सोलापूर बँक निवडणुकीत भाजप प्रणित पॅनलने विरोधकांचा सुपडा केला साप, मोहिते पाटलांना दणका..

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल पुढे आली आहेत. या निकालात भाजपाने जोरदार बाजी मारली. थेट विजय मिळवला. मंत्री जयकुमार गोरे यांनी टीका केली. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली.

सोलापूर बँक निवडणुकीत भाजप प्रणित पॅनलने विरोधकांचा सुपडा केला साप, मोहिते पाटलांना दणका..
Solapur District Central Cooperative Bank
| Updated on: Nov 27, 2026 | 12:57 PM

Solapur District Bank Election 2026 Result : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. भाजपाचा दणदणीत विजय या निवडणुकीत झाला. 18 जागांवर भाजप प्रणित पॅनलच्या उमेदवारांची निवड झाली. फक्त एका जागेवर मोहिते पाटील प्रणित पॅनलच्या उमेदवाराला विजय मिळवण्यात यश आले. सोलापूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप प्रणित सहकारी विकास पॅनलने जोरदार विजय मिळवला. विकास पॅनलने मुसंडी मारत 9 पैकी 8 जागेवर भाज प्रणित सहकारी विकास पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला. मोहित पाटील प्रणित स्वाभिमानाी शेतकरी सहकारी पॅनलला यळ मिळाले. शेवटच्या टप्प्यात फक्त एका जागेवर भाजप आणि मोहित पाटील गटामध्ये मोठी लढत बघायला मिळाली.

या निवडणुकीत 10 जागा बिनविरोधात झाला तर 9 जागेवर भाजपा प्रणित उमेदवारांचा विजय झाला. फक्त एका जागेवर मोहिते पाटील पॅनलचा उमेदवार विजयी झाला. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतमोजणी आज झाली. त्यात बँकेच्या संचालक मंडळाच्या 19 जागांपैकी 10 जागा भाजप प्रणित सहकार विकास पॅनलने बिनविरोध जिंकल्या.

Loading...

आज 9 जागांवर फैसला होणार आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत प्रमुख लढत ही भाजप प्रणित विकास पॅनल आणि मोहित पाटील यांचे स्वाभिमानी शेतकरी सहकारी पॅनलमध्येच होती. जयकुमार गोरे आणि खासदार धैयशील मोहिते पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लावली. त्यामुळे या निवडणुकीतून कोण बाजी मारणार यावर जोरदार चर्चा रंगली. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली.

अखेर भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. मोहित पाटील यांना या निवडणुकीत धक्का बसला. मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर सहकारी जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. जयकुमार गोरे  यांनी म्हटले की,  सोलापूर जिल्हा बँकेत जयकुमार गोरे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय मिळवला. गोरे यांच्या पॅनलच्या 18 जागा निवडून आल्यानंतर गोरे यांनी मतदारांचे आभार मानले आहे.

सोलापूर जिल्ह्याचे अर्थ वाहिनी योग्य हातामध्ये देण्याचे काम मतदारांनी केले.ज्यांनी सहकार बुडवला, ज्यांनी बँक बुडवली अशा लोकांनी पॅनल टाकला, आमच्या बाप-जादयाचे प्रचंड वर्चवस आहे असे जनतेला गृहीत धरण्याचा प्रयत्न केला अशा लोकांना मतदारांनी जागा दाखवली. सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीनंतर धैर्यशील मोहिते यांच्यावर गोरे यांची टीका. त्यांना थोड आत्मपरीक्षणाची गरज, स्वतःची ओळख अख्या जिल्ह्याने चोर म्हणून केले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us