AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dawood Ibrahim Ancestral House: मोठी बातमी! ज्या घरात बॉम्बस्फोटांचा कट रचला तेच घर पाडणार, दाऊदच्या वडिलोपार्जित घरावर फिरणार बुलडोझर

Dawood Ibrahim Ancestral House: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे वडिलोपार्जित घर मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील पाकमोडिया लेन येथे आहे. आता BMCने या घरावर बुल्डोझर फिरवण्याचा निर्णय घेतला आहे. आज ही कारवाई होणार आहे.

Dawood Ibrahim Ancestral House: मोठी बातमी! ज्या घरात बॉम्बस्फोटांचा कट रचला तेच घर पाडणार, दाऊदच्या वडिलोपार्जित घरावर फिरणार बुलडोझर
DawoodImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 18, 2026 | 8:20 AM
Share

भेंडी बाजार हा मुंबईतील ऐतिहासिक आणि गर्दीचा भाग. येथील पाकमोडिया लेन हे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाचे जुने ठिकाण म्हणून ओळखले जाते. दाऊदचे वडील इब्राहिम कास्कर यांचे घर आणि संबंधित मुसाफिरखाना इमारत वर्षानुवर्षे वादात राहिली आहे. ही इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, तिच्या भिंती व छत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवासी आणि व्यापारी या इमारतीच्या सुरक्षिततेबाबत अनेकदा तक्रारी करत आले आहेत.

मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील पाकमोडिया लेनमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या वडिलोपार्जित घर आणि संबंधित इमारतीवर अखेर महापालिकेचा बुलडोझर चालणार आहे. हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना ही जीर्ण आणि धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्याची तयारी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे. यासंदर्भात अधिकृत नोटीस जारी करण्यात आली असून, आज तोडकामाची कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होणार आहे.

उच्च न्यायालयाने दिले आदेश

महापालिकेने इमारतीची पाहणी केल्यानंतर ती धोकादायक असल्याचे समोर आले. उच्च न्यायालयातही याबाबत याचिका दाखल झाल्या होत्या. न्यायालयाने महापालिकेला आवश्यक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यानुसार महापालिकेने अधिकृत नोटीस काढून इमारत तोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आजच्या कारवाईत बुलडोझर आणि इतर यंत्रसामग्री वापरली जाणार आहे. परिसरात सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यात आली असून, पोलिस आणि महापालिका कर्मचारी तैनात राहतील.

याच घरात रचला कट

हे दाऊद इब्राहिमचे वडिलोपार्जित घर आहे आणि १९८६ मध्ये भारतातून पलायन करण्यापूर्वी तो आणि त्याचे कुटुंब याच इमारतीत राहत होते. याच इमारतीत दाऊद इब्राहिमचे घर आणि कार्यालय होते, जिथे १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा कट रचण्यात आला होता. बीएमसीने इमारत पाडण्यासाठी १८ आणि १९ नोव्हेंबर, २०२६ या तारखा निश्चित केल्या होत्या. ही इमारत ८० वर्षांहून अधिक जुनी असून तिची अवस्था धोकादायक झाली होती. सुरक्षेच्या कारणास्तव आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ती पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. बीएमसीच्या ‘सी’ वॉर्डने १६ नोव्हेंबर, २०२६ रोजी एक नोटीस जारी करून, ही इमारत ‘सी-१’ श्रेणीतील, अत्यंत जीर्ण आणि धोकादायक असल्याचे घोषित केले आणि ती पाडण्याचे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या ३१ ऑगस्ट, २०२० च्या आदेशानुसार, ही कारवाई मोठ्या पोलीस बंदोबस्तात केली जाईल.

Follow Us
लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटची मुजोरी! शेतकऱ्याच्या...
लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटची मुजोरी! शेतकऱ्याच्या कुटुंबाला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल
शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांना गोळ्या घालून संपवलं, घटने...
Rajabhau Bhinge : शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांना गोळ्या घालून संपवलं, घटनेमागचं नेमकं कारण समोर?
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दीपक केसरकरांनाच विरोध; त्या घोषणाबाजीमुळे
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दीपक केसरकरांनाच विरोध; त्या घोषणाबाजीमुळे वातावरण तापलं!
हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली...
Panvel : हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली मित्राची हत्या
चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार