AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana : बॉक्स ऑफिसवर ‘प्रभू श्री रामांची’ कृपा, रणबीर कपूरला प्रेक्षकांची पसंती; ‘रामायण’ सिनेमानं केली बक्कळ कमाई

Ramayana Movie Box Office Collection : रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळत असून या सिनेमानं बक्कळ कमाई केली आहे.

Ramayana : बॉक्स ऑफिसवर 'प्रभू श्री रामांची' कृपा, रणबीर कपूरला प्रेक्षकांची पसंती; 'रामायण' सिनेमानं केली बक्कळ कमाई
| Updated on: Nov 05, 2026 | 8:01 PM
Share

रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित चित्रपट, ‘रामायण’ हा सिनेमा आज, ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट आधीच बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या मुख्य भूमिका असून रावणाच्या भूमिकेत यशला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया.

‘रामायण’ सिनेमाची बॉक्स ऑफिस कमाई 

SACNILC रिपोर्टनुसार सायंकाळी ६ वाजेपर्यंत चित्रपटानं 40.97 कोटी कमावले असून, 17,916 शोजमधून एकूण 48.34 कोटी कमाई केली आहे. हिंदी आवृत्तीनं 14,590 शोजमधून 29.28 कोटी कमावले आहेत. कन्नड आवृत्तीनं 926 शोमधून 5.11 कोटी कमावले. तेलुगू आवृत्तीनं 1.64 कोटींची कमाई केली. तेलुगू आवृत्तीचं 1,305 शो झाले, तर तमिळ आवृत्तीचे 699 शो झाले. मल्याळम आवृत्तीनं 396 शोमधून 86 लाख कमावले.

या चित्रपटांना ‘रामायण’ सिनेमानं मागे टाकलं

‘मिर्झापूर: द मूव्ही’ – 28.11 कोटी

‘आवारापन 2’ – 23.4 कोटी

‘वेलकम टू द जंगल’ – 19.4 कोटी

‘भूत बांगला’ – 18.31 कोटी

‘ओ रोमियो’ – 9.01 कोटी

‘बॉर्डर 2’ – 32.1 कोटी

‘कॉकटेल 2’ – 14.1 कोटी

‘है जवानी तो इश्क होना है’ – 8.65 कोटी

‘भूत बांगला’ – 18.31 कोटी

‘द ओडिसी’ – 16.07 कोटी

‘धमाल’ – 15.5 कोटी

‘राजा शिवाजी’ – 12.4 कोटी

‘पती पत्नी और वो दो’ – 4.38 कोटी

‘अल्फा’ – 9.25 कोटी

‘द वन’ – 8.12 कोटी

चित्रपटाचा दुसरा भाग कधी प्रदर्शित होणार?

‘रामायण‘ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग आधीच प्रदर्शित झाला असून, दुसरा भाग २०२८ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ईटाइम्सशी बोलताना, निर्माता नमित मल्होत्रा ​​म्हणाले, ‘आता चित्रपटाबद्दल जगभरात इतकी चर्चा होत आहे, त्यामुळे आम्हाला घाई करायची नाही. आम्हाला आमचा वेळ घ्यायचा आहे. आम्हाला पहिला भाग जसा भव्य पद्धतीनं प्रदर्शित करायचा आहे, तसाच दुसरा भागही करायचा आहे.’

या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं आहे. नमित मल्होत्रा ​​हे निर्मातेही आहेत. रणबीर कपूरनं प्रभू रामाची, साई पल्लवीनं माता सीतेची आणि यशनं रावणाची भूमिका साकारली आहे. अरुण गोविल यांनी चित्रपटात राजा दशरथाची भूमिका साकारली आहे.

Follow Us
बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं..
Pankaja Munde : बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं काय म्हणाल्या?
मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर...
Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर  ठेवली अट, म्हणाले...
दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर....
Vivekanand Patil On Farmers Loan : दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर..., विवेकानंद पाटलांचं शेतकऱ्यांना आवाहन
जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच!
Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi : जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच! मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस...
ST Employees Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस जाहीर
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
MPSC : परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं अहवालात काय?
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?