AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget Session 2026 : 11 वेळा अजित दादा यांनी अर्थसंकल्प सादर केला – सुनेत्रा पवार

| Edited By: | Updated on: Feb 23, 2026 | 8:19 AM
Share

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. येत्या ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अधिवेशनाच्या रणनीतीसाठी आज महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

Maharashtra Budget Session 2026 : 11 वेळा अजित दादा यांनी अर्थसंकल्प सादर केला - सुनेत्रा पवार
breaking news

राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. आगामी चार आठवडे राज्याची विधानसभा आणि विधान परिषद या अधिवेशनामुळे गाजणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळी ५ वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये आगामी दिवसांतील रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडेल. ज्यामध्ये विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले जाईल. यंदा शुक्रवार ६ मार्च रोजी दुपारी २ वाजता राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे, तर विधान परिषदेत वित्त राज्यमंत्री आशीष जयस्वाल अर्थसंकल्प मांडतील. यापूर्वी फडणवीसांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प वित्तमंत्री म्हणून मांडला होता. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागून राहिले आहे. यासह देश-विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Feb 2026 07:54 PM (IST)

    रोहित पवार यांना सुरक्षा द्या – निलेश लंके

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना सुरक्षा दिली पाहिजे अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची विचारपूर्वक आणि अभ्यासू मांडणी आमदार रोहित पवार यांनी केल्याचं निलेश लंकेने म्हटले आहे. त्यांनी मांडलेला घटनाक्रम लक्षात घेतला तर घातपात झाल्याचं वाटतं असं मत लंके यांनी व्यक्त केलाय. तर एखादा व्यक्ती स्पष्टवक्ता असल्याने त्याला दुर्जनांकडून त्रास होत असतो त्यामुळे अशा नेतृत्वाला सुरक्षा दिली पाहिजे असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे.

  • 22 Feb 2026 07:40 PM (IST)

    गोंदिया : डवकी–पुराडा रस्त्याची दयनीय अवस्था, 12 किमी फक्त खड्डे

    गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. देवरी तालुक्यातील डवकी ते पुराडा या सुमारे 12 किलोमीटर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांची मोठी कसरत होत आहे. या खराब रस्त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

  • 22 Feb 2026 07:36 PM (IST)

    11 वेळा अजित दादा यांनी अर्थसंकल्प सादर केला – सुनेत्रा पवार

    अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांनी म्हटले की, 11 वेळा अजित दादा यांनी अर्थसंकल्प सादर केला. दादांनी आर्थिक शिस्त तडजोड केली नाही. यंदाचा त्यांचा 12 अर्थसंकल्प ठरला असता त्यांचा पण ते सोडून गेले. पण त्यांनी आधीच तयारी सुरू केली होती. यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री सादर करतील.

  • 22 Feb 2026 07:28 PM (IST)

    नवी मुंबई : चोरी झालेला 17.96 लाखांचा जप्त मुद्देमाल नागरिकांना केला परत

    नवी मुंबईतील परिमंडळ 2 , बेलापूर अंतर्गत येणाऱ्या सीबीडी विभागातील सीबीडी, नेरूळ व एनआरआय सागरी पोलीस ठाण्यांनी विविध गुन्ह्यांत जप्त केलेला तब्बल 17 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत देण्यात आला. चोरी, हरवलेले मोबाईल, वाहन व इतर गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल योग्य तपासाअंती संबंधित नागरिकांना परत करण्यात आला.

  • 22 Feb 2026 07:17 PM (IST)

    रायगड : वरसे येथे सापडले 10 तोळे सोने

    रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वरसे येथे ग्राऊंडलगत टाकून दिलेल्या सामानातून सुमारे दहा तोळे सोने आढळून आले. या प्रकरणी रोहा पोलीस ठाणेच्या पोलिसांनी तत्पर कारवाई करत संबंधित मालकांची पडताळणी करून सोने त्यांच्या ताब्यात सुपूर्द केले.

