AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवाब मलिकांच्या कुटुंबातून 3 जण महापालिका निवडणुकीच्या रिंगणात, कोणा-कोणाला राष्ट्रवादीकडून उमेदवारी?

महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं असून, या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तीन जण निवडणूक लढवणार आहेत.

नवाब मलिकांच्या कुटुंबातून 3 जण महापालिका निवडणुकीच्या रिंगणात, कोणा-कोणाला राष्ट्रवादीकडून उमेदवारी?
एकाच कुटुंबातील तीन जण निवडणुकीच्या रिंगणात Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 27, 2025 | 2:59 PM
Share

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तीन जण महापालिकेची निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, नवाब मलिक यांच्या बहीण डॉ. सईदा खान आणि कप्तान मलिक यांच्या सून बुशरा नदीम मलिक हे तिघे निवडणूक लढवणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मलिक कुटुंबातून यंदा ३ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक हे प्रभाग क्रमांक १६५, नवाब मलिक यांची बहीण डॉ. सईदा खान या प्रभाग क्रमांक १६८ तर कप्तान मलिक यांची सून बुशरा नदीम मलिक या प्रभाग क्रमांक १७० मधून निवडणूक लढणार आहेत.  कप्तान मलिक यांचा प्रभाग १७० सध्या महिला राखीव झाल्याने, कप्तान मलिक यांनी या वार्डात आपल्या सुनेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे, तर ते स्वत: प्रभाग क्रमांक १६५ मधून निवडणूक लढवणार आहेत. एकाच कुटुंबातील तीन जण निवडणूक लढवणार असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान दुसरीकडे राज्यात महापालिका निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती होणार आहे,  तर काही ठिकाणी या युतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट देखील सहभागी होणार आहे, दरम्यान जिथे राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत होणार नाही, तिथे-तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युतीसाठी अजित पवार गटाचं बोलणं सुरू होतं मात्र ही चर्चा फिसकटल्याची माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 35 उमेदवारांची नावं फायनल 

दरम्यान मुंबईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई महानगर पालिकेसाठी ३५ उमेदवारांची यादी फायनल करण्यात आली आहे.  या सर्व उमेदवारांना आज एबी फॉर्मचं वाटप करण्यात येणार आहे.   सुनील तटकरे यांनी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली होती, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?