मुंबई-आग्रा महामार्गानंतर आता नाशिक-पुणे “हा” महत्वाचा निर्णय, शिस्त लावण्यासाठी वाहतुक विभागाचा महत्वाचा निर्णय

नाशिक शहर हद्दीत मुंबई-आग्रा महामार्गावर गंभीर अपघात झाले होते, त्यानुसार शहराचे पोलीस आयुक्त डॉ. जयंत नाईकनवरे यांनी विशेष पथक स्थापन केले होते.

मुंबई-आग्रा महामार्गानंतर आता नाशिक-पुणे हा महत्वाचा निर्णय, शिस्त लावण्यासाठी वाहतुक विभागाचा महत्वाचा निर्णय
Image Credit source: Google
| Updated on: Oct 25, 2022 | 7:24 PM

नाशिक : तुम्ही जर नाशिक-पुणे किंवा पुणे-नाशिक (Nashik Pune Highway) असा प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. नाशिक शहर (Nashik City) हद्दीतील अपघात रोखण्यासाठी नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी मुंबई आग्रा महामार्गावर नाशिक शहर हद्दीत लेन कटिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अपघातांची संख्या कमी झाली असून सकारात्मक परिणाम दिसू लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक पुणे महामार्गाबाबत लेन कटिंग बंद चा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-आग्रा या महामार्गवार लेन कटिंग बंद मुळे गंभीर अपघात झाला नाही. नाशिकरोड परिसरातील बोधले नगर सिग्नलपासून आयुक्तालयाची हद्द संपेपर्यन्त लेन कटींग ला मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी नाशिक शहर पोलिसांचे दोन पथके तैनात असणार असून मध्यरात्री बारा ते पहाटे पाचपर्यन्त गस्तीवर असणार आहे. त्यामुळे आता मुंबई आग्रा महामार्गापाठोपाठ नाशिक पुणे महामार्ग देखील अपघात मुक्त होईल अशी अपेक्षा आहे.

नाशिक शहर हद्दीत मुंबई-आग्रा महामार्गावर गंभीर अपघात झाले होते, त्यानुसार शहराचे पोलीस आयुक्त डॉ. जयंत नाईकनवरे यांनी विशेष पथक स्थापन केले होते.

त्यानुसार मार्गावरील अपघात रोखण्यासाठी वाहतूक दुसऱ्या व तिसऱ्या लेनमधून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दरम्यान मध्यरात्री ते पहाटे पाच पर्यन्त वाहतूक पोलीसांनी गस्त देत वाहनांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करत अपघात टाळण्यात पोलिसांना यश आले आहे.

विल्होळी नाका पासून दहाव्या मैलापर्यंत महामार्गावर तीन महिन्यांत गंभीर अपघात झालेला नसून पोलीसांच्या वाहतूक विभागाच्या पथकाने यशस्वी कामगिरी केली आहे.

त्याच पथकाला आता पुढील मोहीम देण्यात आली असून नाशिक-पुणे महामार्गाला शिस्त लावण्यासाठी काम करणार आहे.

ट्रक आणि अवजड वाहनांच्या चालकांना सूचित करण्यासह रात्रभर गस्त घालून अपघात रोखण्यासाठी नाशिक पोलिसांचं वाहतूक विभागाने आता कंबर कसली आहे.

यामध्ये आता महामार्गावरून लेफ्ट साइडनेच अवजड वाहने जातील, ओव्हरटेक करताना लेन कटिंग’ करणे गैर, कार, दुचाकीस्वारांनीही ‘लेन’चे नियम पाळावे लागणार आहे.

लेनसक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी महत्त्वाची असून महामार्गावर सर्रास लेन कटिंग होत असल्याने अपघात होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.