AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar: कर्तृत्वान लोकप्रतिनिधी गेला… शरद पवारांचा तो सर्वात मोठा सल्ला, काँग्रेस मनावर घेणार?

Sharad Pawar on Baramati Byelection-Congress: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पडद्याआड मोठे राजकीय डावपेच सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राजकारण ढवळून निघाले आहे. याप्रकरणी आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसला मोठा सल्ला दिला आहे. काँग्रेस हा सल्ला मनावर घेणार का?

Sharad Pawar: कर्तृत्वान लोकप्रतिनिधी गेला... शरद पवारांचा तो सर्वात मोठा सल्ला, काँग्रेस मनावर घेणार?
शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ, सुनेत्रा पवार, बारामती निवडणूकImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 09, 2026 | 10:59 AM
Share

Sharad Pawar on Baramati Byelection-Congress: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षावर दबाव वाढला आहे. सुनेत्रा पवार यांनी स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दोनदा फोन करून दिलेला उमेदवार मागे घेण्याची मागणी केली आहे. तर खासदार संजय राऊतांनीहीय प्रकरणी वक्तव्य केले आहे. त्याचवेळी रोहित पवार यांनी सकाळी सपकाळांची भेट घेतली. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. तर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काँग्रेसला मोठा सल्ला दिला आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यास अवघे काही तास

बारामती पोटनिवडणूक ही आता प्रतिष्ठेची ठरली आहे. बड्या नेत्याच्या निधनानंतर त्या ठिकाणी शक्यतो इतर पक्ष उमेदवारी न देण्याची भूमिका घेतात. राज्यात यापूर्वीही अशी राजकीय संस्कृती जपण्यात आली आहे. अजितदादा पवार यांचे 28 जानेवारी रोजी निधन झाले. त्यानंतर बारामती मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केला नाही तर उद्धव सेना सुद्धा निवडणूक देण्यास इच्छुक दिसली नाही. पण काँग्रेसने येथे आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. आतापर्यंत 53 उमेदवार निवडणुकीच रिंगणात आहेत. यातील अनेक उमेदवार हे मतदारसंघा बाहेरील असल्याचे समजते. तर काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशी सर्वांनीच गळ घातली आहे. आज सकाळपासून त्यासाठी बड्या घडामोडी घडल्या आहेत. थोड्याच वेळात काँग्रेस भूमिका जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शरद पवार यांचा सल्ला ऐकणार?

आज सकाळीच रोहित पवार हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला पोहचले. त्यांनी बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. तर काँग्रेसचे उमेदवार अशोक मोरे यांनी सकाळीच शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काँग्रेसवर दबाव वाढल्याचे दिसते. काँग्रेसचे पक्ष श्रेष्ठी आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी काँग्रेसला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आणि ही निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला दिला आहे. काँगेसचे लढायचं ठरवले आहे. तो राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही त्यांना सांगू शकत नाही. पण ही जागा रिक्त झाली अपघाताने झाली. कर्तुत्वान प्रतिनिधी महाराष्ट्रातून गेला. विचारलं तर मी काँग्रेसला सल्ला देईल. ही निवडणूक बिनविरोध करणं योग्य होईल. हा निर्णय काँगेसने घ्यायचा आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?