  • 22 Feb 2026 06:41 PM (IST)

    पाशा पटेल अधून मधून राजकीय बांबू लावत असतात, अशोक चव्हाण यांची शाब्दीक कोटी

    पाशा पटेल अधून मधून राजकीय बांबू लावत असतात,पण बांबू कसा लावायचा ते सांगत चला आम्हाला अशी मिश्कील टिपण्णी भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. पाशा पटेल यांच्या बांबू मिशन वरून चव्हाण यांनी शाब्दीक कोटी केली. नांदेड येथे पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

  • 22 Feb 2026 06:17 PM (IST)

    अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या तपास चौकशीसाठी बारामतीकर एकत्र येणार

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या तपास चौकशीसाठी बारामतीकर उद्या एकवटणार आहेत. बारामतीतील प्रशासकीय भवन समोर उद्या सकाळी ११ वाजता नागरिक एकत्रित जमणार आहेत.

  • 22 Feb 2026 05:57 PM (IST)

    निफाडमध्ये कोटमगाव रेल्वे पुलाला ट्रकची धडक; हाइट गेज बसवले

    नाशिकच्या निफाड तालुक्यातील कोटमगाव येथील लासलगाव–पिंपळगाव (बसवंत) मार्गावरील रेल्वे पुलाला ट्रकची धडक बसून स्लॅबचे नुकसान झाल्याने रेल्वे प्रशासनाने पुलाखाली हाइट गेज बसवण्याचे काम सुरू केले आहे. उंची कमी झाल्यामुळे या मार्गावरील बससेवा बंद पडल्या असून ट्रॅक्टर वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी व कांदा विक्रीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डी के जगताप यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्पुरता दिलासा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे
  • 22 Feb 2026 05:40 PM (IST)

    कल्याण पश्चिम स्थानक परिसरात महिलेचा जळालेला मृतदेह सापडल्याने खळबळ

    कल्याण पश्चिम स्थानक परिसरात भरदिवसा महिलेचा जळालेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिमे स्टेशन परिसरातील महालक्ष्मी हॉटेलजवळ ही घटना घडली आहे.  महिला जळत असताना आजूबाजूचा कचरा देखील पेटला हेती. परिसरात दाट धूर पसरल्याने नागरिकांनी पोलीस आणि अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानंतर ही घटना समोर आली.

  • 22 Feb 2026 05:22 PM (IST)

    बीडमधील जीएसटी अधिकाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट, एकाविरोधात गुन्हा दाखल

    बीडमध्ये GST अधिकारी सचिन जाधवर यांचा 16 जानेवारी रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात जीएसटी विभागातीलच अधिकारी प्रदीप फाटे याच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. अद्याप आरोपी फरार आहे.

  • 22 Feb 2026 05:09 PM (IST)

    बीडमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी, सीसीटीव्हीदेखील नेले

    बीड शहरात धक्कादायक घटना घडली आहे. येथे बालेपीर परिसरातील नन्नवरे कुटुंबीय काल सायंकाळच्या सुमारास देवदर्शनासाठी बाहेर गेले होते. तेवढ्याच वेळेत अज्ञात तीन ते चार व्यक्तींनी अचानक घरावर हल्ला केला. तसेच सीसीटीव्ही तोडून घरातील साहित्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह डीव्हीआर, काही साहित्य आणि रोकड नेल्याची माहिती आहे.

  • 22 Feb 2026 04:58 PM (IST)

    गोंदियातल्या डक्की -पुराडा रस्त्याची दुरावस्था

    गोंदियातल्या डक्की -पुराडा रस्त्याची दुरावस्था

    12 किलोमीटरच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे

    वाहनचालकांना वाहन चालवताना करावी लागतीये तारेवरची कसतर

    खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला, वाहनचालक त्रस्त

    नागरिकांकडून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

  • 22 Feb 2026 04:55 PM (IST)

    बीडमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी

    बीड शहरातील बालेपीर परिसरातील नन्नवरे कुटुंबीय काल सायंकाळच्या सुमारास देवदर्शनासाठी बाहेर गेले असता अज्ञात तीन ते चार व्यक्तींनी अचानक घरावर हल्ला करत सीसीटीव्ही तोडून घरातील साहित्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह डीव्हीआर, काही साहित्य आणि रोकड नेल्याची माहिती समोर येत आहे.

