AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Hormuz strait : युद्ध काळात जळफळाटीतून अमेरिकेचा भारतावर धक्कादायक आरोप, अखेर जयशंकर यांनी दिलं स्पष्टीकरण

Indian Ships Hormuz strait : युद्ध सुरु असताना इराणने भारताच्या तेल टँकर्सना होर्मुज स्ट्रेट पार करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या पोटात दुखत असून त्यांनी धक्कादायक आरोप केले. त्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

India Hormuz strait : युद्ध काळात जळफळाटीतून अमेरिकेचा भारतावर धक्कादायक आरोप, अखेर जयशंकर यांनी दिलं स्पष्टीकरण
s jaishankar
| Updated on: Mar 16, 2026 | 1:01 PM
Share

इराणने युद्ध चालू असताना होर्मुज स्ट्रेटमध्ये अशा पद्धतीची नाकेबंदी केलीय की, ज्याने अनेक देशात तेल आणि गॅस संकट निर्माण झालय. जहाजांची वाहतूक थांबल्याने भारतासह अनेक देशांवर त्याचा परिणाम दिसून आलाय. भारताने या परिस्थितीत चर्चेचा मार्ग निवडलाय. इराणने भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना होर्मुझ पार करण्याची परवानगी दिली आहे. भारतीय जहाजांना परवानगी मिळाल्यानंतर अनके रिपोर्ट्समध्ये भारताने इराण सोबत डील केल्याचा दावा करण्यात येतोय. अमेरिका सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करत आहेत. या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारताने इराणसोबत कोणताही व्यापक किंवा ब्लँकेट करार केलेला नाही हे स्पष्ट केलय. ते एवढच म्हणाले की, जहाजांच्या वाहतुकीसाठी वेगळी चर्चा सुरु आहे.

या महत्वाच्या जलमार्गावरुन भारतीय जहाजांना सुरक्षितपणे बाहेर पडता यावं, यासाठी इराणसोबत चर्चा सुरु आहे असं रविवारी इंटरव्यूमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले. त्याचे परिणाम आपण पाहतोय असं त्यांनी सांगितलं. शनिवारी या स्ट्रेटमधून भारताचा झेंडा असलेले दोन टँकर आले. कूटनितीने काय साध्य होतं, त्याचं हे उदहारण आहे असं ते म्हणाले. दोन तेल टँकर्सना होर्मुज स्ट्रेट मधून येता यावं यासाठी भारताने इराणसोबत करार केलाय असा एनबीसी सोबत बोलताना अमेरिकेच्या ऊर्जा सचिवांनी दावा केला. अमेरिकेने एकप्रकारे जळफळाटीतून हा आरोपच केला.

काही करार केलाय का?

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, “मी त्यांच्याशी चर्चा करतोय. त्या चर्चेचे काही परिणाम आपण पाहतोय. ही प्रक्रिया सुरु आहे. यातून रिझल्ट मिळत असेल तर निश्चित मी यावर पुढेही लक्ष देईन” “भारताला हॉर्मुझ स्ट्रेट पार करण्याची परवानगी दिली. त्या बदल्यात इराणला काहीही मिळालेलं नाही” हे जयशंकर यांनी स्पष्ट केलं. दोन्ही देशांमधील व्यवहारासाठी त्यांनी इतिहासाचा हवाला दिला. ते म्हणाले की, माझ्या चर्चेचा हाच आधार होता.

ही तर फक्त सुरुवात

“भारत आणि इराणमध्ये जुने संबंध आहेत. विद्यमान स्थितीत निर्माण झालेला संघर्ष दुर्देवी आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. आमची दुसरी जहाजं सुद्धा तिथे आहेत. एकाबाजूला स्वागत करण्यासारखी स्थिती आहे, तर दुसरीकडे चर्चा सुरु आहेत” असं जयशंकर म्हणाले.

शिवालिक कच्छच्या खाडीत पोहोचलं

भारतीय झेंडा असलेला क्रूड ऑईलचा टँकर जाग लाडकी भारतात येण्यासाठी फुजैरा येथून रविवारी रवाना झाला. याआधी दोन एलपीजी टँकर शिवालिक आणि नंदा देवी यांनी शनिवारी हॉर्मुज स्ट्रेट पार केलं. शिवालिक कच्छच्या खाडीत पोहोचलं आहे. मुंद्रा बंदरात LPG टर्मिनलवर हे जहाज थांबेल.

Follow Us
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल