरखैरणे वॉर्ड मध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचे तरुणाचा आरोप

    कोपरखैरणे वार्ड ऑफिस मधील कर्मचारी लाखो रुपये कमवतात आणि गरिबाला त्रास देतात

    पैसे नाही दिले तर कारवाई करतात मनपा अधिकारी

    आयुक्तांना पोलिसांना वारंवार पत्र देऊन सुद्धा कारवाई नाही

    याचाच निषेध म्हणून तरुणाचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

    नवी मुंबई मनपा मुख्यालयाच्या समोर पेटवून घेण्याचा प्रयत्न

    अंगावर पेट्रोल टाकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

  • 01 Jun 2021 12:58 PM (IST)

    इंधन दरवाढ विरोधात डोंबिवलीत सरकारविरोधात शिवसेनेचे आंदोलन

    इंधन दरवाढ विरोधात डोंबिवली येथील उषमा पेट्रोल पंप परिसरात डोंबिवली शिवसेनेकडून केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले.

    या आंदोलनादरम्यान हर हर महंगाई घर घर महंगाई ही, मोदी सरकार नाही महगाई सरकार अशी केंद्र सरकार विरोधात घोषणा करण्यात आलं.

    हे आंदोलन शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे आणि शिवसैनिक राजेश कदम यांच्या नेतृत्वात करण्यात आले

  • 01 Jun 2021 12:57 PM (IST)

    नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालय परिसरात बिबट्याचा वावर

    नागपूर नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालय परिसरात बिबट्याचा वावर,

    बिबत्याने केली डुकराची शिकार,

    बिबट्याचे पंजाचे ठसे आठळले,

    वन विभाग आणि पोलीस घटनास्थळी

    चार दिवसा पूर्वी गायत्री नगर परिसरात आढळला होता बिबट्या तोच असण्याची शक्य

  • 01 Jun 2021 11:14 AM (IST)

    अजित पवार यांच्या पदोन्नतीतल्या आरक्षणासंदर्भात बैठक सुरु, महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात पदोन्नतीतल्या आरक्षणासंदर्भात बैठक सुरू ...

    बैठकीला छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, नितीन राऊत उपस्थित...

    पदोन्नतीतले आरक्षण कायम ठेवण्यात यावे अशी काँग्रेसची भुमिका....

    आजच्या बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता

  • 01 Jun 2021 11:13 AM (IST)

    औरंगाबादेत मराठा तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा, डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न

    औरंगाबाद :-

    औरंगाबादेत मराठा तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा

    सावंगी बायपासवर डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न

    मराठा आरक्षणासाठी जाळून घेण्याचा प्रयत्न

    पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ

    मंगेश साबळे असं मराठा तरुणाचे नाव

    पोलीस आणि तरुणात झाली झटपट

  • 01 Jun 2021 11:12 AM (IST)

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा जळगाव दौरा, रक्षा खडसेंसोबत चर्चा होण्याची शक्यता

    - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात मुक्ताईनगरमध्ये होणार दाखल - एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रथमच फडणवीस खडसेंच्या मतदार संघात - एकनाथ खडसे यांच्या घरी जाऊन खासदार रक्षा खडसे यांची घेणार भेट, - मुक्ताईनगरमधील ग्रामीण रुग्णलयाची ही करणार पाहणी - नंतर करणार नुकसानग्रस्त भागाची पाहणी

    - जळगाव जिल्ह्यातील भाजपची पडझड बघता पक्ष बांधणी संदर्भात ही रक्षा खडसेंसोबत चर्चा होण्याची शक्यता - गेल्या आठवड्या भरापूर्वीच मुक्ताईनगर पंचायत मधील भाजपच्या 6 नगरसेवकांनी सोडचिठी देत शिवसेनेत केलाय प्रवेश

  • 01 Jun 2021 09:48 AM (IST)

    आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बापाने केला मुलीवर आणि जावयावर हल्ला

    यवतमाळ

    यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील चिकणी गावात आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बापाने केला मुलीवर आणि जावयावर हल्ला

    चिकणीत सैराटचा थरार

    सागर अंभोरे शुभांगी अंभोरे असे जखमी पती पत्नीचे नाव

    वडील दादाराव माटाळकर यांनी आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरून हल्ला केल्याची तक्रार नारायण

    अंभोरे यांनी आर्णी पोलिसात दिली

  • 01 Jun 2021 08:55 AM (IST)

    बुलडाण्यात दूध विक्रीत घट मात्र पशुखाद्याच्या भावात भरमसाठ वाढ

    बुलडाणा

    कोरोनाचे निर्बंध दूध विक्रेत्यांच्या मुळावर

    दूध विक्रीत घट मात्र पशुखाद्याच्या भावात भरमसाठ वाढ

    निर्बंधांमुळे दुधाची खुली विक्री करता येत नाही

    यामुळे दुध उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले

    शिवाय दूध जनावरांच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत

    लोकडाऊन मुळे ग्राहक दूध केंद्रावर दूध नेण्यासाठी येत नसल्याने होतेय नुकसान

  • 01 Jun 2021 08:22 AM (IST)