  • 22 Feb 2026 04:40 PM (IST)

    …तोपर्यंत मराठा, ओबीसी वाद थांबणार नाही, नवनाथ वाघमारे यांचा मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल

    जोपर्यंत जरांगेंचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत मराठा ओबीसी वाद थांबणार नाही

    नवनाथ वाघमारे यांचा मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल

    बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात जरांगे राजकारण करत आहेत

    नवनाथ वाघमारे यांचा मनोज जरांगेंवर आरोप

    जरांगेंची प्रसिध्दी संपलेली आहे, म्हणून असे बोलत आहे – वाघमारे

  • 22 Feb 2026 04:18 PM (IST)

    भरदिवसा आढळला महिलेचा जळालेल्या अवस्थेमधील मृतदेह, कल्याणमधील धक्कादायक घटा

    कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, कल्याण पश्चिम स्थानक परिसरात भरदिवसा एका महिलेचा जळालेल्या अवस्थेमधील मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.  कल्याण पश्चिमे स्टेशन परिसरातील महालक्ष्मी हॉटेल जवळ ही  घटना घडली आहे, दरम्यान आता या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

  • 22 Feb 2026 04:01 PM (IST)

    सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार

    उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.

  • 22 Feb 2026 03:55 PM (IST)

    मनसेकडून युरिया कॉलेजबाहेर ग्रंथोत्सवाचं आयोजन

    मराठी राजभाषा दिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईच्या युरिया कॉलेजबाहेर ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात झाली आहे. मराठी भाषेतील नाना तर्हेच्या पुस्तकांची प्रदर्शने या निमित्ताने भरवण्यात आली आहेत. या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

  • 22 Feb 2026 03:45 PM (IST)

    कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात जळलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

    कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील महालक्ष्मी हॉटेलजवळ महिलेचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून महिलेनं स्वतःहून पेटवून घेतलं की कुणी पेटवलं याचा तपास सुरू आहे.

  • 22 Feb 2026 03:35 PM (IST)

    बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थापन प्रकरणी दुसऱ्या गटाचे आरोप

    बुलढाण्यातील चिखला गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केल्याप्रकरणी पोलिसांकडून निष्पाप लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे, असा आरोप दुसऱ्या गटाने केला आहे. जे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई कराच, परंतु जे निर्दोष आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका. या संपूर्ण प्रकरणाची यासाठी चौकशी व्हावी, अशी मागणी दुसऱ्या गटाने केली आहे. यासाठी शेकडो नागरिक बीबी पोलीस ठाण्यावर धडकले आहेत. उद्या दुसऱ्या गटाचा पोलीस ठाण्यावर मोर्चा धडकणार असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 22 Feb 2026 03:25 PM (IST)

    नाशिकमध्ये ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये स्वीकृत नगरसेवकांसाठी जोरदार रस्सीखेच

    नाशिकमध्ये ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये स्वीकृत नगरसेवकांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसचे तीन नगरसेवक असताना काँग्रेसकडून स्वीकृत नगरसेवकांसाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकी एक एक जागा मिळावी यासाठी दोन्ही पक्षात लॉबिंग सुरू असून स्थानिक ठाकरे यांच्या शिवसेनेकडून काँग्रेसला संधी न देण्याची भूमिका आहे. काँग्रेसकडून पक्ष श्रेष्ठींकडे स्वीकृत नगरसेवकासाठी भेटीगाठी आणि चर्चा सुरू आहेत.

