AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baramati Byelection: काँग्रेस सोडणार बारामतीवरचा दावा? सुनेत्रा पवारांचा तिसऱ्यांदा फोन, हर्षवर्धन सपकाळ काय निर्णय घेणार?

Baramati Byelection: बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. याविषयी काँग्रेस सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच याविषयीची घोषणा करण्यात येईल.

Baramati Byelection: काँग्रेस सोडणार बारामतीवरचा दावा? सुनेत्रा पवारांचा तिसऱ्यांदा फोन, हर्षवर्धन सपकाळ काय निर्णय घेणार?
बारामतीची निवडणूक बिनविरोधImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 09, 2026 | 12:26 PM
Share

Baramati Byelection: बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. याविषयी काँग्रेस सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कॉंग्रेस कडून बारामती पोटणीवडणुकीच्या संदर्भात उमेदवारी अर्ज हा माघारी घेण्यात येणार आहे. पुढील तासाभरात यासंदर्भातील निर्णय हर्षवर्धन सपकाळ घेणार आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस माघारीचे थेट संकेत दिले आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या महाविजयावर आता शिक्कामोर्तब झाले आहेत.

लवकरच निर्णयाची घोषणा

बारामती पोटनिवडणूकीतून माघार घ्यायची का? याविषयी कॉग्रेसमध्ये अंतर्गत खलबतं सुरु आहेत. काँग्रेस नेत्यांची ऑनलाईन बैठक सुरू आहेत. यामध्ये पक्ष श्रेष्ठींशी बोलून निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारी मागे घेण्याबाबत कॉंग्रेस कलेक्टीव्ह निर्णय घेण्यात येणार आहे. थोड्याच वेळात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे निर्णय जाहीर करतील . उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनही उमेदवारी मागे घेण्याकरता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदारांचे शिष्ठमंडळही कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची भेट घेत आहे. कॉंग्रेस कडून बारामती पोटणीवडणुकीच्या संदर्भात उमेदवारी अर्ज हा माघारी घेण्यात येणार. पुढील तासाभरात यासंदर्भातील निर्णय हर्षवर्धन सपकाळ जाहीर करतील.

राष्ट्रवादीचं शिष्टमंडळही भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना भेटणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार मागे घ्यावा यासाठी विनंती करणार आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेणार अशी माहिती समोर येत आहे. या बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठ्या घाडामोडी घडल्या आहेत. नेत्यांमध्ये समन्वय साधून पोटनिवडणुकीत उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया होईल.

सुनेत्रा पवार यांचा तिसऱ्यांदा फोन

अर्ज मागे घेण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा हर्षवर्धन सकपाळ यांना कालही फोन केला होता. तर आता त्यांनी तिसऱ्यांदा फोन केला आहे. अर्ज मागे घेण्यासंदर्भातला हा सुनेत्रा पवार यांचा हा तिसरा फोन असल्याची सूत्रांची माहिती आहे. रोहित पवार यांच्या भेटीनंतर काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी हर्षवर्धन सकपाळ यांची चर्चा झाली. पोट निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा सर्वस्वी अधिकार प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडेच आहेत.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून चर्चा करून बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवार मागे घेण्याबाबत चर्चा केली. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा करून दिली त्यांनीही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना उमेदवार मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे.

Follow Us
विनायक राऊत प्रकरणाला नवं वळण! सुनेच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर....
Vinayak Raut | विनायक राऊत प्रकरणाला नवं वळण! सुनेच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले...
गोमूत्र प्यायला दिलं अन् डोक्यावरचे केस... विनायक राऊतांच्या सूनेचा...
गोमूत्र प्यायला दिलं अन् डोक्यावरचे केस... विनायक राऊतांच्या सूनेचा हादरवणारा दावा; थेट....
विनायक राऊत अडचणीत! सुनेचे धक्कादायक आरोप; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
Vinayak Raut | विनायक राऊत अडचणीत! सुनेचे धक्कादायक आरोप; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
शिवसेना फोडल्याचं बक्षीस मिळालं... आता पुन्हा CM...; शिंदेंबाबत संजय..
Sanjay Raut on Eknath Shinde | शिवसेना फोडल्याचं बक्षीस मिळालं... आता पुन्हा CM...; शिंदेंबाबत संजय राऊतांचं मोठं भाकीत
मोठी बातमी! ओमराजे आणि एकानाथ शिंदेंची तातडीची बैठक; धाराशिवबाबत
मोठी बातमी! ओमराजे आणि एकानाथ शिंदेंची तातडीची बैठक; धाराशिवबाबत सर्वात मोठा निर्णय, आता....
खडसेंचा गौप्यस्फोट! शाहांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, पण...
Eknath Khadse | एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट! अमित शाहांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, पण...
सडलेलं अन्न, Unsafe Products?; स्विगी इन्स्टामार्टवर FSSAIचा मोठा दणका
ऑनलाइन अन्न मागवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! स्विगी इन्स्टामार्टवर FSSAIचा मोठा दणका
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर