गोकुळच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट, उच्च न्यायालयातून सर्वात मोठी बातमी, आता पुढे काय घडणार?

गोकुळवर चार संचालक नेमण्याचा अध्यादेश शासनाकडून काढण्यात आला आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर आता न्यायालयातून एक मोठी बातमी समोर आली असून, यामुळे गोकुळच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे.

गोकुळच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट, उच्च न्यायालयातून सर्वात मोठी बातमी, आता पुढे काय घडणार?
satej patil
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 09, 2026 | 5:40 PM

गोकुळवर चार संचालक नेमण्याचा अध्यादेश शासनाकडून काढण्यात आला आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. आजच कोल्हापूरमध्ये याविरोधात सतेज पाटील यांच्या नेतृत्वात मोठा मोर्चा पार पडला आहे. त्यानंतर आता न्यायालयातून एक मोठी बातमी समोर आली असून, यामुळे गोकुळच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. उद्या ठरल्याप्रमाणे गोकुळची निवडणूक होणार आहे.  निवडून आलेल्या 25 सदस्यासोबत शासनाने नियुक्त केलेले 4 ही सदस्य मतदान करणार आहेत. मात्र शासनाने नियुक्त केलेल्या चार सदस्यांचं मतदान वेगळं ठेवलं जाणार आहे.

काय आहे निर्णय? 

Loading...

गोकुळच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. उद्या ठरल्याप्रमाणे गोकुळची निवडणूक होणार आहे.  जे सदस्य निवडून आले होते, त्या 25 सदस्यांसोबतच  शाससाने अध्यादेश काढून ज्या सदस्यांची नियुक्ती केली होती, ते सदस्य देखील मतदान करणार आहेत. मात्र शासनाने नियुक्त केलेल्या चार सदस्यांचं मतदान वेगळं ठेवलं जाणार आहे. या सर्व मतदान प्रक्रियेची व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे.  निवडणुकीनंतर निकाल देखील जाहीर होणार असून, अध्यक्ष देखील निवडला जाणार आहे.

दरम्यान  राज्य शासनाकडून करण्यात आलेली अध्यादेश स्थगिती मागणी फेटाळण्यात आलेली आहे.  अध्यादेश बरोबर की चूक हे अद्याप ठरलेले नाही.  आता या प्रकरणात पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे.  संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया ही अंतिम निकालाच्या अधिन असणार आहे. त्यामुळे आता धाकधूक चांगलीच वाढली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us