AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाराज झालेल्या प्रेयसीला मनवण्यासाठी खास गाणं, 65 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय, आजी-आजोबांचं देखील आवडतं

65 वर्षांनंतरही या गाण्याची जादू कायम. प्रेमिकेच्या सौंदर्याचं वर्णन करणारं मोहम्मद रफी यांचं अजरामर गाणं आजही तरुणांचं आवडतं.

नाराज झालेल्या प्रेयसीला मनवण्यासाठी खास गाणं, 65 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय, आजी-आजोबांचं देखील आवडतं
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 05, 2026 | 7:48 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक सुंदर गाणी तयार करण्यात आली आहेत. कधी रुसलेल्या प्रेयसीची समजूत काढण्यासाठी तर कधी तिच्या सौंदर्याचं कौतुक करण्यासाठी प्रेमी आपल्या भावनांना गाण्यांतून व्यक्त करतो. असंच एक अजरामर गाणं तब्बल 65 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. विशेष म्हणजे, आजच्या Gen-Z पिढीलाही या गाण्याची भुरळ पडली आहे. ‘हुस्न वाले तेरा जवाब नहीं’ असं या लोकप्रिय गाण्याचं नाव असून, आजही जुन्या रोमँटिक गाण्यांच्या यादीत त्याला विशेष स्थान आहे.

‘हुस्न वाले तेरा जवाब नहीं’ हे गाणं 1961 मध्ये प्रदर्शित झालेल्या घराना या चित्रपटातील आहे. या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार शकील बदायुनी यांनी लिहिले होते तर संगीतकार रवी यांनी त्याला सुरेल संगीत दिले होते. मोहम्मद रफी यांच्या मधुर आवाजामुळे हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं.

या गाण्यातून प्रियकर आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याचं मनापासून कौतुक करतो. सुंदर शब्दरचना, सुरेल संगीत आणि रफी यांच्या आवाजाचा सुरेख संगम यामुळे हे गाणं आजही श्रोत्यांच्या मनात घर करून आहे.

म्हैसूरच्या वृंदावन गार्डन्समध्ये झालं होतं चित्रीकरण

या गाण्याचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचं सुंदर चित्रीकरण. म्हैसूर येथील प्रसिद्ध वृंदावन गार्डन्ससारख्या निसर्गरम्य ठिकाणी या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं होतं. सुंदर बागा, आकर्षक परिसर आणि रोमँटिक वातावरणामुळे गाण्याची दृश्यात्मक सुंदरता आणखी खुलून आली.

‘हुस्न वाले तेरा जवाब नहीं’ हे गाणं ‘घराना’ या 1961 मधील चित्रपटाचा भाग आहे. एस. एस. वासन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. हा चित्रपट तेलुगू भाषेतील ‘शांती निवासम्’ या चित्रपटाचा रिमेक होता आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.

चित्रपटात कोण होते कलाकार?

या चित्रपटात राजेंद्र कुमार आणि आशा पारेख यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. त्यांच्यासोबत राज कुमार, ललिता पवार, शोभा खोटे, आघा आणि कन्हैयालाल यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

65 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेलं ‘हुस्न वाले तेरा जवाब नहीं’ हे गाणं आजही प्रेम, सौंदर्य आणि रोमँटिक संगीताचा सुंदर अनुभव देतं. मोहम्मद रफी यांचा आवाज, शकील बदायुनी यांचे शब्द आणि रवी यांचं संगीत यामुळे या गाण्याची जादू आजही कायम आहे.

Follow Us
दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर....
Vivekanand Patil On Farmers Loan : दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर..., विवेकानंद पाटलांचं शेतकऱ्यांना आवाहन
जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच!
Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi : जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच! मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस...
ST Employees Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस जाहीर
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
MPSC : परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं अहवालात काय?
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर..
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर काही...
उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray On Gokul : उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?