हसन मुश्रीफांना ईडीकडून मोठा दिलासा, मनी लॉड्रिंगच्या प्रकरणाची केस क्लोज, मोठा निर्णय

मोठी बातमी समोर येत आहे, हसन मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांना मोठा दिलासा मिळाला आहे, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील ईडीचा क्लोजर रिपोर्ट विशेष पीएमएलए न्यायालयाने मंजूर केला आहे.

हसन मुश्रीफांना ईडीकडून मोठा दिलासा, मनी लॉड्रिंगच्या प्रकरणाची केस क्लोज, मोठा निर्णय
hasan mushrif
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 05, 2026 | 8:33 PM

मोठी बातमी समोर येत आहे, हसन मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांना मोठा दिलासा मिळाला आहे, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील ईडीचा क्लोजर रिपोर्ट विशेष पीएमएलए न्यायालयाने मंजूर केला आहे. कोल्हापूरमधील सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित प्रकरणात इडीने तपास बंद करण्या संदर्भातील अहवाल विशेष पीएमएलए न्यायालयात सादर केला होता. हा अहवाल न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुळ गुन्हाच बंद झाल्याने आता मनी लॉन्ड्रिंगचा तपास पुढे सुरू ठेवण्याचे कारण नसल्याचे इडीने आपल्या अहवालामध्ये म्हटले होते, त्यानंतर आता विशेष पीएमएलए न्यायालयाने देखील हा अहवाल स्विकारला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

Loading...

हसन मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांना मोठा दिलासा मिळाला आहे,  मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील इडीचा क्लोजर रिपोर्ट विशेष पीएमएलए न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. कोल्हापूरमधील सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित प्रकरणात  इडीने तपास बंद करण्याचा अहवाल सादर केला होता. मूळ प्रकरण बंद झाल्याने मनी लॉन्ड्रिंगचा तपास पुढे सुरू ठेवण्याचे कारण नसल्याचं इडीने म्हटलं होतं.

कोल्हापूर पोलिसांनी दाखल केलेला गुन्ह्यात क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याने  इडीने  ऑगस्टमध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.  2022 मध्ये मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत दाखल प्रकरणाच्या आधारे इडीने मनी लॉन्ड्रिंगचा तपास सुरू केला होता. 2023 मध्ये शेतकऱ्यांना साखर कारखान्यात भागधारक करण्याचे आश्वासन देऊन, निधी गोळा केल्याचा मुश्रीफ कुटुंबावर आरोप झाला होता. सुमारे 40 हजार शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप होता.  यामाध्यमातून जे पैसे गोळा झाले ते सर्व पैसे मुश्रीफ यांच्या कंपन्यांकडे वळवल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला होता.  या प्रकरणात इडीने तीन वेळा छापे टाकून 2.15 कोटींच्या ठेवी आणि रोख रक्कम जप्त केली होती. या सर्व प्रकरणामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली होती. दरम्यान या प्रकरणात आता न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्विकारला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us