AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाजपच्या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकांबाबत मोठा निर्णय, युती होणार की नाही?

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर भाजपच्या आढावा बैठका सुरू असून, या आढावा बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मोठी बातमी! भाजपच्या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकांबाबत मोठा निर्णय, युती होणार की नाही?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 11, 2025 | 7:20 PM
Share

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जाणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज भाजपची पश्चिम विभाग आढावा बैठक पार पडली, या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा आढावा घेण्यात आला, या बैठकी संदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?  

त्या -त्या विभागातल्या पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती याचा आम्ही आढावा घेत आहोत. आज पश्चिम महाराष्ट्राचा आढावा आम्ही पुण्यामध्ये घेतला. त्यानंतर आम्ही कोकण विभागाचा आढावा मुंबईमध्ये घेणार आहोत. या आढाव्यामध्ये मागच्या वेळी काय परिस्थिती होती, आता काय परिस्थिती आहे, याचा आम्ही आढावा घेतो. युतीच्या संदर्भात काय परिस्थिती आहे, याचा आढावा आम्ही घेतो, त्यांच्या अडचणी काय आहेत? ते आम्ही समजून घेतो. आणि पक्षाची संघटना म्हणून बूथची रचना असेल पक्षाचं संघटन असेल, अशा सगळ्या गोष्टींसंदर्भात चर्चा करून पुढचे दिशा निर्देश देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आजच्या पश्चिम महाराष्ट्राच्या आढाव्यामध्ये आमचे सर्व मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि सगळे माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, असे सगळे वेगवेगळे लोक एकत्रित होते. एका-एका जिल्हाचा आम्ही आढावा घेतला आहे, अतिशय सकारात्मक परिस्थिती आम्हाला पहायला मिळत आहे. उत्साह आहे. युतीच्या संदर्भात देखील आम्ही स्पष्ट निर्देश दिले आहेत, त्या संदर्भातील सर्व अधिकार आम्ही जिल्हा पातळीवर दिले आहेत, आणि आम्ही असं देखील सांगितलं आहे की, जिथे शक्यता असेल तिथे प्रत्येक ठिकाणी युतीचा प्रयत्न केला पाहिजे. काही ठिकाणी युती शक्यत होणार नाही, तिथे आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढू, पण जरी स्वतंत्र लढलो तरी मित्र पक्षावर टोकाची टीका करायची नाही, अशा प्रकारचे निर्देश आम्ही त्या ठिकाणी दिले आहेत. त्यामुळे त्या -त्या ठिकाणीची परिस्थिती पाहून त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...