स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा नंबर अंबानींच्या गाडीशी मिळताजुळता, नव्या खुलाशाने खळबळ?

स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा नंबर अंबानींच्या गाडीशी मिळताजुळता, नव्या खुलाशाने खळबळ?
मुकेश अंबाणी यांच्या घराजवळ संशयास्पद स्थितीत स्कॉर्पिओ उभी असल्याचे आढळले होते.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा नंबर अंबानी यांच्या गाडीशी पूर्णपणे मिळताजुळता असल्याचे समोर आले आहे. (number scorpio mukesh ambani car)

prajwal dhage

|

Feb 25, 2021 | 11:34 PM

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा नंबर अंबानी यांच्या गाडीशी पूर्णपणे मिळताजुळता असल्याचे समोर आले आहे. ही माहिती मुंबई पोलिसांनी दिली असून पोलिसांनी ही गाडी जप्त केलीये. मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या मुंबईतील बंगल्यासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ (scorpio) गाडी आढळली होती. या गाडीत तब्बल 20 जिलेटीनच्या कांड्या होत्या. त्यांनतर पोलिसांनी या घटनेचा तपास केल्यानंतर ही नवी माहिती समोर आली आहे. (number of scorpio which was full of explosive is same as that of Mukesh Ambani’s car)

नेमका प्रकार काय?

मुकेश अंबनी यांच्या मुंबईतील बंगल्यासमोर एक अनोळखी कार संशयास्पदरित्या पार्क करण्यात आली होती. ही बाब समोर आल्यानंतर यथे बॉम्ब स्कॉड पथक, एसएसजी कमांडो तसेच मुंबई सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलही घटनास्थळी दाखल झाले होते. बॉम्ब नाशक पथकाने या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये 20 जिलेटीनच्या कांड्या तसेच एक निनावी पत्रही आढळले होते. या पत्रामध्ये ‘ही फक्त झलक आहे’ अशा आशयाचा मजकूर लिहलेला असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण मुंबई काही काळासाठी धास्तावली होती.

गाडीचा नंबर अंबानींच्या गाडीशी मिळताजुळता

हा प्रकार घडल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले होते. त्यांनी गाडीचा तपास करुन गाडीतील सर्व पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासातून मुकेश अंबानी आणि स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ या दोन्ही गाड्यांचा नंबर पूर्णपणे मिळताजुळताच असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

दरम्यान, स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटकं ठेवणाऱ्यांनी मुकेश अंबानी यांच्या गाडीचा नंबर शोधून तशीच गाडी त्यांच्या बंगल्यासमोर पार्क केल्यामुळे हा पूर्णपणे नियोजित कट असल्याचे जवळजवळ स्पष्ट होत आहे. पोलिसांनी ही गाडी जप्त केली असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

इतर बातम्या :

VIDEO : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं भरलेली स्कॉर्पिओ, घातपाताच्या उद्देशाचा संशय

जिथं स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली ते अंबानींचं अँटेलिया हाऊस कसं आहे?

मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळली स्फोटकांनी भरलेली कार; विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी

(number of scorpio which was full of explosive is same as that of mukesh ambani’s car)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें