मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा झटका, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, केली मोठी घोषणा
आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडून महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे.

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये पक्ष प्रवेश सुरूच आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडून महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. काही महिन्यांपासून माजी मुस्कटदाबी सुरु आहे, असा आरोपही यावेळी त्यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले दुबे?
मी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा देत आहे. मी प्राथमिक सदस्याचा देखील राजीनामा देत आहे. मी काय अचानक हा राजीनामा देत नाही. काही महिन्यांपासून माझी मुस्काटदाबी सुरु आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांना आदर्श मानून काम करत होतो. 2019 मध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. मी ईमानदारीने काम केले. पण आता पाणी वाहिले आहे. हिंदुत्वाची लाईन मला बोलता येत नाही. मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारावर चालणारा आहे. मला मनातील लाईन बोलता येत नाही. माझ्या या प्रवासाच्या डब्यात खूप कॉकरोज झाले आहेत.म्हणून मी हा डबा सोडतोय. चांगली ट्रेन मिळाली तर पकडेल. ध्रुव राठी, शर्जिल हे माझे हिरो नाहीत. स्मित मच्छार हे माझे हिरो आहेत. पण त्यांच्या समर्थनार्थ माझा पक्ष एक पोस्ट देखील करू शकत नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, हे कॉकरोज आमचे आदर्श कसे होऊ शकतात, ते ठरवणार का? माझ्या पक्षाने काय करायचे? महागाई व इतर मुद्द्यावर आपण बोलायला हवे. पण संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे अयोग्य आहे. आपले मतभेद असतील, पण व्यक्तिगत हल्ले नसावेत. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंढे यांचे एकत्रित चहा पितानाचे फोटो आपण पाहिले आहेत. मात्र आता कटुता निर्माण झाली आहे. मला पक्षातून काढल्याचे बनावट पत्र मध्यंतरी बाहेर पडले. मात्र पक्षाने याचे खंडन देखील केले नाही.
मलाच त्याचे खंडन करावे लागले. मला मनातून खूप वेदना झाल्या. आज पक्षाची विचारधारा कुठे गेली? मी कुठे गेलो तर 50 खोके बोलतील, मी अजून कुठल्याही पक्षात जात नाही
चांगली संधी मिळाली तर जाईल, पण पक्ष कुठे चालला आहे? असंही यावेळी दुबे यांनी म्हटलं आहे.