  • 22 Feb 2026 03:10 PM (IST)

    स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आज नागपुरात ‘विदर्भ जनसंकल्प लॉंग मार्च’

    स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आज नागपुरात ‘विदर्भ जनसंकल्प लॉंग मार्च’ काढण्यात आला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने इतवारी परिसरातील शाहिद चौक ते महाल येथील चिटणीस पार्क पर्यंत हा लॉंग मार्च काढण्यात आला. चिटणीस पार्क मैदानात विदर्भवाद्यांकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या लॉंग मार्चमध्ये मोठ्या संख्येने विदर्भवादी सहभागी झाले होते. विदर्भावाद्यांच्या या लॉंग मार्चच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

  • 22 Feb 2026 02:55 PM (IST)

    काही दिवसाने हवा सुद्धा विकत घ्यावी लागेल- विजय वड्डेटीवार

    अडाणीला जमीन विकतायत, काय काय विकतायत आता हवा पण विकतायत त्यामुळे काही दिवसाने हवा सुद्धा विकत घ्यावी लागेल, असे विजय वड्डेटीवार म्हणाले. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रात कुठेही शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात नाही. हे सरकार आहे की कोण कुंभकरण हे सरकार आहे असे देखील ते म्हणाल्या.

  • 22 Feb 2026 02:40 PM (IST)

    पोलीस स्टेशनमध्ये होमगार्डनेच केली होमगार्डला मारहाण

    धाराशिव शहर पोलीस स्टेशन मध्येच होमगार्ड मध्ये झाला वाद झाला. प्रभारी समादेशकासह इतर दोघांकडून मारहाण झाल्याचा होमगार्ड कर्मचाऱ्याचा आरोप केला आहे. मनोज परमार असं मारहाण झालेल्या होमगार्ड कर्मचाऱ्याचं नाव आहे.

  • 22 Feb 2026 02:25 PM (IST)

    तिसरा मित्र पक्ष कुठे आहे?; भास्कर जाधव थेट बोलले

    ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत भास्कर जाधव यांनी वक्तव्य केले. सर्वांच्या मनात प्रश्न असेल की तिसरा मित्र पक्ष कुठे आहे? तिसरा पक्ष पत्रकार परिषद होई पर्यत उपस्थित राहतील. थोडा कम्युनिकेशन गॅप असल्याने त्यांना उशीर झाला असे भास्कर जाधव म्हणाले.

  • 22 Feb 2026 02:15 PM (IST)

    महाराष्ट्र प्रचंड लुटला जातोय- विजय वडेट्टीवार

    ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांची लूट होत आहे. केवळ घोषणा आणि लोकांची फसवणूक होत आहे. महाराष्ट्र प्रचंड लुटला जातोय. सरकारचं ढोंग सुरु आहे. सरकार जमीन, हवा अदानीला विकत आहे असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

  • 22 Feb 2026 01:59 PM (IST)

    इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली

    लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी आळंदी मध्ये पुन्हा एकदा फेसाळली आहे. पिंपरी चिंचवड आणि इंद्रायणी नदीच्या परिसरातील अनेक कंपन्या केमिकल युक्त पाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडत असल्याचं वारंवार स्पष्ट होऊनही या कंपन्यांवर कसलीही कारवाई होत नाही त्यामुळे सातत्याने इंद्रायणी नदीमध्ये फेस निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत.या प्रदूषण युक्त पाण्यामुळे आळंदीकर नागरिक आणि भाविकांच्या आरोग्याशी मात्र खेळ होत आहे.

  • 22 Feb 2026 01:51 PM (IST)

    बीड शहरात चारचाकी स्कॉर्पिओ गाडी चोरीला

    बीड शहरातील राजीव गांधी चौक परिसरातून गुरुवार रोजी पहाटे साडेतीनच्या दरम्यान काही चोरट्यांनी विशाल गोरख बोबडे नामक व्यक्तीची चारचाकी स्कॉर्पिओ गाडी चोरून नेली. चारचाकी स्विफ्ट कार मधुन आलेल्या अज्ञात चोरट्यांनी रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या चारचाकी स्कॉर्पिओ गाडीचे लॉक तोडून गाडी घेऊन गेली. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान शिवाजीनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

  • 22 Feb 2026 01:40 PM (IST)

    आज भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने नागपुरात मोर्चा

    इंदोरा मैदानातून भारत मुक्ती मोर्चाला सुरूवात झाली. इंदोरा मैदानात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.इंदोरा मैदान ते संविधान चौकपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. वामन मेश्राम यांच्या भारत मुक्ती मोर्चा संघटनेच्या वतीने आज मोर्चा काढण्यात येणार आहे. संघ मुख्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार होता,मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यावर संविधान चौकात मोर्चाचे समापन होणार आहे

  • 22 Feb 2026 01:30 PM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला

    बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पुन्हा उभारण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून शुक्रवारी दोन गटात वाद झाला होता. घटनास्थळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव दाखल झाले. मोठ्या संख्येने आज नागरिक चिखला गावात दाखल होत आहेत.

  • 22 Feb 2026 01:20 PM (IST)

    जाफ्राबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथे शंकर पटाचा थरार

    जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण या गावात भव्य शंकर पटाचं आयोजन करण्यात आलं होतं,जालना जिल्ह्यासह विविध भागातून बैलगाडा मालकांनी या शंकरपटात सहभाग घेत बक्षिसांची लूट केली, यावेळी तालुक्यासह विविध भागातून शंकर पटाचा थरार बघण्यासाठी बैलगाडा शर्यत प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. सध्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शंकर पटाचा थरार दिसून येत असल्याने बैलगाडा मालक वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे आणि आपल्याच बैलजोडीला बक्षीस मिळावे म्हणून जीवाच्या आकांताने बैल जोडी पळवताना पहायला मिळत आहे.

  • 22 Feb 2026 01:10 PM (IST)

    संख्या बळ नसेल तर विरोधी पक्षनेता कसं घोषित करायचं-संजय शिरसाट

    येणारा अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्या विना होयत, हे काय पहिल्यांदा होत नाही मागचे दोन-तीन अधिवेशन पाहिले तर त्यालाही विरोधी पक्ष नेता नव्हता. परंतु विरोधी पक्षनेता न होण्यामागची कारणे वेगळे आहेत तुमचं जर तुमचं जर संख्या बळ नसेल तर विरोधी पक्षनेता कसं घोषित करायचं. परंतु यांचा एकच सपाटा लागलेला असतो आम्हाला विरोधी पक्षनेता घोषित करा, तुम्ही पक्षाचे गटनेते आहात तुम्हाला पूर्ण संधी आहे तुम्ही तुमची भूमिका स्पष्टपणे मांडा, आक्रमकतेने मांडा असे मंत्री संजय शिरसाट म्हणाले.

  • 22 Feb 2026 01:01 PM (IST)

    देवजी सुद्धा पोलिसांना शरण

    माओवादी संघटनेच्या टॉप नेता म्हणून ओळख असलेल्या थीपरी तिरुपती उर्फ देवजी यांनी तेलंगाना राज्यात केला आत्मसमर्पण केले.देवजी सोबत सेंट्रल कमिटी मेंबर्स व एकूण सोडा माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. ऑपरेशन कगार च्या माध्यमानी माओवादी संघटनेंवर सतत पोलिसांच्या दबाव सुरू होता. तेलंगणा राज्यातील एस आय बी विभागाच्या पोलिसांच्या माध्यमाने आत्मसमर्पण करण्यात आले.

  • 22 Feb 2026 12:56 PM (IST)

    सोलापुरातील मोहोळ मध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला

    सोलापुरातील मोहोळ मध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला. काल मध्यरात्री शंभू प्रेमींकडून मोहोळ एसटी स्टॅन्डसमोर पुतळा उभारण्यात आलाय. परवानगी नसल्याने प्रशासनाकडून पुतळा काढण्याच्या हालचाली सुरू. मात्र पुतळा हटवण्याला स्थानिक नागरिकांनी तीव्र  विरोध केला आहे.  या ठिकाणाहून पुतळा हटवल्यास मोहोळ बंद ठेवण्याचा शंभू प्रेमीनी ईशारा दिला. पुतळा काढण्यावरुन पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • 22 Feb 2026 12:40 PM (IST)

    जालना : सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 3 लाख रुपयांचा मुद्देमाल लांपास

    जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातील भोगाव येथे मध्यरात्री चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून दोन घरे फोडल्याची घटना घडली आहे. यामध्ये चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 3 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय.शेतकरी संजय मुळे हे कुटुंबासह घरात झोपले असताना मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला त्याच वेळी आवाज आल्याने घरातले काही सदस्य जागी झाले मात्र चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत येथील मुद्देमाल लंपास केलाय. दरम्यान या प्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे

  • 22 Feb 2026 12:25 PM (IST)

    बीड शहरातील राजीव गांधी चौक परिसरातून पहाटेच्या सुमारास चारचाकी स्कॉर्पिओ गाडी चोरीला

    बीड शहरातील राजीव गांधी चौक परिसरातून गुरुवार रोजी पहाटे साडेतीनच्या दरम्यान काही चोरट्यांनी विशाल गोरख बोबडे नामक व्यक्तीची चारचाकी स्कॉर्पिओ गाडी चोरून नेली. चारचाकी स्विफ्ट कार मधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या  स्कॉर्पिओ गाडीचे लॉक तोडून गाडी पळवली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान शिवाजीनगर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

  • 22 Feb 2026 12:12 PM (IST)

    लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी आळंदी मध्ये पुन्हा एकदा फेसाळली

    लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी आळंदी मध्ये पुन्हा एकदा फेसाळली आहे. पिंपरी चिंचवड आणि इंद्रायणी नदीच्या परिसरातील अनेक कंपन्या केमिकल युक्त पाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडत असल्याचं वारंवार स्पष्ट होऊनही या कंपन्यांवर कसलीही कारवाई होत नाही त्यामुळे सातत्याने इंद्रायणी नदीमध्ये फेस निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. या प्रदूषण युक्त पाण्यामुळे आळंदीकर नागरिक आणि भाविकांच्या आरोग्याशी मात्र खेळ होत आहे.

  • 22 Feb 2026 11:55 AM (IST)

    घाटकोपरच्या आर सिटी मॉलजवळ मेट्रो 4च्या बीमला मोठे तडे

    घाटकोपरच्या आर सिटी मॉलजवळ मेट्रो 4च्या बीमला मोठे तडे. BMCकडून मेट्रो प्रशासनाला तातडीनं अॅक्शन घेण्यासंदर्भात पत्र. मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटना ताजी असतानाच याच मेट्रोमार्गावर बीमला तडे. एका नागरिकाकडून व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात आली.. आर-सिटी मॉलजवळ मेट्रो लाईन 4 च्या सुपरस्टक्चर बीममध्ये ‘मॅक्रो क्रॅक्स’ दिसून आल्याची माहिती.

  • 22 Feb 2026 11:45 AM (IST)

    बुलढाण्याच्या चिखला गावात पुन्हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला

    बुलढाण्याच्या चिखला गावात पुन्हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला… शिवभक्तांकडून रात्री पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना… पुतळ्याच्या स्थापनेवेळी शेकडो शिवभक्त उपस्थित होते… गावात पोलिसांचा बंदोबस्त…

  • 22 Feb 2026 11:35 AM (IST)

    ज्ञानेश्वरी मुंडेंच्या कुटुंबाला सरंक्षण द्या- सुळे

    महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी तपास सुरु असून काही जण ताब्यात… मात्र या टोळीतील गुंडांकडून दमदाटी सुरू, ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप… तर ज्ञानेश्वरी मुंडेंच्या कुटुंबाला सरंक्षण देण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी….

  • 22 Feb 2026 11:25 AM (IST)

    दादांच्या अपघाताच्या चौकशीप्रकरणी रोहित पवार आक्रमक

    रोहित पवारांकडून केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी… नायडूंच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार… दादांच्या अपघाताच्या चौकशीप्रकरणी रोहित पवार आक्रमक…

  • 22 Feb 2026 11:12 AM (IST)

    ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडलाय का? प्रश्नावर राऊतांचं नो कमेंट

    ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडलाय का? माध्यमांच्या प्रश्नावर संजय राऊतांचं नो कमेंट… ठाकरेंच्या युतीत आलबेल नाही का? या प्रश्नावर राऊतांनी बोलणं टाळलं…

  • 22 Feb 2026 10:50 AM (IST)

