AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गेवराईचा बंगला माझ्या नावावर पाहिजे नाही तर…नर्तकीची बीडच्या माजी उपसरपंचाला धमकी आणि थेट गाडीतच..

माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली. पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत. मात्र, एका मागून एक धक्कादायक खुलासे या प्रकरणात होताना दिसत आहेत. आता नुकताच गोविंद यांच्या कुटुंबियांनी काही गंभीर आरोप केली आहेत.

गेवराईचा बंगला माझ्या नावावर पाहिजे नाही तर...नर्तकीची बीडच्या माजी उपसरपंचाला धमकी आणि थेट गाडीतच..
Govind Barge
| Updated on: Sep 10, 2025 | 1:19 PM
Share

बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखामसाला गावात शोककळा पसलीये. गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी वयाच्या अवघ्या  34 व्या वर्षी जीवनयात्रा संपवली. मात्र, त्यांच्या आत्महत्येनंतर धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. कुटुंबियांनी थेट पोलिसात धाव घेतलीये. गोविंद बर्गे यांना कला केंद्रात जाण्याची सवय होती आणि त्यामुळेच त्यांना टोकाचे पाऊस उचलत थेट स्वत:वर गोळ्या झाडत आयुष्य संपवावे लागले. थापडीतांडा कला केंद्रात जात असताना गोविंद यांची भेट ही पूजा गायकवाड हिच्यासोबत झाली. पूजा दिसण्यास सुंदर आणि अवघ्या 21 वर्षाची. गोविंद पूजासाठी दररोजच कला केंद्रात जात. गोविंदचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता आणि त्यामधून तो चांगला पैसा कमावत. शिवाय तो राजकारणातही सक्रिय होता.

कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्या प्रेमात हळूहळू गोविंद पूर्णपणे बुडाला. तो हे देखील विसरून गेला की, त्याची एक मुलगा आणि मुलगा आहे. त्याने पूजा गायकवाडला महागडा फोन आणि कित्येक सोन्याचे दागिने प्रेमात दिले. मात्र, पूजाची नजर पडली ती म्हणजे गोविंद याच्या गेवराई येथील टोलेजंग बंगल्यावर…आणि तेथूनच खरा वाद सुरू झाला. पूजाने गोविंदच्या मागे गेवराईतील त्याचा आलिशान बंगला आपल्या नावावर करण्यासाठी तगादा लावला.

गोविंदच्या गेवराईतील त्या बंगल्यात त्याचे कुटुंब राहत. फक्त गेवराई येथील बंगलाच नाही तर पूजाने तिच्या भावाच्या नावावर गोविंदच्या नावावर असलेली पाच एकर जमीन करण्यासाठीही सांगितले. मात्र, गोविंद पूजाचे म्हणणे ऐकत नव्हता. शेवटी पूजाने गोविंदसोबत बोलणे पूर्णपणे बंद केले. गोविंद पूजाला सतत फोन करत होता आणि तिला भेटण्यासाठी प्रयत्न करत राहिला. शेवटी गोविंद हा पूजाच्या बार्शीतील सासुरेगावात पोहोचला.

तिथे दोघांची भेट झाली. मात्र, पूजा आपल्या गेवराईच्या बंगल्याच्या अटीवर ठाम होती. हेच नाही तर तिने थेट धमकी गोविंदला दिली की, तो बंगला माझ्या नावावर कर…नाही तर मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल. पूजाच्या घरातून गोविंद रात्री निघाला. मात्र, त्याने पूजाच्या घरापासून काही अंतरावरच स्वत:वर बंदूकीतून गोळी झाडली आणि आयुष्याचा शेवट केला. गोविंदच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाल्याचे सध्या बघायला मिळतंय.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?