AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मोठा जॅकपॉट; थेट मोठी घोषणा, आता मिळणार…

लाडकी बहीण योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात, तसेच इतरही काही योजना महिलांसाठी राबवण्यात येत आहेत. आता मोठी घोषणा करण्यात आली आहे.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मोठा जॅकपॉट; थेट मोठी घोषणा, आता मिळणार...
लाडक्या बहिणींसाठी नवी योजना येणार? Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 18, 2026 | 5:47 PM
Share

सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. लाडकी बहीण योजनेसोबतच सरकार महिलांसाठी इतरही काही योजना राबवत आहे. महिलांना रेशन दुकानाच्या माध्यमातून मोफत साडी देखील मिळत होती, मात्र ही योजना आता बंद झाली आहे, यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी घोषणा केली आहे.  सरकारकडे पैसे नाही, असा यात कुठला भाग नाहीये, परंतु रेशन दुकानांमधून साड्या वाटपामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र साड्या ऐवजी महिलांसाठी आम्ही आता एक वेगळी योजना राबवत आहोत, या नव्या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळणार आहे, त्यांचा फायदाच फायदा होणार आहे, अशी मोठी घोषणा यावेळी गिरीश महाजन यांनी केली आहे.  त्यासाठी सरकारला अधिक खर्च आला तरी चालेल परंतु आम्ही अशी योजना आणणार आहोत, असं यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएमध्ये येणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी सुत्रांकडून अशी देखील माहिती समोर आली आहे की, आधी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं आणि मग एनडीएमध्ये यावं अशा सूचना भाजपने राष्ट्रवादी शरद पवार गटाला केली आहे. याबाबत गिरीश महाजन यांना विचारले असता त्यावर देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबतीत मला खरं म्हणजे काहीच माहिती नाही, या संदर्भातल्या कुठल्या चर्चेमध्ये सुद्धा मी नाहीये. या सर्व गोष्टी वरिष्ठ पातळीवरून चालल्या आहेत, आमचे मुख्यमंत्री असतील, भाजपचे अध्यक्ष असतील तसेच केंद्रीय नेतृत्व असेल त्यांच्यामध्ये या संदर्भात चर्चा होत असतील, असं महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेना शिंदे गटाकडून केंद्रात तीन मंत्रिपदाची मागणी करण्यात आली आहे, अशी देखील माहिती समोर येत आहे, यावर देखील महाजन यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे जी हे दिल्लीला जातात, त्यांचा संबंध डायरेक्ट केंद्र शासनाशी आहे, मंत्र्यांशी आहे, नेत्यांशी आहे, त्यामुळे ते थेट त्यांच्याशी बोलत असतील, असं महाजन यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा