अवैध बायोडिझेलची विक्री करणारे टँकर पकडले, बीडमध्ये 92 लाखांचा मुद्देमालही जप्त

| Updated on: Nov 20, 2021 | 4:01 PM

मस्साजोगजवळून दोन टँकर ताब्यात घेण्यात आले तर लोहा येथून आणखी एक टँकर जप्त करण्यात आला. या तीन टँकरसोबत एक जीप आणि एक कारदेखील जप्त करण्यात आली. या पाच वाहनांमधून सुमारे 92 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवैध बायोडिझेलची विक्री करणारे टँकर पकडले, बीडमध्ये 92 लाखांचा मुद्देमालही जप्त
तीन टँकर आणि दोन वाहनांतून 92 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
Follow us on

बीड : मुंबईहून नांदेडकडे अवैध बायोडिझेल (Illegal  biodiesel) घेऊन जाणारे दोन भले मोठे टँकर गुरुवारी रात्री बीडमधील मस्साजोगजवळ पकडण्यात आले. या टँकरचालकांची चौकशी केल्यानंतर नांदेडहून एक टँकर, एक जीप आणि एक कार असा सुमारे 92 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त (Beed Police) करण्यात आला. या कारवाईमुळे बायोडिझेलची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

केजमार्गे नांदेडकडे जात होते बायोडिझेल

सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांच्यासह सहकाऱ्यांनी मस्साजोगजवळ रात्री दहा वाजता सापळा रचला. दोन टँकरची तपासणी केली असता, त्यात बायोडिझेल आढळले. अधिक चौकशीत एक टँकर आधीच पुढे लोहा येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पंकज कुमावत यांनी हवालदार बालाजी दराडे, बाबासाहेबर बांगर, विकास चोपणे, सचिन अहंकारे आदी नांदेडला रवाना झाले. मस्साजोगजवळून दोन टँकर ताब्यात घेण्यात आले तर लोहा येथून आणखी एक टँकर जप्त करण्यात आला. या तीन टँकरसोबत एक जीप आणि एक कारदेखील जप्त करण्यात आली. या पाच वाहनांमधून सुमारे 92 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पाच जणांना अटक

केज पोलीस ठाण्यात याप्रकरणी सुमारे आठ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. यात शिवाजी पालवे, नागनाथ आंधळे, विक्रम फुंदल, विजय पडवळकर, सुनील डांगे यांचा समावेश आहे. पालवे व आंधळेला मस्साजोग येथे घटनास्थळावरून तर इतर तिघांना नांदेडमधून ताब्यात घेण्यात आले.

इतर बातम्या-

Bhavana Gawali : खासदार भावना गवळी यांना ईडीचं तिसरं समन्स, चौकशीला सामोरं जाणार का?

‘बैल कितीही आडमुठा असला तरी शेतकरी आपलं शेत नांगरतोच’, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना जोरदार टोला