AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trump on Hormuz : ऐन युद्धात ट्रम्प यांना सर्वात मोठा झटका, गरजेला तीन जवळच्या मित्र देशांनी पलटी मारली, अमेरिका एकटा पडला

Trump on Hormuz : अमेरिका-इस्रायलने इराण विरुद्ध सुरु केलेलं युद्ध तिसऱ्या आठवड्यात पोहोचलय. या युद्धात अजूनपर्यंत तरी अमेरिका-इस्रायलच्या मनासारखं काहीच घडलेलं नाही. उलट दिवसेंदिवस इराणचा आत्मविश्वास वाढतोय. आता डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसलाय.

Trump on Hormuz : ऐन युद्धात ट्रम्प यांना सर्वात मोठा झटका, गरजेला तीन जवळच्या मित्र देशांनी पलटी मारली, अमेरिका एकटा पडला
US-Israel
| Updated on: Mar 16, 2026 | 12:02 PM
Share

अमेरिका-इस्रायलने युद्ध पुकारल्यापासून इराणने हॉमुर्झ स्ट्रेट बंद करुन ठेवला आहे. परिणामी तिथून तेल आणि गॅसची वाहतूक होत नाहीय. भारताच्या विनंती नंतर इराणने तिथून भारताच्या तेलवाहू जहाजांना जाण्याची परवानगी दिलीय. जगातील 20 टक्के तेलाची वाहतूक याच हॉमुर्झ स्ट्रेट मधून होते. हा समुद्री मार्ग बंद राहिल्यास जगासमोर तेल संकटाची समस्या अजून गंभीर होईल. म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी Hormuz Strait च्या सुरक्षेसाठी आपल्या मित्र देशांना तिथे युद्धनौक पाठवण्याची विनंती केली होती. हॉमुर्झ स्ट्रेट मधून येणार्‍या तेलाच्या जहाजांना संरक्षण मिळावं हा त्यांचा उद्देश होता. अमेरिकेलाही हॉमुर्झची कोंडी फोडता येत नाहीय.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आर-पारच्या मूडमध्ये आहेत. कोण-कोणते देश आमची विनंती धुडकावतात. आमच्या मदतीसाठी युद्धनौका पाठवत नाहीत ते मला पहायचय असं ट्रम्प म्हणालेत. जपानसह ऑस्ट्रेलिया आणि तुर्कीने होर्मुज मध्ये आपल्या युद्धनौका पाठवायला नकार दिलाय.

युद्धाचा हा तिसरा आठवडा

होर्मुजमध्ये इराणने दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांना युद्धनौका पाठवण्याचं आवाहन केलं होतं. होर्मुजवर लक्ष ठेवण्यासाठी अन्य देशांकडून सहकार्य मिळवण्यासाठी चर्चा सुरु आहे असं डोनाल्ड ट्रम्प एअरफोर्स वनमध्ये बोलताना बोलले. त्यांनी सांगितलं की, त्यांचं प्रशासन Hormuz Strait च्या सुरक्षेसाठी सात देशांसोबत चर्चा करत आहे. युद्धाचा हा तिसरा आठवडा आहे.क्षेत्रीय स्थिरता आणि जागतिक ऊर्जा बाजारावरील प्रभाव या मुद्यांवर त्यांनी भर दिला.

याचं उत्तर देणं कठीण

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज स्ट्रेटमधून जहाजांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी वॉरशिप पाठवायला सांगितली आहे. पण आम्ही या ऑपरेशनचा विचार करत नाहीय असं जपानचं म्हणणं आहे. “अजूनपर्यंत तरी होर्मुज स्ट्रेटमध्ये जहाजांना सुरक्षा देण्यासाठी नौदल पाठवण्यासाठी अमेरिकेकडून अधिकृत विनंती पत्र मिळालेलं नाही. त्यामुळे याचं उत्तर देणं कठीण आहे” असं जपानचे पंतप्रधान म्हणाले.

फ्रान्सची भूमिका काय?

दुसरीकडे एएफपीच्या रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलियाने, ट्रम्प यांनी विनंती केली तरी होमुर्ज स्ट्रेट मध्ये युद्धनौका पाठवणार नाही असं म्हटलय. अमेरिकेचा नाटोमधील पार्टनर तुर्कीचे आधीच युद्धापासून हात झटकले आहेत. दक्षिण कोरिया मात्र गांभीर्याने विचार करतोय की, होर्मुज स्ट्रेटमध्ये आपली युद्धनौका पाठवायची की नाही?. फक्त जपान, तुर्की आणि ऑस्ट्रेलियाच नाही, फ्रान्सच्या संरक्षण मंत्री कॅथरीन वॉट्रिन यांनी ट्रम्प यांच्या विनंतीचा विषय झटक्यात संपवला. ‘जो पर्यंत युद्ध वाढत जाईल, फ्रान्स हॉर्मुझ स्ट्रेटमध्ये आपल्या युद्धनौका नाही पाठवणार’ असं त्या म्हणाल्या. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा झटका आहे.

Follow Us
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली