जावेद अख्तर, शबाना आझमी भाजपाच्या रडारवर, सुकून बंगल्याचा उल्लेख करून गंभीर आरोप; CJP ला पाठिंबा भोवणार?

कॉकरोच जनता पार्टीच्या आझाद मदैनावरील आंदोलनाला शिवाजी पार्कवरील काही लोकांनी विरोध दर्शवला होता. त्याचे काही व्हिडीओदेखील समोर आले होते. यावरच जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त केलं

जावेद अख्तर, शबाना आझमी भाजपाच्या रडारवर, सुकून बंगल्याचा उल्लेख करून गंभीर आरोप; CJP ला पाठिंबा भोवणार?
javed akhtar and ameet satam
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2026 | 3:27 PM

Mumbai CJP Protest : कॉकरोच जनता पार्टीने मुंबईत 2 ऑक्टोबर रोजी मोठे आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो लोकांनी भाग घेतला. देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली. विशेष म्हणजे या आंदोलनाला राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी पाठिंबा दिला. सिने क्षेत्रातील गायक विशाल दादलानी, अभिनेते नसरुद्दीन शाह, अभिनेत्री शबाना आझमी हेदेखील या आंदोलनात दिसले. दरम्यान, आता शबाना आझमी यांच्या उपस्थितीमुळे तसेच जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी या दोघांवरही सडकून टीका केली.

अमित साटम यांनी काय टीका केली?

जावेद अख्तर हे 2010 ते 2016 या काळात राज्यसभेत खासदार होते. त्यांच्या याच कार्यकाळावर साटम यांनी भाष्य केले. खासदार असताना एकही प्रकल्प पूर्ण न करू शकणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश कसा चालवायचा ते शिकवतायत, असा टोला साटम यांनी लगावला. खासदार असताना जावेद अख्तर यांनी इर्ला नाल्याच्या कामासाठी 30 कोटी खर्च केले. पण ते काम काही पूर्ण झालं नाही. जनतेचा पैसा खर्चून त्यांनी एकही प्रकल्प पूर्ण केला नाही. पण खंडाळ्यात त्यांनी सुकून नावाचा बंगला मात्र बांधून पूर्ण केला, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

Loading...

जावेद अख्तर यांची नेमकी पोस्ट काय?

कॉकरोच जनता पार्टीच्या आझाद मदैनावरील आंदोलनाला शिवाजी पार्कवरील काही लोकांनी विरोध दर्शवला होता. त्याचे काही व्हिडीओदेखील समोर आले होते. यावरच जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त केलं. जे लोक सीजेपीच्या आंदोलनाला विरोध करत आहेत, तेच लोक शिवाजी पार्कावर होणाऱ्या इतर राजकीय पक्षांच्या सभांनाही विरोध करतील, अशी अपेक्षा आहे, असं अख्तर म्हणाले होते. तर शबाना आझमी यांनी सीजेपीच्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येत सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले होते. दरम्यान, आता अमित साटम यांच्या आरोपानंतर जावेद अख्तर आणि शबाना आझमी नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us