बाळासाहेब थोरात धमकी प्रकरण, संग्राम बापू भंडारे महाराजांच स्पष्टीकरण, त्या दिवशी किर्तनात काय घडलं?

"मी नथुराम गोडसेंचा विचार वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर मांडलाय का? मांडू पण शकतो, तो ही अधिकार मला संविधानाने दिला आहे. बाळासाहेब थोरातांना अंतर्मुख करण्यासाठी, त्यांनी माझ्या विरोधात चुकीचा व्हिडिओ पसरवला. हल्ल्याच गांभीर्य त्यांनी समजून घ्यावं" असं संग्राम बापू भंडारे महाराज म्हणाले.

बाळासाहेब थोरात धमकी प्रकरण, संग्राम बापू भंडारे महाराजांच स्पष्टीकरण, त्या दिवशी किर्तनात काय घडलं?
balasaheb thorat-bhandare maharaj
| Updated on: Aug 21, 2025 | 11:14 AM

माजी आमदार बाळासाहेब थोरात यांना धमकावल्याप्रकरणी आज संगमनेरमध्ये मोर्चा निघाला आहे. किर्तनाच्यावेळी वाद सुरु झाला, त्यातून हे सर्व प्रकरण घडलं. संग्राम बापू भंडारे महाराज या वादाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांनी बाळासाहेब थोरातांवर गंभीर आरोप केले आहेत. बाळासाहेब थोरातांनी माझ्याबाबत चुकीचा व्हिडिओ पसवरला. नथुराम गोडसेंचा विचार मांडण्याचा अधिकार मला संविधानाने दिलाय असं संग्राम बापू भंडारे महाराज म्हणाले. आज या संग्राम बापू भंडारे महाराज यांनी या वादात त्यांची बाजू मांडली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलले.

“16 ऑगस्ट 2025 रोजी संगमनेर भुलेवाडी गावात माझा धर्म किर्तनाचा कार्यक्रम 9 वाजता सुरु झाला. मी भगवान तुकराम महाराजांच्या अभंगावर निरुपण सुरु केलं. काही लोक तिथे मुद्दाम भांडण्यासाठीच आले होते” असा दावा संग्राम बापू भंडारे महाराज यांनी केला. “किर्तन चालू होतं, त्यांना भांडण्यासाठी मुद्दा भेटत नव्हता. अखेर 10.30 वाजण्याच्या सुमारास एकाने चालू किर्तनात बडबडायला सुरुवात केली. मी त्यांना शांत बसण्याची विनंती केली. पण ती व्यक्ती उभी राहून बोलू लागली. त्यावेळी मी सहकाऱ्यांना विनंती केली की, यांचा काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे यांना बाजूला न्या” असं संग्राम बापू भंडारे महाराज म्हणाले.

‘जर त्या दिवशी पाच-पन्नास हिंदुत्ववादी नसते तर?’

“त्याचवेळी पाच-सहाजण एक्टिव झाले. माझ्या अंगावर धावून आले. त्याचवेळी पाच पन्नास हिंदुत्ववादी भगव्या टोप्या घालून आमचे सहकारी तिथे होते, त्यांनी जागेवरच त्यांना रोखलं. जर त्या दिवशी पाच-पन्नास हिंदुत्ववादी नसते तर?” असा प्रश्न संग्राम बापू भंडारे महाराजांनी विचारला.

वारकरी संप्रदायात नथुराम गोडसेंचे विचार कधीपासून आले? 

“मी नथुराम गोडसेंचा विचार वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर मांडलाय का? मांडू पण शकतो, तो ही अधिकार मला संविधानाने दिला आहे. बाळासाहेब थोरातांना अंतर्मुख करण्यासाठी, त्यांनी माझ्या विरोधात चुकीचा व्हिडिओ पसरवला. हल्ल्याच गांभीर्य त्यांनी समजून घ्यावं. असं हल्लेखोरांना समर्थन दिलं, तर संगमनेर पेटेल” असं संग्राम बापू भंडारे महाराज बोलले. “हल्लेखोरांच्या मागे थोरात उभे राहिले, असं नरेटिव्ह सेट झालं, तर पोरं उद्या हल्ले करतील थोरात मागे आहेत बोलतील. बाळासाहेब थोरातांनी आत्मपरिक्षण करावं. थोरातांनी 40 वर्ष संगमनेरच नेतृत्व केलं, आज एका धर्म कितर्नकारावर तुटून पडताय, थोरातांनी आत्मपरिक्षण करावं” असं संग्राम बापू भंडारे महाराज म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us