AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑस्करमध्ये या हॉरर चित्रपटाचा जलवा, जिंकले 14 नामांकन, जगभरात होतेय चर्चा, OTT वर पाहू शकता

2 तास 17 मिनिटांच्या या अॅक्शन हॉरर चित्रपटाचा ऑस्करमध्ये जलवा. जिंकली तब्बल 14 नामांकन. जगभरात होतेय या चित्रपटाची चर्चा. OTT वर आहे उपलब्ध.

ऑस्करमध्ये या हॉरर चित्रपटाचा जलवा, जिंकले 14 नामांकन, जगभरात होतेय चर्चा, OTT वर पाहू शकता
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 16, 2026 | 12:56 PM
Share

जागतिक चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा अकादमी अवॉर्ड्स यंदा एका हॉरर-अॅक्शन चित्रपटामुळे विशेष चर्चेत आला आहे. ‘सिनर्स’ या चित्रपटाने ऑस्करमध्ये तब्बल 16 विविध श्रेणींमध्ये नामांकन मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामुळे हॉरर चित्रपटांना मोठ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये योग्य मान मिळत नाही हा समजही या चित्रपटाने मोडून काढला आहे.

यापूर्वी टायटॅनिक, ला ला लँड आणि ऑल अबाउट इव्ह या चित्रपटांना प्रत्येकी 14 नामांकन मिळाले होते. मात्र, ‘सिनर्स’ या चित्रपटाने हा विक्रम मागे टाकत नवा इतिहास रचला आहे. बेस्ट पिक्चर, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट अॅक्टर अशा अनेक महत्त्वाच्या श्रेणींमध्ये या चित्रपटाचे नाव आघाडीवर आहे.

1932 च्या पार्श्वभूमीवर उलगडणारी कथा

‘सिनर्स’ या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना 1932 च्या काळात घेऊन जाते. अमेरिकेतील मिसिसिपी या प्रदेशातील रहस्यमय वातावरणात ही कथा घडते. कथानक दोन जुळ्या भावांभोवती फिरते. पहिल्या महायुद्धानंतर ते शिकागो मधून आपल्या गावात परततात आणि भूतकाळातील कटू आठवणी मागे टाकून नव्याने आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न करतात.

ते एका जुन्या आरा मशीनच्या जागी ज्यूक जॉइंट सुरू करून आपल्या समुदायासाठी सुरक्षित जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र ज्या शांततेच्या शोधात ते आपल्या गावात परततात, त्याच ठिकाणी त्यांची वाट पाहत असतात भयानक अलौकिक शक्ती आणि भूतांसारखे जीव. त्यानंतर सुरू होतो जीव वाचवण्यासाठीचा थरारक संघर्ष.

दमदार अभिनय आणि दिग्दर्शन

या चित्रपटात मायकेल बी. जॉर्डन यांनी डबल रोल करत उत्कृष्ट अभिनय सादर केला आहे. दोन जुळ्या गुन्हेगारांच्या भूमिकेत त्यांचा संघर्ष आणि भूतांपासून बचाव करण्याचा प्रयत्न प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

दिग्दर्शक रायन कूगलर, ज्यांनी यापूर्वी ब्लॅक पँथर सारखा सुपरहिट चित्रपट दिला आहे. त्यांनी यावेळी हॉरर आणि अॅक्शनचा अनोखा संगम साकारला आहे. चित्रपटात हेली स्टेनफेल्ड आणि डेलरॉय लिंडो यांच्याही प्रभावी भूमिका पाहायला मिळतात.

ओटीटीवर पाहता येणार चित्रपट

सुमारे 2 तास 17 मिनिटांचा हा थरारक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म JioHotstar वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे. हॉरर आणि थ्रिलर प्रकारातील चित्रपट आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘सिनर्स’ हा एक वेगळा आणि रोमांचक अनुभव ठरू शकतो.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले