AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट… नवनीत राणा यांना उमेदवारी देणार? राष्ट्रवादीच्या भूमिकेने कुणाला झटका?

NCP on Rajya Sabha by election: राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी नवनीत राणा इच्छुक असल्याचे समोर येत आहे. तर अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्याची गोटातील वार्ता फुटली आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे समोर आले आहे. काय आहे तो मोठा ट्विस्ट?

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट... नवनीत राणा यांना उमेदवारी देणार? राष्ट्रवादीच्या भूमिकेने कुणाला झटका?
नवनीत राणा, रवी राणा, देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार, प्रफुल पटेलImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Jun 05, 2026 | 9:47 AM
Share

NCP on Navneet Rana: राजसभेच्या खासदारकीसाठी नवनीत राणा इच्छुक असल्याचे समोर आले. राणा दाम्पत्याकडून त्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे. काल नवनीत राणा आणि रवी राणा यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर नवनीत राणा यांची वर्णी लावली जाणार असल्याच्या चर्चांनी काल राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. राणा दाम्पत्याने काल विविध राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे राज्यसभेच्या जागेवर नवनीत राणा यांची अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून वर्णी लागणार का? या चर्चेने जोर धरला होता. पण आता याप्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे.

नवनीत राणा यांना उमेदवारी नाहीच?

राज्यसभेच्या पोटणीवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवनीत राणा यांना राज्यसभा देण्याची कोणतीही चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षातून अनेक जण इच्छुक आहेत. राज्यसभा उमेदवारी कोणास द्यायचा याचा निर्णय लवकरच होणार यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटी ची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे कालपासून राणा यांच्या उमेदवारीविषयी चर्चांचे जे उधाण आले होते. ते आता शमल्याचे मानले जात आहे.

पक्षातून राणांच्या नावाला विरोध

राष्ट्रवादी पक्षाकडून कुणाला राज्यसभेची उमेदवारी द्यायची याचा निर्णय पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत होणार आहे. तर नवनीत राणा यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यास पक्षातील अनेक नेत्यांचा विरोध असल्याचे मानले जात आहे. अमरावती जिल्ह्यातील राजकीय घडामोडी आणि स्थानिक नेत्यांकडून राणा यांच्या नावाला विरोध असल्याचे मानले जात आहे. आता नवनीत राणा यांचे नाव अचानक कसे पुढे आले. खरंच त्यांना राष्ट्रवादीकडून तिकीट दिले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

नवनीत राणा यांना राज्यसभेची लॉटरी?

नवनीत राणा यांना राज्यसभेची लॉटरी लागणार का ही चर्चा सुद्धा जोर धरू लागली आहे. काल राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचीही भेट घेतली. या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील रिक्त जागेसाठी नवनीत राणा यांच्या नावाचा विचार सुरू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या वाट्याची जागा राणा यांच्यासाठी सोडणार का? नवनीत राणा यांना राज्यसभेची लॉटरी लागणार का? याची चर्चा रंगली आहे.

Follow Us
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?