AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपसरपंच आत्महत्या प्रकरणातील कला केंद्राची नर्तिकी वेश्याव्यवसायात? पोलीस स्टेशनच्या समोरच… सेक्स रॅकेटने शहरच हादरलं

बीड जिल्ह्यातील गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य नर्तिकेचे देखील या सेक्स रॅकेटमध्ये नाव आले आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया...

उपसरपंच आत्महत्या प्रकरणातील कला केंद्राची नर्तिकी वेश्याव्यवसायात? पोलीस स्टेशनच्या समोरच... सेक्स रॅकेटने शहरच हादरलं
गोविंद बर्गेImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 16, 2026 | 2:27 PM
Share

माढा तालुक्यातील मोडनिंब येथे पोलीस स्टेशनच्या अवघ्या काही मीटर अंतरावर सुरू असलेल्या ‘स्वरांजली कला केंद्र’ या नावाखाली चालणाऱ्या भयानक सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल आत्राम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १५ मार्च रोजी या कला केंद्रावर छापा टाकून २५ तरुणींची मुक्तता केली. एका महिलेसह पाच जणांवर मानवी तस्करी व अनैतिक व्यापाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोविंद बर्गे प्रकरणातील नर्तकीचे नाव

मात्र, या प्रकरणातील सर्वात मोठा धक्का म्हणजे बीड जिल्ह्यातील गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य नर्तिकेचा समावेश पिडित महिलांमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. सासुरवाडी (ता. बार्शी) येथे गोळी झाडून आत्महत्या केलेल्या उपसरपंच बर्गे यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल असलेली ही नर्तिका मोडनिंब येथील कला केंद्रात वेश्याव्यवसायात अडकलेली आढळली. या एका घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

कलाकेंद्राच्या नावाखाली काळे धंदे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘स्वरांजली कला केंद्र’ हे फक्त नाव होते. पण त्यामागे अनेक काळेधंदे सुरु होते. प्रत्यक्षात येथे तरुणींना नृत्य, गायन यांच्या नावाखाली वेश्याव्यवसायाकडे ढकलण्याचे मोठे रॅकेट चालत होते. कित्येक महिन्यांपासून हे काळे धंदे राजरोस सुरू होते. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे हे केंद्र मोडनिंब आऊटपोस्ट पोलीस स्टेशनच्या अगदी जवळच होते. तरीही पोलिसांना याची कुणकुण लागली नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे.

आयपीएस अधिकारी राहुल आत्राम यांच्या पथकाने केलेल्या धाडीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. केंद्रातून मोठ्या प्रमाणात अश्लील साहित्य, मोबाईल, रेकॉर्डिंग डिव्हाइसेस जप्त करण्यात आले आहेत. पिडित तरुणींना बाहेरून आणून येथे कोंडून ठेवण्यात येत होते. त्यांना नृत्याच्या नावाखाली ग्राहकांसमोर उभे करून अनैतिक कामे करायला भाग पाडले जात होते. या प्रकरणाने माढा-बार्शी परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. उपसरपंच बर्गे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात आधीच खळबळ उडाली होती. आता त्याच प्रकरणातील नर्तिका या सेक्स रॅकेटमध्ये अडकलेली आढळल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी सांगितले की, पुढील तपासात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

पोलिस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, मुख्य सूत्रधारांसह आणखी काही आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल