‘लेडी सिंघम’ मोक्षदा पाटील यांची बदली, निमित गोयल यांनी पदभार स्वीकारला!

| Updated on: Sep 21, 2021 | 8:53 AM

औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील (IPS Mokshada Patil) यांच्या जागी नवे पोलीस अधीक्षक निमित गोयल (Nimit Goyal) यांनी पदभार स्वीकारला. काही दिवसापूर्वीच औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची बदली झाली होती.

लेडी सिंघम मोक्षदा पाटील यांची बदली, निमित गोयल यांनी पदभार स्वीकारला!
Mokshada Patil
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील (IPS Mokshada Patil) यांच्या जागी नवे पोलीस अधीक्षक निमित गोयल (Nimit Goyal) यांनी पदभार स्वीकारला. काही दिवसापूर्वीच औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी निमित गोयल यांची नियुक्ती झाली आहे. नवे पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी पदभार स्वीकारला. गणेशोत्सव पार पडल्यानंतर निमित गोयल यांनी कारभार हाती घेतला. मोक्षदा पाटील यांची बदली लोहमार्ग पोलीस अधीक्षक, औरंगाबाद विभागात करण्यात आली आहे.

औरंगाबाद पोलिस दलात ‘महिलाराज’

औरंगाबाद शहरातील पाच महत्त्वाच्या पदांवर वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे औरंगाबादच्या पोलिसदलात नारीशक्तीचे दर्शन घडणार आहे.

नव्याने झालेल्या बदल्यांनुसार, औरंगाबाद लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी मोक्षदा पाटील यांची बदली झाली आहे. तसेच शर्मिला घार्गे या औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी असतील. तसेच राज्य गुप्तवार्ता विभागात मीना मकवाना या उपायुक्त पदावर असतील. उज्ज्वला वनकर आणि अपर्णा गीते या शहर पोलिस उपायक्तपदाची धुरा हाती घेतील.

ग्रामीण पोलिस अधीक्षक कोण?

औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पोलिस अधीक्षक पदावर मुंबई येथील पोलिस उपायुक्त निमित गोयल यांची बदली करण्यात आली आहे. तर मोक्षदा पाटील यांची बदली लोहमार्ग पोलिस अधीक्षक, औरंगाबाद विभागात करण्यात आली आहे. तसेच राज्यीतल पोलिस उपायुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या. यात औरंगाबाद शहर पोलिस आयुक्तालयातील मीना मकवाना आणि निकेश खाटमोडे पाटील यांचीही बदली करण्यात आली. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या जागी उज्ज्वला वनकर आणि अपर्णा सुधाकर गिते यांची नियुक्ती करण्यात आली.

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा राज्यात डंका

महाराष्ट्र पोलीस महासंचलनालय (Maharashtra police) यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सर्वोत्कृष्ट पोलीस युनिटचा मान औरंगाबादच्या ग्रामीण जिल्हा पोलीस दलाला मिळाला आहे. जानेवारी-2020 ते डिसेंबर-2020 या कालावधीतील कामगिरीचे विविध निकषांवर मूल्यांकन करून हा मान औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस दलाला देण्यात आला आहे. या काळात ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील (Mokshada Patil) यांच्या नेतृत्वात औरंगाबाद ग्रामीण युनिटचे काम चालले. नुकत्याच झालेल्या निवडीबद्दल मोक्षदा पाटील आणि संपूर्ण ग्रामीण पोलीस दलावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.

संबंधित बातम्या 

Special Story | ‘लेडी सिंघम’ मोक्षदा पाटील यांच्यासोबत लग्नाच्या बेडीत कसे अडकले आस्तिककुमार?

औरंगाबाद पोलिस दलात दिसणार ‘महिलाराज’, नव्या बदल्यांनुसार पाच प्रमुख पदावर महिला पोलिस अधिकारी