AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole on Chandrakant Patil : ईडी भाजपची घरगडी आहे का? चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंचा घणाघात

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रत्युत्तर दिलंय. ईडी काय भाजपची घरगडी आहे काय, असं पटोले म्हणाले. तसेच भाजपचे नेते धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) यांनी महिलांवर आक्षेपार्ह विधान केलं. त्याचाही पटोले यांनी खरपूस समाचार घेतला.

Nana Patole on Chandrakant Patil : ईडी भाजपची घरगडी आहे का? चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंचा घणाघात
नाना पटोले Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 5:08 PM
Share

भंडारा : कोल्हापुरात पोटनिवडणुका होत आहेत. महाविकास आघाडी पैसे वाटप करणार आहेत, असा आरोप चंद्रकांत दादा पाटील यांनी महाविकास आघाडीवर केला होता. याची तक्रार ईडीकडं करणार असल्याचं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil, ) म्हणाले होते. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रत्युत्तर दिलंय. ईडी काय भाजपची घरगडी आहे काय, असं पटोले म्हणाले. तसेच भाजपचे नेते धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) यांनी महिलांवर आक्षेपार्ह विधान केलं. त्याचाही पटोले यांनी खरपूस समाचार घेतला. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडी पेटीएमचा उपयोग करून मतदारांना पैसे देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकारची प्रतिक्रिया चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली. यावर बोलताना कोल्हापूरच्या निवडणुकीत भाजप हरणार आहे. भाजपचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य केले. महागाई वाढत आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न व बेरोजगारी हे प्रश्न आता समोर आले आहे. कोल्हापूरची निवडणूक भाजप हरणार आहेत. म्हणून भाजप आता रोंटी खात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय.

भाजप भ्रमित करण्याचे काम करते

‌बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत. धर्माच्या नावाने लोकांना भ्रमित करण्याचे काम भाजप करीत आहे. काँग्रेस हा जातीवाद करतो. या चंद्रकांत दादा पाटील यांच्या विधानावर बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली. धर्माच्या नावाने लोकांना भ्रमित करायचे हे काम भाजप करीत आहे. हे आता भाजपनं थांबवलं पाहिजे. आधी पोटोबा नंतर विठोबा हे आपले संत बोलून गेले आहेत. संताला न मानणारी भाजपची मानसिकता आहे. हिंदू धर्माचा वापर सत्तेसाठी करायचा. कोरोना काळात हिंदूंना वाऱ्यावर सोडून द्यायचे. गंगा नदीत मृतदेह वाहून गेले, हे प्रकार आपण पाहिले आहेत, अशीही टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली.

राज ठाकरेंचं विधान दबावापोटी

राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबद्दल जास्त प्रेम दिसून आलं. केंद्राच्या दबावाखाली तर ते वक्तव्य करीत नाहीत, असा संशय आता व्यक्त होत आहे, असंही नाना पटोले म्हणाले. सुरुवातीपासून काँग्रेसची भूमिका राज ठाकरे यांच्या बद्दल कुठल्याही मत व्यक्त करणारी नाही. पण, काल अडीच वर्षांनंतर राज ठाकरे लोकांनसमोर आलेत. काल अपेक्षा होती की बेरोजगार, महागाई व देशात सुरू असलेल्या कटकारस्थान या विषयांवर बोलतील. पण त्यांच्या भाषणात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसबद्दल जास्त प्रेम दिसून आले. स्वतः राज ठाकरे यांना ईडीचे नोटीस आली होती. अडीच वर्षांनंतर ते लोकांसमोर आले. केंद्राच्या दबावाखाली तर ते वक्तव्य करीत नाही, असा संशय आता व्यक्त होत आहे. या प्रकारची टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

Yavatmal NCP | जिल्हाध्यक्ष हटाव, राष्ट्रवादी बचाव; यवतमाळ जिल्ह्यात असंतुष्टांची बॅनरबाजी, बैठक वादळी ठरणार?

Meteor Shower or Satellite ? : वर्धेतही सापडले सिलिंडरच्या आकाराचे अवशेष, पोकळ असलेली वस्तू प्लास्टिकसारखी

Meteor Shower or Satellite ? चंद्रपुरातील पवनपारमध्ये सापडला साडेपाच किलोचा गोळा; प्रशासन करणार तपास

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.