भाजपा आज घेणार मोठा निर्णय, पुणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर अखेर…

राज्यातील 29 महापालिकांचा निवडणुका झाल्या असून सध्या महापाैर पदावरून चांगलीच रस्सीखेच बघायला मिळत आहे. पुणे महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. आज महापाैर पदाचे नाव फायनल होईल, असे सांगितले जात आहे.

भाजपा आज घेणार मोठा निर्णय, पुणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर अखेर...
Pune Municipal Corporation mayor
| Updated on: Feb 03, 2026 | 7:40 AM

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून महापाैरपदासाठी आरक्षण सोडत देखील निघाली. मात्र, अजूनही महापाैरपदावरून रस्सीखेच बघायला मिळत आहे. पुणे महापालिका भाजपाच्या हाती गेली. मुंबई, ठाणे, कल्याण डोबिंवली, उल्हासनगर अशा महत्वाच्या महापालिकांवर भाजपासह शिवसेना शिंदे गटाने मोठा विजय मिळाला. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने युती म्हणून या निवडणुका लढवल्या होत्या. राज्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची साथ सोडत शरद पवार यांच्या गटासोबत महापालिका निवडणुका लढल्या. मात्र, अजित पवार यांच्या पक्षाला मोठे यश मिळाले नाही. मुंबईहून बारामतीकडे निघाले असता अजित पवार यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचे निधन झाले. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्ण धुरा त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हातात आहे.

दुसरीकडे पुणे महापालिकेचे महापाैरपद पदरात पाडून घेण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. भाजपाकडून तीन नावे अंतिम अर्ज भरण्यापूर्वी जाहीर होणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत तीन नावे निश्चित करण्यात आली. आज महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वीच भाजपाकडून अंतिम नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.

भाजपाने 119 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे पालिकेत भाजपाचाच महापौर होणार आहे हे निश्चित झालं आहे. सर्वसाधारण महिला गटासाठी महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपामधील सर्वसाधारण गटातील इच्छुक महिला नगरसेवकांकडून जोरदार मोर्चा बांधणी सुरू झाली होती. आज महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

यामध्ये तीन महिला नगरसेवकांमध्ये खडकवासला मतदारसंघातून वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे तर पर्वती मतदारसंघातून मानसी देशपांडे यांचे नाव आघाडीवर आहे. आज भापजाकडून अंतिम नाव जाहीर केले जाईल. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या महापाैर पदासाठी रवी लांडगे यांचे नाव फायनल झाले असून त्यांनी अर्ज देखील भरला आहे. सलग दोन वेळा रवी लांडगे हे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.