AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंना मोठा धक्का, प्रमुख नेत्याच्या राजीनाम्याने मनसेत खळबळ, भाजपमध्ये प्रवेश करणार?

Raj Thackeray : काही दिवसांनंतर राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. एका बड्या नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

राज ठाकरेंना मोठा धक्का, प्रमुख नेत्याच्या राजीनाम्याने मनसेत खळबळ, भाजपमध्ये प्रवेश करणार?
Raj ThackerayImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Nov 28, 2025 | 5:06 PM
Share

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. काही दिवसांनंतर राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वच नेते आणि पक्ष या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. या निवडणुकीत विजय मिळवून स्थानिक स्वराज्य संस्थेत आपली ताकद दाखविण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असणार आहे. मात्र आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी राजीनामा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांचा राजीनामा

पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र आता कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी राजीनामा दिला आहे. हा राज ठाकरेंना मोठा धक्का आहे. यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी मनसेची ताकद कमी झाली आहे. आता प्रकाश भोईर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी हा पक्षप्रवेश होणार असल्याचेही बोलले जात आहे.

प्रकाश भोईर आणि रवींद्र चव्हाण आले होते एकाच मंचावर

गेल्या आठवड्यात एका भूमीपूजनाच्या कार्यक्रमात प्रकाश भोईर हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सोबत एकाच मंचावर उपस्थित होते. तेव्हापासून ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची प्रमाणात चर्चा रंगली होती. त्यावेळी लवकरच प्रकाश भोईर वंदे मातरम म्हणतील असं विधान रवींद्र चव्हाण यांनी केले होते. माध्यमांनी याविषयी विचारणा केली असता प्रकाश भोईर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील वाटचाल ठरवणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता त्यांनी राज ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

प्रकाश भोईर यांनी आज जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता ते येत्या रविवारी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. असे झाल्यास आगामी निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. तर मनसेला मोठा फटका बसणार आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रकाश भोईर यांनी महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...