कला केंद्र, नाच, दागिने आणि आयफोन…बीडच्या माजी उपसरपंचाने जिच्या घरासमोर स्वत:वर झाडल्या गोळ्या, ती नर्तकी कोण? जाणून घ्या…
बीडच्या माजी उपसरपंचाने स्वत:वर गोळ्या झाडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हेच नाही तर आता या प्रकरणी धक्कादायक माहिती पुढे आली असून या प्रकरणाला वेगळेच वळण लागल्याचे बघायला मिळतंय. एका नर्तकीवर गंभीर आरोप होत आहेत.

बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखामसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय 34) यांच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली. कला केंद्रातील नर्तकीच्या प्रेमात इतके जास्त खोलात गोविंद बर्गे गेले की, त्यांना तिच्याशिवाय काहीच दिसत नव्हते. गोविंद हे मागील काही वर्षांपासून थापडीतांडा येथील कला केंद्रात सातत्याने जात आणि तिथे त्यांची ओळख 21 वर्षीय नर्तकी पूजा गायकवाड हिच्यासोबत झाली. हळूहळू दोघांची ओळख इतकी जास्त वाढले की, एकमेकांच्या प्रेमात पडले. गोविंद याचे काही वर्षांपूर्वीच लग्न झाले होते आणि त्याची मोठी मुलगी नववीत तर मुलगा सहावीत शिक्षण घेतो. अगदी कमी वयातच गोविंदकडे प्लॉटिंगच्या व्यवसायातून चांगला पैसा यायला लागला. फक्त हेच नाही तर त्याने उपसरपंचपदाची निवडणूक लढवली आणि ते विजयी देखील झाले.
हातावर खेळता पैसा सुरू झाला आणि गोविंद हा कला केंद्राकडे आकर्षिक झाला. पूजा हिच्यामुळे ते दररोजच कला केंद्रात जायला लागला. पूजाला त्याने आयफोन यासोबतच काही सोन्याचे महागडे दागिनेही दिले. मात्र, पूजाच्या मागण्या सातत्याने वाढत होत्या. पूजाने पैशांसाठी त्याला त्रास देण्यास सुरूवात केली. हेच नाही तर त्याच्याशी बोलणेही बंद केले. पूजा बोलत नसल्याने गोविंदला वेड लागले. तो पूजा गायकवाड हिच्या सोलापुरातील सासुरे गावात तिला भेटण्यासाठी गेला.
पूजा काही गोष्टींवर अडली होती. ती त्याला बोलण्यास तयार नव्हती. तो व्याकूळ होत तिला समजावून सांगत राहिला. शेवटी त्याने आपल्या चारचाकी गाडीत बसून पूजाच्या घरासमोरच स्वत:वर गोळी झाडली आणि जीवनयात्रा संपवली. ज्या पूजा गायकवाडसाठी बीडच्या उपसरपंचाने आपला जीव दिला अखेर ती पूजा गायकवाड कोण हा प्रश्न अनेकांना पडलाय. पूजा गायकवाड हिने अगदी कमी वयापासूनच कला केंद्रात काम करण्यास सुरूवात केली.
पूजा ही सोलापूरच्या बार्शी गावातील सासुरे येथील रहिवासी आहे. पूजा मागील काही दिवसांपासून थापडीतांडा येथील कला केंद्रात नर्तकी म्हणून काम करत होती. त्यानंतर ती पारगाव येथीलही कला केंद्रात जात होती. यादरम्यान तिची आणि गोविंदची ओळख झाली. दोघांमध्ये सर्वकाही व्यवस्थित सुरू असताना तिने गोविंदला बोलणे बंद केले आणि त्याच्याकडे काही मागण्या केल्या. पूजाने बोलणे बंद केल्यानंतर गोविंदला काहीच सुचत नव्हते आणि त्याने थेट तिचे घर गाठले. शेवटीही काही निर्णय निघू शकला नसल्याने त्याने तिच्या घरासमोरच स्वत:वर गोळी झाली.
