हसन मुश्रीफांना ईडीकडून मोठा दिलासा, मनी लॉड्रिंगच्या प्रकरणाची केस क्लोज, मोठा निर्णय
मोठी बातमी समोर येत आहे, हसन मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांना मोठा दिलासा मिळाला आहे, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील ईडीचा क्लोजर रिपोर्ट विशेष पीएमएलए न्यायालयाने मंजूर केला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, हसन मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांना मोठा दिलासा मिळाला आहे, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील ईडीचा क्लोजर रिपोर्ट विशेष पीएमएलए न्यायालयाने मंजूर केला आहे. कोल्हापूरमधील सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित प्रकरणात इडीने तपास बंद करण्या संदर्भातील अहवाल विशेष पीएमएलए न्यायालयात सादर केला होता. हा अहवाल न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुळ गुन्हाच बंद झाल्याने आता मनी लॉन्ड्रिंगचा तपास पुढे सुरू ठेवण्याचे कारण नसल्याचे इडीने आपल्या अहवालामध्ये म्हटले होते, त्यानंतर आता विशेष पीएमएलए न्यायालयाने देखील हा अहवाल स्विकारला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