    मुंबईतील हवा प्रदूषणाचे ७ वर्षातील सर्व विक्रम मोडीत निघालेय

    गेल्या ७ वर्षांतील उच्चांकी पातळीवर वायू प्रदूषण पोहोचले असून फेब्रुवारी महिन्यात प्रदूषणाचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. AQI १९७ वर पोहोचलंय जे अतीवाईट श्रेणीत पोहेचलंय, काल एक्युआय ३४४ त्या घरात होता.. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडत असून आरोग्य तज्ज्ञांनी मास्क वापरण्याचा आणि सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिलाय…

  • 22 Feb 2026 10:40 AM (IST)

    राहुल गांधी यांच्याबाबत राऊतांचा मोठा दावा

    राहुल गांधी यांना लोकसभेच्या बाहेर काढण्याचा डाव आहे, असा गंभीर आरोप नुकताच संजय राऊत यांनी केला आहे.

  • 22 Feb 2026 10:30 AM (IST)

    विरोधी पक्षनेता पद दिले तर अनेक मुद्दे मांडले जातील- संजय राऊत

    विरोधी पक्षनेता पद दिले तर अनेक मुद्दे मांडले जातील, असेही संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी ते नरेंद्र मोदी यांचे नाव घेतानाही दिसले.

  • 22 Feb 2026 10:20 AM (IST)

    संजय राऊत यांचा अत्यंत गंभीर आरोप..

    मोदी पंतप्रधान झाल्यापासून विरोधी पक्षनेता देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

  • 22 Feb 2026 10:02 AM (IST)

    शरद पवार यांच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू

    शरद पवारांना अस्वस्थता जाणवू लागल्यामुळे शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये ऍडमिट करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

  • 22 Feb 2026 10:00 AM (IST)

    नाशिक कुंभमेळ्यात ६ हजार स्वयंसेवकांना मिळणार विशेष प्रशिक्षण; भोसला सैनिकी महाविद्यालयासोबत करार

    नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सूक्ष्म नियोजनावर भर दिला आहे. तब्बल ६ हजार स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘भोसला सैनिकी महाविद्यालया’शी अधिकृत करार करण्यात आला असून, वेगवेगळ्या टप्प्यांत विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कुंभ पर्वासारख्या महासोहळ्यात स्वच्छता, वाहतूक नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन यासह एकूण पाच महत्त्वाच्या क्षेत्रांत हे विद्यार्थी आपले योगदान देणार आहेत. कुंभमेळ्यातील गर्दीचे व्यवस्थापन आणि नागरी सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी या प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी मदत होणार आहे.

  • 22 Feb 2026 09:54 AM (IST)

    नागपुरात हिट अँड रन, पादचारी महिलेचा मृत्यू

    नागपुरात भरधाव कारने दिलेल्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाला आहे. भाग्यश्री कोठीवान (61 वर्षे) असे या मृत महिलेचे नाव आहे. तर हर्ष पालेवार वय 20 वर्षे असे कारचालकाचे नाव आहे. राणा प्रताप नगर पोलीस ठाण्याचे हद्दीतील राधे मंगलम चौक परिसरात शनिवारी रात्री हा अपघात झाला. ही कार इतकी वेगात होती की धडक बसतात महिला काही फूट दूर जाऊन पडली. तर कार विजेच्या डीपीला जाऊन धडकली. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक हर्ष याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे

  • 22 Feb 2026 09:46 AM (IST)

    12 वीच्या पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंडळ ॲक्शन मोडवर, 21 जणांची दुसऱ्या परीक्षा केंद्रावर बदली

    नागपूर : बारावीच्या पेपर फुटी प्रकरणात नागपूर विभागीय शिक्षण मंडळ ॲक्शन मोडवर आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रप्रमुखांसह 21 जणांची दुसऱ्या परीक्षा केंद्रावर बदली करण्यात आली आहे. सिव्हिल्स येथील सेंट उर्सुला हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर बारावीचे केमिस्ट्री आणि फिजिक्सचे पेपर फुटल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर दक्षतेचा भाग म्हणून या परीक्षा केंद्राचे प्रमुख विवेक आतकुरकर यांच्यासह 21 वर्गखोली पर्यवेक्षकांना दुसऱ्या परीक्षा केंद्रावर हलविण्यात आले आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय घेतल्याचे विभागीय शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे

