AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळी संपताच शिक्षकांना जोर का झटका! बदलीच्या ठिकाणी रुजू व्हा अन्यथा कारवाईला सामोरे जा, ग्रामविकास विभागाच्या आदेशाने खळबळ

Maharashtra ZP Teachers Transfer: दिवाळी संपताच ग्रामविकास विभागाने शिक्षकांना मोठा झटका दिला. बदलीच्या ठिकाणी रूजू व्हा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा आदेशच धडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

दिवाळी संपताच शिक्षकांना जोर का झटका! बदलीच्या ठिकाणी रुजू व्हा अन्यथा कारवाईला सामोरे जा, ग्रामविकास विभागाच्या आदेशाने खळबळ
दिवाळी संपताच शिक्षकांना जोर का झटका! ग्रामविकास विभागाच्या आदेशाने खळबळ
| Updated on: Nov 18, 2026 | 8:20 AM
Share

Maharashtra ZP Teachers Transfer: राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांना ग्रामविकास विभागाने दणका दिला आहे. बदलीच्या ठिकाणी रुजू होणे बंधनकारक करण्यात आले आहे. बदलीनंतर रुजू न होणाऱ्या शिक्षकांची आता खैर नाही. शिक्षकांच्या बदलीबाबत ग्रामविकास विभागाने कडक पवित्रा घेतला आहे. बदली टाळण्याचे प्रयत्न महागात पडणार असल्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे. इतकेच नाही तर बदलीसाठी खटपट करणाऱ्या शिक्षकांनाही यंदा मोठी तंबी देण्यात आली आहे. काय आहे याविषयीची अपडेट?

२ लाख ३६ हजार शिक्षकांसाठी काय आदेश

राज्यात जिल्हा परिषदांच्या ६२ हजार १०५ प्राथमिक शाळा असून त्यामध्ये २ लाख ३६ हजार शिक्षक कार्यरत आहेत. बदलीच्या ठिकाणी रुजू होणे बंधनकारक करण्यात आले आहे. बदलीच्या ठिकाणी विहित मुदतीत रूजू न होणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच बदलीसाठी खटपट करणाऱ्या, दबाव आणणाऱ्या शिक्षकांनाही मोठी तंबी देण्यात आली आहे. निर्धारीत वेळेत या शिक्षकांना बदलीच्या गावी धाव घ्यावी लागणार आहे. त्यांना बदलीच्या ठिकाणी रूजू व्हावे लागणार आहे. अन्यथा कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

फेरबदली अपिलाविषयी तडक निर्देश

शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्यास फेरबदली अपिलाचा विचार होणार नाही, अशी नवीन अट जिल्हा परिषद आयुक्तांनी घातली आहे. बदलीच्या ठिकाणी रुजू न होता बदलीचे ठिकाण बदलून मिळण्यासाठी अपील करणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांना ग्रामविकास विभागाने जोरदार चाप लावला आहे. शिक्षक बदली ठिकाणी रुजू न झाल्यास बदलीसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रार अपिलाचा विचार करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश ग्रामविकास विभागाने विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

30 दिवसांच्या अपिल कालावधीत काय करावे?

गेल्या आठ वर्षांपासून राज्यात शिक्षकांच्या बदल्यांचे ऑनलाईन धोरण राबवले जात आहे. मात्र बदलीच्या ठिकाणी रुजू न होता, काही शिक्षक बदलीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी ठाण मांडून बसतात. ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे बदलीसाठी तगादा लावतात. ते बदलीच्या ठिकाणी रूजू होत नाहीत. अपिलाचे काय झाले यासाठी हे शिक्षक रोज जिल्हा परिषदेत फेऱ्या मारतात. अपिलावर 30 दिवसांमध्ये निर्णय घेणे अपेक्षित असते. मात्र 30 दिवसांमध्ये निर्णय होत नाही. पण तोपर्यंत शिक्षक कामावर हजर होत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे पडतो. शिक्षणाचा खोळंबा होतो. पण यंदा ग्रामविकास विभागाने याविषयीचा नियम कडक केला आहे. शिक्षक बदली ठिकाणी रुजू न झाल्यास बदलीसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रार अपिलाचा विचार करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश ग्रामविकास विभागाने विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

Follow Us
लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटची मुजोरी! शेतकऱ्याच्या...
लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटची मुजोरी! शेतकऱ्याच्या कुटुंबाला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल
शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांना गोळ्या घालून संपवलं, घटने...
Rajabhau Bhinge : शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांना गोळ्या घालून संपवलं, घटनेमागचं नेमकं कारण समोर?
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दीपक केसरकरांनाच विरोध; त्या घोषणाबाजीमुळे
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दीपक केसरकरांनाच विरोध; त्या घोषणाबाजीमुळे वातावरण तापलं!
हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली...
Panvel : हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली मित्राची हत्या
चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार