AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Death : अजित पवारांच्या निधनानंतर आयुक्तांचा मोठा निर्णय, दोन दिवस पुणे बंद

Ajit Pawar Passes Away : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुणे शहर आज आणि उद्या असे दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Ajit Pawar Death : अजित पवारांच्या निधनानंतर आयुक्तांचा मोठा निर्णय, दोन दिवस पुणे बंद
Ajit Pawar death pune bandImage Credit source: Google
| Updated on: Jan 28, 2026 | 4:13 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. सकाळी 9 च्या सुमारात बारामती विमानतळाजवळ विमान कोसळले आणि विमानाला आग लागली. या अपघातात अजित पवार यांच्यासह पायलट आणि इतर सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. अजित दादांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 3 दिवस शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यानंतर आता अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुणे शहर आज आणि उद्या असे दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दोन दिवस पुणे बंद

अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे महानगरपालिका प्रशासनाने अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आशिया खंडातील महत्त्वाची बाजारपेठ असलेले पुणे मार्केट यार्ड देखील दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती व्यापारी असोसिएशनने दिली आहे. बारामतीतील व्यापाऱ्यांनीही कडकडीत बंद पाळला आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर ठिकाणीही बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यात अजित पवार यांना बॅनरच्या माध्यमातून श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यावर शोककळी पसरली आहे. पुण्यात अजित पवारांच्या कार्यकर्तांकडून महाराष्ट्राचा धुरंदर नेता हरपला अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. संपूर्ण शहरात सध्या दुःखद वातावरण पसरले आहे.

मुंबईतही आज शासकीय सुट्टी जाहीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 3 दिवस शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आज मुंबईत शाळा आणि कार्यालयांना शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बीएमसीने परिपत्र काढत म्हटले की, ‘अजित आशाताई अनंतराव पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या दुःखद निधनामुळे सर्व शासकीय कार्यालयांना बुधवार दि.28 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयातील अत्यावश्यक सेवा वगळून कामगार/कर्मचाऱ्यांना 28 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सु‌ट्टी राहील.’

अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.
अपघातात अजित पवार यांचा मृत्यू, रूपाली ठोंबरेंना अश्रु अनावर
अपघातात अजित पवार यांचा मृत्यू, रूपाली ठोंबरेंना अश्रु अनावर.
अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट!
अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट!.
अजित पवारांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी शारदा प्रांगणात ठेवण्यात येणार
अजित पवारांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी शारदा प्रांगणात ठेवण्यात येणार.
अजित पवार अकाली निधन; शरद पवार, प्रतिभा पवार बारामतीत
अजित पवार अकाली निधन; शरद पवार, प्रतिभा पवार बारामतीत.
अजित पवारांचे निधन; सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे बारामतीत दाखल
अजित पवारांचे निधन; सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे बारामतीत दाखल.
अजित पवारांसह विमान अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू
अजित पवारांसह विमान अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू.
अजित पवारांच्या विमान अपघाताचे भीषण CCTV फुटेज समोर
अजित पवारांच्या विमान अपघाताचे भीषण CCTV फुटेज समोर.
अजित पवार अमर रहे! रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या घोषणा
अजित पवार अमर रहे! रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या घोषणा.
अजित पवारांसह क्रू मेंबर पिंकी माळी यांचा विमान अपघातात अंत
अजित पवारांसह क्रू मेंबर पिंकी माळी यांचा विमान अपघातात अंत.