AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल राजधानी दिल्लीतून मोठी अपडेट, दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला तीन आठवडे झाले असून, तो घातपात असल्याची शंका रोहित पवार यांनी उपस्थित केली आहे. या घटनेने राज्यात शोककळा पसरली होती. आता अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स आगीमुळे खराब झाल्याचे AAIB ने सांगितले आहे, तरीही डेटा रिकव्हरीचे काम सुरू आहे. परदेशी तज्ज्ञांची मदत घेऊन अपघाताचे गूढ उकलण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल राजधानी दिल्लीतून मोठी अपडेट, दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा...
अजित पवार यांचं विमान अपघातात निधनImage Credit source: social media
| Updated on: Feb 17, 2026 | 12:59 PM
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, दिवंगते नेते अजित पवार यांच्या निधनालाे जवळपास 3 ठावडे झाले आहेत. 28 जानेवारील बारामतीजवळ त्यांचं विमान क्रॅश झालं आणि मोठ्ठा स्फोट होऊन आग लागली. सभांसाठी ते मुंबईहून बारामतील येत होते, तेव्हाच ही दुर्दैवी घटना घडली. त्यामध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, विमानाचे पायलट सुमीत कपूर, शांभवी पाठक तसेच फ्लाईट अटेंडंट पिंकी माली या पाच जणांचा मृत्यू झाला. अजित दादांचं अकस्ामात जाणं हा संपूर्ण राज्यासाठी मोठा धक्का होता. राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. दुसऱ्या दिवशी, 29 जानेवारी रोजी बारामतीमध्येच त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजित दादांच्या जाण्यानंतर संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची मुलं पार्थ व जय पवार आणि सुनेत्रा पवार यांना तर जबर धक्का बसला. मात्र अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आता विविध शंका मनात उपस्थित होत असून त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी तर गेल्या आठवड्यात मुंबई व दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अपघातावर शंका व्यक्त केली. अजित दादांच्या विमानाचा अपघात नव्हे तर तो घातपात असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. त्यासाठी त्यांनी 28 जानेवारीचा संपूर्ण घटनाक्रमा मांडून दाखवला, तसेच काही पुरावेही सादर केले. याप्रकरणी लवकरात लवकर तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केली. एवढंच नव्हे तर अजित दादांच्या अपघाताचा खासगी गुप्तेर संस्थेकडून तपास होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली. रोहित पवार हे खासगी गुप्तहेर संस्थेकडून अपघाताबाबत तपास करून घेणार असल्याचेही समजते.

नवी अपडेट काय ?

याच दरम्यान याच अपघाता प्रकरणातबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.  अजित पवार यांच्या ज्या विमानाचा अपघात झाला, त्या विमानातील दोन्ही रेकॉर्डरवरती उच्च तापमानाचा, आगीचा दुष्परिणाम झाल्याची माहिती मिळत आहे. विमानातील दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे. ज्या देशात विमानाची बांधणी झाली, त्या देशातील अधिकृत प्रतिनिधींकडून माहिती मागवण्यात आली आहे. AAIB अर्थात Air Accident Investigation Bureau ने तशी माहिती दिली आहे.

याप्रकरणी अनेक आरोप सुरू होते. अपघातग्रस्त विमानातील डेटा नेमका रेकॉर्ड झाला आहे की नाही, जो रिकव्हरी बॉक्स आहे तो जळालेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर AAIB हे स्पष्टीकरण देण्यात आलं.  अजित दादांच्या विमान अपघातानंतर जी आग लागली, त्यानंतर जे तापमान तायर झालं, त्याचा दोन्ही डेटा रिकव्हर यावर परिणाम झाला, अशी माहिती AAIB कडून देण्यात आली. यातील डेटा रिकव्हर करण्यासाठी ब्लॅकबॉक्स दुसऱ्या देशात पाठवण्याचा विचारा सुरू होता. आज AAIB कडून हे अधिकृत रित्या सांगण्यात आलं की ज्या देशात या विमानाची बांधणी करण्यात आली, त्या देशातील अधिकृत प्रतिनिधींची मदत घेण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं.

एका रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर

एका रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर केला गेला आहे, असंही AAIB कडून सांगण्यात आलं आहे. रिकव्हर करण्याचं काम काही प्रमाणात अजून सुरू आहे, अशी माहितीही त्यांच्याकडून दिली गेली आहे. त्यामुळे रिकव्हर झालेल्या या डेटामधून नेमकी कशापद्धतीची माहिती समोर येतं ते पाहणं महत्वाचं ठरेल.

Follow Us
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल