AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! वाहनधारकांना मोठा झटका, इंधनाच्या दरात पुन्हा वाढ, आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू, पुण्यात CNG चे नवे दर काय?

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. काही ठिकाणी इंधनाचा तुटवडा देखील जाणवत आहे. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. वाहनधारकांच्या खिशावरील ताण वाढला आहे.

मोठी बातमी! वाहनधारकांना मोठा झटका, इंधनाच्या दरात पुन्हा वाढ, आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू, पुण्यात CNG चे नवे दर काय?
पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 27, 2026 | 8:29 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे, मात्र तरी देखील दोन्ही देशांमध्ये अजूनही संघर्ष कायम आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधीच इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला होता, त्यानंतर अमेरिकेनं देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये नाकेबंदी केली. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे आखाती देशांमधून भारतात येणारं कच्च तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे देशात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. काही ठिकाणी डिझेलची टंचाई जाणवत आहे. दरम्यान स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे कच्च तेल महाग झालं आहे, ज्याचा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे, पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे.

पुण्यामध्ये पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.  एमएनजीएलकडून सीएनजीच्या किरकोळ विक्री दरात प्रति किलो २ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे.  त्यामुळे आता सीएनजीचे दर   ९२ रुपये २५ पैशांवरून ९४ रुपये ७५ पैसे प्रति किलोवर पोहोचले आहेत. वाढलेले दर हे 27 मेच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

इनपुट गॅसच्या वाढलेल्या खर्चामुळे दरवाढ करण्यात आल्याचं एमएनजीएलकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान आता सीएनजी दरवाढीचा फटका वाहनचालकांना बसणार असून, त्यामुळे  रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांच्या प्रवासखर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.  इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ सुरूच आहे.

दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये इंधनाचे दर आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा जपून वापर करा, पेट्रोल, डिझेलची बचत करा असं आवाहन केलं होतं, त्यानंतर काही दिवसांमध्येच पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर वाढवण्यात आले. इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसताना दिसत आहे.

Follow Us
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त