  • 22 Feb 2026 09:38 AM (IST)

    फिजिक्सवाला क्लास राडाप्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर; परप्रांतीय शिक्षक वादातून आंदोलन

    नाशिकमधील प्रसिद्ध फिजिक्सवाला कोचिंग क्लासेसमध्ये परप्रांतीय शिक्षकांकडून होणाऱ्या कथित अरेरावीविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. या क्लासमधील शिक्षक मराठी विद्यार्थ्यांशी उद्धटपणे वागतात आणि त्यांना सक्तीने हिंदीत बोलण्यास भाग पाडतात, अशी तक्रार करत मनसे सैनिकांनी व्यवस्थापनाला जाब विचारला होता. या आंदोलनादरम्यान एका व्यक्तीला मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. ज्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन मनसे पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने आता या प्रकरणी अटकेत असलेल्या पदाधिकाऱ्यांची जामिनावर मुक्तता केली आहे.

  • 22 Feb 2026 09:26 AM (IST)

    नागपुरात आज भारत मुक्ती मोर्चा निघणार, संघ मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी नाकारली

    नागपुरात आज भारत मुक्ती मोर्चाचा मोर्चा निघणार आहे. संघ मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी पोलिसांकडे मागण्यात आली होती. मात्र संघ मुख्यालयपर्यंतची परवानगी पोलिसांनी नाकारली. त्यामुळे सध्या इंदोरा मैदान ते संविधान चौक असा मोर्चा काढण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संघ मुख्यालयपर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. ओडिशा राज्यातील बाली यात्रा मैदानात आयोजित अधिवेशन रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत मुक्ती मोर्चा आक्रमक झाला असून नागपुरात मोर्चा काढणार आहे. भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे.

  • 22 Feb 2026 09:17 AM (IST)

    नागपूर मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ करण्यासाठी प्रशासनाचे मोठे पाऊल, 300 फिटर बस सुरु करणार

    नागपूर मेट्रोच्या प्रवासी संख्या मोठी वाढ करण्यासाठी महामेट्रोने आता कंबर कसली आहे. महा मेट्रो आता 300 फिटर बसेस सुरू करणार आहे. जून अखेरपर्यंत डीपीआर तयार होणार असून राज्य सरकारकडे निधीची मागणी केली जाणार आहे. घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंत आणि स्टेशनपासून कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी 300 फीडर बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी पुणे येथील एका कंपनीची निवड करण्यात आली असून पुढील आठवड्यात त्यांना कामाचे आदेश दिले जातील. या ३०० बससाठी सुमारे 220 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी राज्य सरकारकडे निधीची मागणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 22 Feb 2026 09:09 AM (IST)

    नागपूर महापालिका निवडणूक, १२ उमेदवारांना प्रशासनाचा दणका, कारवाईची टांगती तलवार

    नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता निवडणूक खर्चाचा तपशील सादर करण्यावरून १२ उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या एकूण ९९३ उमेदवारांपैकी ९८१ जणांनी आपला अधिकृत खर्चाचा अहवाल प्रशासनाकडे वेळेत सादर केला आहे. मात्र, अद्यापही १२ उमेदवारांनी खर्चाचा हिशोब दिलेला नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रशासनाने या बाराही उमेदवारांना १५ दिवसांची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दिलेल्या मुदतीत खर्चाचा तपशील सादर करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले असून, त्यानंतरही टाळाटाळ केल्यास संबंधित उमेदवारांवर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कडक कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • 22 Feb 2026 09:02 AM (IST)

    उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद

    राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. साधारण चार आठवडे हे विधानसभा अधिवेशन गाजणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत रणनीती ठरवली जाईल, ज्यानंतर महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडेल. विशेष म्हणजे, ६ मार्च रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करतील, तर विधान परिषदेत वित्त राज्यमंत्री आशीष जयस्वाल तो मांडतील. त्यामुळे या अधिवेशनाकडे आणि त्यातील घोषणांकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Published On - Feb 22,2026 8:58 AM

Follow Us
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका.
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी.
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार.
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा.
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण.
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'.
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस...
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस....
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार.
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध.