Pankaja Munde : बीडच्या परळीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उत्साह; तिरंगा फडकवत, ढोल वाजवत पंकजा मुंडेंचा रॅलीत सहभाग

| Updated on: Aug 13, 2022 | 1:41 PM

पंकजा मुंडेंनी सर्वांचे यावेळी स्वागत केले. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'भारत माता की जय' असा जयघोषदेखील करण्यात आला.

Pankaja Munde : बीडच्या परळीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उत्साह; तिरंगा फडकवत, ढोल वाजवत पंकजा मुंडेंचा रॅलीत सहभाग
परळीतल्या तिरंगा रॅलीत ढोल वाजवताना पंकजा मुंडे
Image Credit source: tv9
Follow us on

बीड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Azadi Ka Amrit Mahotsav) परळी शहरात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये स्वतः पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सहभाग घेतला असून ढोल पथकात ढोल वाजवून पंकजा मुंडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या उत्सवात सहभागी झाल्या आहेत. हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली असून यामध्ये शालेय विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, वकील सहभागी झाले आहेत. तर परळीकरदेखील या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले. सबंध परळी शहरात देशभक्तीचे वातावरण यानिमित्ताने निर्माण झाले. पंकजा मुंडे ज्या वाहनामध्ये होत्या, त्यास फुलांनी सजवण्यात आले होते. या वाहनात लहान मुलांनी, विद्यार्थ्यांनी तिरंगा घेत, स्वातंत्र्यदेवतेची वेशभूषा करत सहभाग घेतला.

हाती तिरंगा

पंकजा मुंडेंनी सर्वांचे यावेळी स्वागत केले. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘भारत माता की जय’ असा जयघोषदेखील करण्यात आला. पंकजा मुंडेंनी यावेळी तिरंगा हाती घेत, उंच फडकवत त्यास अभिवादन केले. तसेच ढोलदेखील वाजवला. विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक या रॅलीत सहभागी झाले होते. एक दिवसावर स्वातंत्र्य दिन आला आहे. त्यामुळे सगळीकडेच देशभक्तीचे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे.

पंकजा मुंडेंचा रॅलीत सहभाग

प्रीतम मुंडे यांना केले ध्वजारोहण

देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्टपर्यंत हर घर तिरंगा ही संकल्पना आमलात आणली जात आहे. त्याच अनुषंगाने आज बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी भाजपा जिल्हा कार्यालयात ध्वजारोहण केले. ध्वजारोहणानंतर बीड शहरातून विशाल रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांनी हातात ध्वज घेऊन रॅलीत सहभाग घेतला होता.

हे सुद्धा वाचा

प्रशासकीय इमारती सजल्या

प्रशासकीय इमारतीही सजल्या आहेत. बीडच्या परळी येथील शासकीय कार्यालय तिरंगी रंगात झळकत आहे. शासकीय कार्यालयावर तीन रंगाची आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. परळीतील पंचायत समिती, नगरपरिषद, तहसील कार्यालय या शासकीय कार्यालयावर तिरंगाचे ध्वज विद्युतरोषणाईद्वारे झळकत आहेत.