AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना धक्का, शिवसेना शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश, घडामोडींना वेग

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्या या निवडणुकीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना धक्का, शिवसेना शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश, घडामोडींना वेग
Uddhav ThackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 28, 2026 | 4:41 PM
Share

नुकत्याच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या, या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं. सुरुवातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या, या निवडणुकीमध्ये भाजप हा नंबर 1 चा पक्ष ठरला होता. तर शिवसेना शिंदे गट हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होता. दरम्यान त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या, या निवडणुकांमध्ये तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. या निवडणुकांमध्ये देखील भाजप नंबर एकचा पक्ष होता, तर शिवसेना शिंदे गटाला देखील मोठं यश मिळालं. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील भाजप आणि शिवसेना शिंदे गटानेच बाजी मारली. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीदरम्यान अनेकांनी आपला पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं होतं, याचा काही प्रमाणात फटका हा शिवसेना ठाकरे गटाला देखील बसला.

आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे, डोंबिवलीमध्ये मोठा पक्ष प्रवेश झाल्याचं पहायला मिळत आहे. निवडणुका संपताच डोंबिवलीत शिवसेनेचा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.  खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे,  यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते, ठाकरे गटाच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुखांसह ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा ठाकरे गटासाठी डोंबिवलीमध्ये मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला होता, या निवडणुकीनंतर अनेकांनी शिवसेना ठकारे गटाची साथ सोडत शिवसेना शिंदे गटत आणि भाजपात प्रवेश केला, तेव्हापासून हे पक्षप्रवेश सुरूच असून, आतापर्यंत अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे,  सतत सुरू असलेलं पक्षांतर आता शिवसेना ठाकरे गटासाठी डोकेदुखीचा विषय ठरलं आहे. या पक्षांतराला आळा घालण्याचं मोठं आव्हान पक्षासमोर असणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...