अंजली दमानिया यांचं ‘त्या’ तांत्रिक मुद्द्यावर बोट, धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार ?

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुंडे यांच्या ऑफिस ऑफ प्रॉफिट प्रकरणावरून आणि तपास यंत्रणेतील हस्तक्षेपावरून प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी वाल्मिक कराड यांच्या उपचारांवर संशय व्यक्त करून त्यांच्या ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत दमानिया यांनी योग्य तपासासाठी आवाज उठवला आहे.

अंजली दमानिया यांचं त्या तांत्रिक मुद्द्यावर बोट, धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार ?
अंजली दमानिया
| Edited By: | Updated on: Jan 26, 2025 | 11:23 AM

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यातील वातावरण प्रचंड तापलं असून सामाजिक कार्यकर्त्या यांनी बीडमध्ये तळ ठोकून हे प्रकरण लावून धरलं आहे. त्यांनी वाल्मिक कराडवर रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारांबद्दल संशय व्यक्त केला आहे. मला जे रिपोर्ट कळलेत त्यामध्ये ब्लड चे सगळ्या व्यवस्थित आहेत नॉर्मल आहेत काही प्रॉब्लेम नाही, असे म्हणत उद्याच्या उद्या कराडची रवानगी परत जेलमध्ये झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. तसेच या घटनेवरून त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेवर निशाणा साधला आहे. या केसमधील अनेक मुद्यांवर बोलत त्यांनी काही तांत्रिक मुद्यावरही बोट ठेवत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

काय म्हणाल्या अंजली दमानिया ?

ऑफिस ऑफ प्रॉफिट ही गोष्ट सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. स्वतः आमदार किंवा खासदार असताना कुठल्याही यंत्रणेकडून स्वतःला किंवा परिवाराला कुठल्याही आर्थिक लाभ मिळून घेऊ शकत नाही, याला ऑफिस ऑफ प्रॉफिट असं म्हटलं जातं. पण व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिस नावाची जी कंपनी आहे, त्याच्यात धनंजय मुंडे देखील आहेत, वाल्मीक कराडही आहेत आणि राजश्री मुंडे पण आहे. राजश्री मुंडे आजपर्यंत त्याच्या डायरेक्टर देखील आहेत. एवढंच नव्हे तर धनंजय मुंडे, राजश्री मुंडे यांच्या आई हे सगळे टॉप मोस्ट शेअर होल्डर आज देखील आहेत. असं असताना व्यंकटेश्वरा आणि टर्टर लॉजिस्टिक नावाची अजून एक कंपनी आहे, या दोन्ही कंपन्यांना आर्थिक नफा महाजेनको कडून मिळतोय. च्या बॅलन्स शीट मध्ये फ्लाय अँश सेल दाखवलय, त्या बॅलन्स सीटवर धनंजय मुंडे यांची सही सुद्धा आहे. सुप्रीम कोर्ट चे रुलिंग आहेत की एक रुपया जरी मिळाला तरी, त्याला ” ऑफिस ऑफ प्रॉफिट” म्हटलं जातं. या मुद्यारून मुंडे यांचं मंत्रीपदच काय आमदारकीसुद्धा रद्द व्हायला पाहिजे, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

मी EDG संजय सक्सेना यांच्याकडे आणि DG रश्मी शुक्ला पोलीस यंत्रणकडे कागदपत्र दिले आहेत, असे सांगतानाच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही दमानिया यांनी केली. मंत्रिपद असताना महाजेन को कडून त्यांना (मुंडे) जो आर्थिक नफा मिळतोय, त्यावनरू सरळ त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल, मी कोर्टाच्या डायरेक्शनची वाट बघते, असे दमानिया म्हणाल्या.

मुंडेंच्या मंत्रिपदामुळे तपासावर परिणाम

मुंडेंच्या मंत्रिपदामुळे तपास यंत्रणेवरही परिणाम होत असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. आपल्याला ते पदोपदी दिसलं आहे, सुरुवातीला यासाठी SIT स्थापन झाली तेव्हा कौतुक वाटलं पण नीट बघितलं तर त्यामध्ये सगळे बीडचे पोलीस होते. पण त्यावरून जेव्हा पुन्हा आवाज उठवला तेव्हा चार जणांना काढण्यात आलं. मी जेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा जाऊन ती एसआयटी परत चेंज झाली. CID मागणी केली की त्यांची संपत्ती जप्त झाली पाहिजे. संपत्ती जप्त करण्याचे काम ED ला करू दे, तुम्ही तुमचं काम करा संतोष देशमुख यांची हत्या कोणी केली कोणी कट रचला हे शोधा असं दमानिया म्हणाल्या.

तपास योग्य दिशेने सुरू आहे का ?

देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने आहे असं आत्ता तरी वाटत नाही. कराड यांना बेल मिळावी याचीच पूर्ण तयारी असून त्याकडेच कल दिसतोय. ज्या दिवशी कराडला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, त्याच्या दुसऱ्या दिवशीच वकिलांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मग परत दबावामुळे तो अर्ज मागे घेण्यात आला, म्हणजेच सगळी तयारी झाली होती असा आरोप अंजली दमानिया यांनी केला. हे लोक किती लढतील, आमच्याविरोधात लढून लढून थकतील असं त्यांना वाटत असेल, पण याप्रकरणी ठोस निकाल लागत नाही तोपर्यंत आमच्यापैकी कोणीच थांबणार नाही, असा निर्धार दमानिया यांनी व्यक्त केला.