AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, भाजपचा युवा नेता फोडला; रवींद्र चव्हाणांना मोठा धक्का

Uddhav Thackeray : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंनी एका युवा नेत्याला आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, भाजपचा युवा नेता फोडला; रवींद्र चव्हाणांना मोठा धक्का
Yogendra Bhoir Join Shivsena UBT
| Updated on: Nov 22, 2025 | 5:27 PM
Share

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात पक्षांतर होताना पहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांनी महायुतीत प्रवेश केला आहे. मात्र आता भाजपचे काही पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचे समोर आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंनी एका युवा नेत्याला आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. या नेता कोण आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रवींद्र चव्हाण यांच्या निकटवर्तीय नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीत भाजपला धक्का दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेल्या योगेंद्र भोईर यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. योगेंद्र भोईर हे डोंबिवलीतील भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते. योगेंद्र यांनी आज पत्नी ट्विंकल भोईर यांच्यासह आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, उपनेते संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने, डोंबिवली शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

काय म्हणाले योगेंद्र भोईर?

योगेंद्र भोईर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत की, ‘बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्याप्रमाणे प्रगतीसाठी आपल्याला नेहमीच स्वतःमध्ये बदल करत राहावे लागतात. माझ्या आयुष्यतील कठीण असा निर्णय मला आज घ्यावा लागला तो म्हणजे भाजप परिवारामधून आज मी बाहेर पडलो आहे. माननीय रवींद्र चव्हाण साहेब माझे दादा यांच्या मागर्दर्शनाखाली नेहमीच नवनवीन गोष्टी आयुष्यात शिकायला मिळाल्या. त्यांचा सहवास मला माझ्या राजकीय वाटचालीमध्ये लाभला हा आनंद कायम मला प्रेरणा देत राहील.

मात्र ते म्हणतात ना कुठे पोहचायचं असेल तर कुठून तरी निघावं लागत म्हणूनच माझ्या वैयक्तीत पातळीवर निर्णय घेऊन मी भाजपाची साथ सोडत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये माझी राजकीय वाटचाल सुरु ठेवणार आहे.’ अशी माहिती दिली आहे. योगेंद्र भोईर यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे आता डोंबिवलीतील राजकारण बदलताना दिसणार आहे.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...