    शासनाचे मोफत धान्य लाभार्थ्यांना विकणाऱ्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित

    वर्धा

    - शासनाचे मोफत धान्य लाभार्थ्यांना विकणाऱ्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित

    - समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (गोंड) येथील प्रकार

    - लॉकडाउनच्या काळात शासनाने गहू व तांदूळ मोफत धान्य देण्याचे दिले होते आदेश

    - तरीही वायगाव (गोंड) येथील वस्तला पांगूळ यांच्या नावे असलेल्या स्वस्त धान्य दुकान मध्ये पैसे घेण्यात आले असल्याची तक्रार

    - तक्रारीची चौकशी करत तालुका पुरवठा निरीक्षकाने केला दुकानाचा परवाना निलंबित

  • 01 Jun 2021 08:21 AM (IST)

    वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात 2 आणि 3 मे रोजी दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

    वसई - वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात 2 आणि 3 मे रोजी दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

    शहराला पाणीपुरवठा करणारी सुर्या योजनेची जुनी आणि नवीन लाईन वरील पंपाची तसेच पॅनलची आणि इतरही पावसाळ्यापूर्वीची करण्यात येणार असल्याने 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे

    तर पुढचे दोन दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने व अनियमित होणार आहे

    शहरातील नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करून जपून पाणी वापरण्याचे अहवान पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे

  • 01 Jun 2021 08:12 AM (IST)

    पुणे-मुंबई प्रवास करण्यासाठी प्रवाशांची पसंती असणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचा आज वाढदिवस

    पुणे

    पुणे-मुंबई प्रवास करण्यासाठी प्रवाशांची पसंती असणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचा आज वाढदिवस,

    डेक्कन क्वीननं 92 व्या वर्षात केलं पदार्पण,

    रेल्वे यार्डात केला जाणार वाढदिवस साजरा,

    प्रवाशांच्या सेवेतील 92 वर्ष देदीप्यमान !

    रेल्वे प्रवाशी ग्रुपच्यावतीनं आज होणार डेक्कन क्वीनचं सेलिब्रेशन

  • 01 Jun 2021 06:56 AM (IST)

    मनमाड - मालेगाव रोडवर भीषण अपघात, आगीत दोन्ही वाहने जळून खाक, 2 जणांचा होरपळून मृत्यू

    मनमाड - मनमाड - मालेगाव रोडवर भीषण अपघात

    केमिकल घेऊन जाणाऱ्या कंटेनर आणि लोखंडी रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रेलर ची समोर धडक होऊन दोन्ही वाहनाला लागली भीषण आग

    आगीत दोन्ही वाहने जळून खाक तर 2 जणांचा होरपळून मृत्यू

    मनमाड - मालेगाव रोड वरील कौलाने गावाजवळ झाला अपघात

    दोन्ही बाजूंनी वाहतूक आली थांबवण्यात

    मालेगाव अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल

  • 01 Jun 2021 06:54 AM (IST)

    यंदा सरासरीपेक्षा अधिक पूर्वमोसमी पाऊस

    राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांतीलपाणीसाठ्यात वाढ

    यंदा राज्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अनेक पटीने पूर्वमोसमी पावसाची नोंद

    कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत सर्वाधिक पावसाची नोंद

    पूर्वमोसमी पावसामुळे राज्याच्या सर्वच विभागांतील धरणांमध्ये यंदा गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा जमा

  • 01 Jun 2021 06:39 AM (IST)

    ‘एसटी’च्या मालवाहतुकीला उत्तम प्रतिसाद

    नागपूर : कोरोनामुळे एसटीची प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली असतानाच महामंडळाने 1 मे 2020 रोजी मालवाहतुकीच्या क्षेत्रात पदार्पण केले. तेव्हापासून आजपर्यंत वर्षभरात मालवाहू वाहनांच्या 95 हजार फेऱ्यांतून 7 लाख मेट्रिक टन वाहतूक करण्यात आली. त्यातून एसटीला 56 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.

  • 01 Jun 2021 06:34 AM (IST)

    सोलापुरात करोना रुग्णांकडून जादा आकारलेले एक कोटी 94 लाख परत

    सोलापूर : सोलापूर शहरात विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करुन घेतलेल्या सुमारे आठ हजार करोना रुग्णांच्या वैद्यकीय देयकांची तपासणी महापालिका प्रशासनाने तपासली. यात वाढवून लावलेली एक कोटी 94 लाख रुपयांएवढी रक्कम संबंधित रुग्णांना परत करण्यास रुग्णालयांना भाग पाडले गेले.

Published On - Jun 01,2021 11:06 PM

Follow us
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.