औरंगाबादकरांनो,आता उपभोक्ता करही भरावा लागणार, कशासाठी लावलाय नवा कर? तुमच्या मालमत्तेवर किती शुल्क?

| Updated on: Dec 08, 2021 | 7:00 AM

महानगर पालिकेने पाच वर्षांपूर्वी शहरातील मालमत्ता धारकांकडून उपभोक्ता कर घेण्याची घोषणा केली होती. कचरा संकलन आणि प्रक्रियेच्या कामासाठी उपभोक्ता शुल्क लावण्याचा निर्णय मनपाने 2015 मध्ये घेतला होता. आता 21 फेब्रुवारी 2021 च्या सर्वसाधारण सभेत त्यासंबंधीचा ठराव मंजूर करण्यात आला.

औरंगाबादकरांनो,आता उपभोक्ता करही भरावा लागणार, कशासाठी लावलाय नवा कर? तुमच्या मालमत्तेवर किती शुल्क?
Tax
Follow us on

औरंगाबादः शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकाला आता आगामी एप्रिल महिन्यापासून उपभोक्ता कर (Consumer tax) भरावा लागणार आहे. औरंगाबाद महानगर पालिकेने हा कर लावण्याचा निर्णय पाच वर्षांपूर्वीच घेतला होता. मात्र कर वसुलीसाठी खासगी कंपन्या पुढे येत नसल्याने त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. आता ही व्यवस्था झाली असून महानगरपालिका मालमत्ता  (Property tax)करासोबतच उपभोक्ता करदेखील वसूल करणार आहे.

उपभोक्ता कर कशासाठी लागणार?

खरं तर महानगर पालिकेने पाच वर्षांपूर्वी शहरातील मालमत्ता धारकांकडून उपभोक्ता कर घेण्याची घोषणा केली होती. कचरा संकलन आणि प्रक्रियेच्या कामासाठी उपभोक्ता शुल्क लावण्याचा निर्णय मनपाने 2015 मध्ये घेतला होता. आता 21 फेब्रुवारी 2021 च्या सर्वसाधारण सभेत त्यासंबंधीचा ठराव मंजूर करण्यात आला. पाच वर्षांपूर्वी निवासी मालमत्तांसाठी 100 रुपये तर व्यावसायिक मालमत्तांसाठी 500 रुपये असा कर ठरला होता. मात्र मनपाने हे शुल्क वसूल करण्याचे काम सेवाभावी संस्थेला देण्यासाठी निविदा काढली. पण फार प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे प्रशासकांनी 1 एप्रिल पासून मालमत्ता करासोबतच उपभोक्ता कर वसुलीचा निर्णय घेतला आहे. मालमत्ता कराच्या डिमांड नोटिसीतच हे शुल्क समाविष्ट असेल.

कोणत्या मालमत्तेसाठी किती उपभोक्ता कर?

महापालिकेने पाच वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या शुल्कात मोठी वाढ केली असून मालमत्तानिहाय कराचे शुल्क पुढीलप्रमाणे असेल.

निवासी मालमत्ता- 365 रुपये
व्यावसायिक दुकाने – 730 रुपये
हॉटेल्स बिअर बार- 3,650 रुपये
लॉजिंग, मोठे हॉटेल- 7,300 रुपये

महापालिकेची करवसुली मोहीम तेजीत

सध्या औरंगाबाद महापालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई सुरु केली आहे. महाापालिका पथकाने कर थकवणाऱ्या व्यासायिक तसेच निवासी मालमत्ता सील करायला सुरुवात केली आहे. सोमवारी तर एकाच दिवशी महापालिकेने थकबाकीदारांकडून तब्बल सहा लाखांचा कर वसूल केला. तसेच पाळीव प्राण्यांवरील कराबाबतही मनपाने कठोरतेने वसुली सुरु केली आहे. श्वान पाळण्यासाठी पालिकेचा परवाना आवश्यक आहे. त्यासाठीचे शुल्क महापालिकेकडे भरणे आवश्यक आहे. तसा परवाना नसेल तर प्राणीप्रेमींकडील प्राणी महापालिका जप्त करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

इतर बातम्या- 

Nitin Raut: मुलासाठी महावितरणची यंत्रणा वेठीस, नितीन राऊतांनी राजीनामा द्यावा; भाजपची मागणी

Photos | मॉडलिंगच्या क्षेत्रात सारा तेंडुलकरचा डेब्यू, पाहा सचिनच्या मुलीचा नवीन अवतार