भाजपाचा बडा नेता बोलला वृक्षतोड थांबवा, थेट कर्जत भीमाशंकर..

कर्जत आणि भीमाशंकर येथील वृक्षतोडीचा मुद्दा राज्यभरात गाजत आहे. विरोधांनी याच मुद्द्यात आता सरकारला कोंडीत पकडले आहे. खोट्या गोष्टी पसरवल्या जात असल्याचे सरकारचे म्हणणे आहे, त्यातच आता भाजपाच्या बड्या नेत्याने मोठे विधान केले.

भाजपाचा बडा नेता बोलला वृक्षतोड थांबवा, थेट कर्जत भीमाशंकर..
Tree felling in Karjat Bhimashankar
| Updated on: Oct 26, 2026 | 9:39 AM

कालपासून राज्यामध्ये कर्जतमधील टोरेंट कंपनी वृक्षतोडीवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. आज आमदार आदित्य ठाकरे या ठिकाणी भेट देणार आहेत. वृक्षप्रेमींकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. कर्जत आणि भीमाशंकर अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप होत आहे. यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओही शेअर करण्यात आले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. विरोधकांनी या मुद्यावरून रान उठवले. त्यातच आता सुधीर मुनगंटीवार यांनी याच मुद्द्यात मोठे विधान केले. आता त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. विरोधकांकडून टीका केली जात असतानाच सुधीर मुनगंटीवार यांनी थेट प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेही यावर बोलताना दिसले. संदीप देशपांडे यांनीही यावर भूमिका घेतली.

आवश्यक नसताना वृक्षतोड करू नये, अशी वनविभागाची भूमिका आहे. प्रकल्पांसाठी पर्यायी जागेचा विचार केला पाहिजे. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की, आवश्यक नसताना कोणतीही वृक्षतोडू नये, ही भूमिका साधारणपणे राज्याच्या वनविभागाची भूमिका असते. केंद्र सरकारच्याही पर्यावरण विभागाची भूमिका याच पद्धतीची असते.

Loading...

जर दुसऱ्या साईटवर काम करता येत असेल तर जंगल नष्ट होण्यापासून वाचवले पाहिजे. याठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की, कोणत्याही पद्धतीची वृक्षतोड होणार नाही. मी सांगितले की, वृक्षतोडीबद्दल वनविभागाची भूमिका स्पष्ट असते. दुसऱ्या साईटवर शक्य असेल तर हे काम केले पाहिजे. वृक्षतोड कशी थांबवता आली पाहिजे, याचा शास्त्रसुद्धा अभ्यास केला पाहिजे.

सुधीर मुनगंटीवार हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यातच त्यांनी आता वृक्षतोडीच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. हा सरकारला एक प्रकारचा घरचा आहेर असल्याचे बोलले जाते. सुधीर मुनगंटीवार हे मंत्रिमंडळापासून दूर आहेत. त्यातच आता त्यांनी या मुद्द्यात आपली भूमिका स्पष्ट मांडली. मनसेकडून या मुद्दयात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मोठे विधान केले. खोटा प्रचार केला जात असल्याचे भाजपाच्या नेत्यांचे म्हणणेआहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us