एक असं गाव जिथे 41 वर्षांपासून निवडणूक नाही, घराघरात सुखशांती आणि समृद्धी, विकासाची गाडी सुस्साट!

एक असं गाव आहे की ज्या गावात 41 वर्षांपासून साधी निवडणूकही नाही..!, ते गाव आहे नांदेड जिल्ह्यातील आमराबाद .... (Nanded Amrabad village has not had an election for 41 years)

एक असं गाव जिथे 41 वर्षांपासून निवडणूक नाही, घराघरात सुखशांती आणि समृद्धी, विकासाची गाडी सुस्साट!
नांदेड अमराबादमध्ये 41 वर्षांपासून निवडणूक नाही
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 7:35 AM

नांदेड :  राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा नुकताच धुरळा उडाला. सरपंचपदाची निवडणुकही आता सरलीय. गावागावात गावकारभारी खुर्चीवर आरुढ झालेत. अशातही एक असं गाव आहे की ज्या गावात 41 वर्षांपासून साधी निवडणूकही नाही..!, ते गाव आहे नांदेड जिल्ह्यातील आमराबाद ….  (Nanded Amrabad village has not had an election for 41 years)

अर्धापुर तालुक्यातील आमराबाद या गावात 41 वर्षांपासून ग्रामपंचायतची निवडणूक झालेली नाही. ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध निवडून देण्याची परंपरा या गावकऱ्यांनी 41 वर्षांपासून जोपासलीय.

यावेळेला देखील श्यामराव पाटील टेकाळे यांची सरपंचपदी बिनविरोध निवडणूक करण्यात आलीय. इसापूर धरणाच्या पाण्यामुळे सिंचनाची सोय असल्याने गावात समृद्धी नांदत आहे.

गावात गटातटाचे राजकारण नसल्याने गावात मोठ्या प्रमाणात विकासकामे झालेली आहेत. गेल्या 40 वर्षांपासून गावात निवडणूक नको, अशी गावकऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे आमराबाद गावाने जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केलीय.

गावात निवडणूक असली की गावकी-भावकीचं राजकारण आलं. जवळची माणसं लांब जाणं आलं आणि लांबची माणसं जवळ येणं… या सगळ्यात अनेकदा नात्यातल्या सख्ख्या माणसांची ताटातूट होते. अनेकदा निवडणुकीच्या कारणाने झालेली भांडणं उभ्या आयुष्यभर मिटत नाही. मग निवडणुकीमुळे भांडणंच होणार असतील, तर त्या निवडणुकीला का सामोरं जायचं, अशी गावकऱ्यांची धारणा आहे.

आपल्या माणसातूनच एक बिनविरोध सरपंच करायचा की जो आपल्या माणसांचं, आपल्या गावाचं भलं करेल. गावच्या विकासात मोलाचा वाटा उचलेल. गावचं हित साधेल. आतापर्यंत गावाला असेच सरपंच लाभले की ज्यांनी गावच्या विकासाला प्राधान्य दिलं. त्यामुळे आम्हाला गावात निवडणूक घ्यावीशी वाटली नाही, असं गावकरी सांगतात. गावकऱ्यांच्या आणि पुढाऱ्यांच्या याच चांगुलपणाने गावच्या विकासाची गाडी मात्र जोरदार धावतीय.

(Nanded Amrabad village has not had an election for 41 years)

हे ही वाचा :

स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा नंबर अंबानींच्या गाडीशी मिळताजुळता, नव्या खुलाशाने खळबळ?

CCTV Video : मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी मध्यरात्री 1 वाजता पार्क!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.