AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसला पुन्हा धक्का, महापालिका निवडणुकीपूर्वी मोठी बातमी

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वी पक्षांतराला वेग आला असून, महाविकास आघाडीमधील अनेक नेते आणि कार्यकर्ते महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत.

काँग्रेसला पुन्हा धक्का, महापालिका निवडणुकीपूर्वी मोठी बातमी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2025 | 9:48 PM
Share

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वी आता पक्षांतराला वेग आल्याचं पहायला मिळत आहे. याचा सर्वाधिक फटका हा महाविकास आघाडीला बसत आहे, आतापर्यंत महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये जे इनकमिंग सुरू झालं आहे, ते अजूनही सुरूच आहे. आता ठाण्यातून मोठी बातमी समोर येत आहे.

ठाण्यात काँग्रेसला धक्का बसला आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार इनकमिंग झालं आहे. काँग्रेससह विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला आहे. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची देखील उपस्थिती होती.

आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया 

दरम्यान यावेळी बोलताना आदिती तटकरे यांनी म्हटलं की, आज वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करण्याची त्यांना आवड आहे,  म्हणून त्यांनी या ठिकाणी आज पक्ष प्रवेश केला. प्रत्येक पक्षाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. अनेक वर्षांपासून आम्ही  राष्ट्रवादी पक्षाची जी ताकद आहे ती वाढवण्याचे काम आम्ही करत आहोत.   महाराष्ट्रमध्ये काम करत असताना ज्या काही महापालिका आहेत, त्या अधिकाधिक कशाप्रकारे विकसित होतील त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत, असं यावेळी तटकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, कुठलीही मतदान यादी गृहीत न धरता महिला सक्षमीकरणासाठी देखील आम्ही काम करत आहोत. अधिकाधिक महिलांना उद्योग व्यावसाय कसा करता येईल? त्यांना आर्थिक सारक्षर कसं बनवता येईल?  त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं यावेळी तटकरे यांनी म्हटलं आहे, त्यांच्या उपस्थितीमध्ये आज ठाण्यात पक्षप्रवेश पार पडला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...