AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP Merger Update : राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? पवार साहेबांच्या पक्षातून सर्वात मोठी माहिती समोर, सगळं क्लियर केलं!

सध्या दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा सुरू नाही, असे शरद पवार यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सूत्रांना सांगितले आहे. सोबतच सध्या विलीनीकरणाची परिस्थिती नाही, असेही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे.

NCP Merger Update : राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? पवार साहेबांच्या पक्षातून सर्वात मोठी माहिती समोर, सगळं क्लियर केलं!
sunetra pawar and sharad pawar and ajit pawar and ncp mergerImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 5:28 PM
Share

NCP Merger Updates  : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अजितदादांच्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. खासदार पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात एकाच दिवशी दोन वेळा बैठक झाली. या बैठकसत्रांमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेले आहे. दरम्यान, आता दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनकरणावर सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. शरद पवार यांच्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी याबाबत सूत्रांना माहिती दिलीय.

नेमकी काय माहिती समोर आली?

सध्या दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा सुरू नाही, असे शरद पवार यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सूत्रांना सांगितले आहे. सोबतच सध्या विलीनीकरणाची परिस्थिती नाही, असेही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनकरण होणार नाही, असे आता बोलले जात आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांत काय काय घडलं?

शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर दोन दिवस रुग्णालयात उपचार करण्यात आले. ते रुग्णालयात असताना त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी अनेक महत्त्वाचे नेते रुग्णालयात दाखल झाले होते. यात अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचाही समावेश होता. त्यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या विलीकरणाच्या चर्चेला हवा मिळाली. त्यानंतर पार्थ पवार यांनीही एकाच दिवशी शरद पवारांची भेट झाली. तीन ते चार तास दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे इतरही बडे नेते उपस्थित होते.

तटकरेंनी केलेल्या विधानाने एकच खळबळ

या सर्व घडामोडी घडत असताना खासदार सुनील तटकरे यांनीही विलीनीकरण होणार होते. अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असते, असे बोलून खळबळ उडवून दिली. त्याआदी अजितदादांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर दबाव निर्माण व्हावा, यासाठी ही राजकीय खेळी खेळण्यात आली होती, असा तर्क लावला जात होता. परंतु आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांनीच विलीनीकरणावर सध्याच चर्चा नाही, असे सांगितल्याने भविष्यात नेमकं काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

Follow Us
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ, चंद्रकांत..
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप!
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना,
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना, जनावरांसाठी 500 एकरांवर चारा लागवड
मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
Vivekanad Patil At Kolhapur : मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
गोकुळच्या षडयंत्रामागे दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
Vivekanand Patil : गोकुळच्या षडयंत्रामागे पुण्याच्या दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?’; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान...
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान हक्कावरून विवेकानंद पाटील आक्रमक!
सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप....
Ramdas Kadam Vs Sunil Tatkare : सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप, औकातीत राहा, अन्यथा....