AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांचा संदेश मिळाला! बडा नेता जरांगेच्या भेटीला जाणार, सर्व मागण्या…

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे राज्यातील एक बडा नेता जरांगे पाटीलांच्या भेटीला जाणार असल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्र्यांचा संदेश मिळाला! बडा नेता जरांगेच्या भेटीला जाणार, सर्व मागण्या...
Manoj Jarange Patil Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 28, 2026 | 2:55 PM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 30 मे रोजी पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील घडामोडींना वेग आला असतानाच, ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. उद्या मनोज जरांगे पाटीलांची भेट घेणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्याशी चर्चा केली तर ते सकारात्मक आहेत असे देखील त्यांनी म्हटले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये काय केलं याची देखील कल्पना जरांगे पाटलांना देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले विखे पाटील?

पत्रकार परिषदेत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मी जरांगे पाटीलांच्या संपर्कात आहे आणि या सगळ्या विषयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे अतिशय सकारात्मक आहेत. दोन दिवसांपूर्वी तसं पाहायला गेलो तर सातत्याने मी मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे. माझे सहकारी प्रसाद लाड माझ्या संपर्कात आहेत. मी आता उद्या त्यांना जाऊन भेटणार आहे. तसेच मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये काय काय केलं त्याची कल्पना त्यांना देणार आहे.

नेतेमंडळी सातत्याने संपर्कात

पत्रकार परिषदेत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, ते सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहेत. या संपूर्ण विषयाबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि माननीय देवेंद्र फडणवीस हे अतिशय सकारात्मक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार पातळीवर वेगाने हालचाली सुरू असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

विखे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे या प्रलंबित प्रश्नावर लवकरच काहीतरी सकारात्मक मार्ग निघेल, अशी आशा निर्माण झाली आहे. आता उद्या होणाऱ्या या महत्त्वपूर्ण भेटीत नेमकी काय चर्चा होणार आणि मनोज जरांगे पाटील यावर काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

30 मे उपोषण करणार

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत आज पत्रकार परिषद घेतली. भाजपचे नेते प्रसाद लाड हे जरांगेंना भेटायला आले होते. पण त्यानंतरही सरकार दरबारी आरक्षणासाठी काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे हे अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या बोलण्यातून उद्वेग आणि संताप दिसत होता. त्यातूनच त्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मी येत्या 30 तारखेला उपोषणा बसणार आहे. आमरण उपोषण असणार आहे. देशात झालं नसेल असं उपोषण होणार आहे. मागच्यावेळी उपोषण करताना मंडप टाकला होता. यावेळी मंडप टाकला जाणार नाही. मी सावलीत बसून उपोषण करणार नाही. असाच जाऊन बसणार आहे. मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात मी बसणार आहे. मेलो तर मेलो. कुणीही समाजबांधवांनी अंतरवलीकडे येऊ नका, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,