काल शरद पवारांना मोदींचा फोन, आज प्रफुल्ल पटेल भेटीला, समोर आलं मोठं कारण
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल रुग्णालयात दाखल झाले.

एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि खासदार प्रफुल पटेल ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये शरद पवारांवर उपचार सुरु आहेत. पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सध्या प्रफुल पटेल हे ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये पोहोचले आहेत. शरद पवारांना कफ आणि अशक्तपणाचा त्रास जाणवत आहे. त्याशिवाय इतर काही आरोग्यासंबंधी तपासणीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. पवारांची प्रकृती पूर्णपणे स्थीर असून सर्व नेते त्यांची भेट घेत आहेत.
याशिवाय मंत्री छगन भुजबळ यांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मंत्री छगन भुजबळांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
